आवृत्ती पुणे

भूम शहरात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या विजयानिमित्त भव्य तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भारतीय सैन्याने यशस्वीरित्या राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भूम शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे शूर सैनिकांचे अभिनंदन करण्यात आले तसेच ऑपरेशन दरम्यान शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी पाकिस्तानविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. गुरुवार, दिनांक २२ मे २०२५ रोजी शहरातील सजग नागरिकांनी मोठ्या … Read more

कोंढव्यातील रेकॉर्डवरील आरोपीवर एमपीडीए कारवाई

कोंढवा पोलिसांची कारवाई : एक वर्षासाठी नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. आकाश ऊर्फ मोन्या बाळासाहेब गायकवाड (वय २४, रा. राम मंदिराजवळ, कोंढवा खुर्द) असे त्याचे नाव आहे. आकाश गायकवाड हा … Read more

हुक्का बारच्या अवैध धंद्याला पाठबळ देणारा काळे पडळचा पीएसआय निलंबित

ट्रकचालकाला अडवून दंडाची भीती दाखवून लुटणारा पोलीस अंमलदार निलंबित महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील अवैध धंद्यांना संरक्षण देऊन त्यांना पाठबळ देणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई करून सर्वांना एक मोठा धडा दिला आहे. हुक्का बारच्या अवैध धंद्याला पाठबळ देणाऱ्या काळे पडळ पोलीस ठाण्यातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित … Read more

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी हगवणे पिता-पुत्रांना अटक

कस्पटे कुटुंबियांना पिस्तुल दाखवणाऱ्या नीलेश चव्हाणवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वैष्णवी हगवणे हिला मारहाण करून आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गेल्या ७ दिवसांपासून फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता-पुत्रांना बावधन पोलिसांनी गुरुवारी पहाटे स्वारगेट परिसरातून अटक केली. वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तेव्हापासून तिचे सासरे … Read more

फ्लॅट दाखविण्याच्या बहाण्याने बोलवून बालमैत्रिणीने ठेवले डांबून

मारहाण करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नवीन घेतलेला फ्लॅट पाहण्यासाठी आणि चहासाठी बालमैत्रिणीने बोलावले होते. तो गेल्यावर तिच्या पती व इतरांच्या सहाय्याने त्याला मारहाण करून बाथरूममध्ये डांबून ठेवले. खंडणी उकळण्यासाठी त्याच्या मोबाईलवरून संदेश पाठवला. कोंढवा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी शोध घेऊन चार तासांत या … Read more

गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे सहा आरोपी जेरबंद

११२ वर तक्रार केल्याच्या रागातून केला होता गोळीबार : बिबवेवाडी पोलिसांनी २४ तासांत केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुचाकीचा धक्का लागल्यावरून झालेल्या वादात ११२ नंबरवर पोलिसांना कळविल्याच्या रागातून गोळीबार करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अमित महावीर लकडे (वय २८, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी … Read more

स्वारगेट एस.टी. बसस्थानकात दागिने चोरणारी महिला जेरबंद

चोरीचे तीन गुन्हे उघडकीस : २.७० लाखांचे दागिने जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्वारगेट एस.टी. बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. भाग्यश्री जितेश कसबे (वय ४०, रा. कळसगाव गावठाण, विश्रांतवाडी, मूळ रा. विकासनगर, लातूर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिच्यावर तीन चोरीचे … Read more

भूम तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची नूतन कार्यकारिणी निवड २९ मे रोजी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद नाट्यगृह, धाराशिव येथे संपन्न झाली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर प्रमुख उपस्थित होते. बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा … Read more

धाराशिव’ला मिळाली ओळख – ओमराजेंच्या पाठपुराव्याला यश

उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतर अखेर ‘धाराशिव’ – केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धाराशिव : धाराशिव जिल्ह्याच्या ऐतिहासिक अस्मितेला न्याय देणारा ऐतिहासिक निर्णय अखेर घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून ‘उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे’ अधिकृत नामांतर करून ‘धाराशिव रेल्वे स्थानक’ असे करण्यात आले असून, या निर्णयामुळे जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. या नामांतरासाठी खासदार ओमप्रकाश (ओमराजे) … Read more

वैष्णवी हगवणे यांचे बाळ कस्पटे कुटुंबियाकडे सुपूर्द

सुशील, राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी : तिघांच्या कोठडीत वाढ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जमीन खरेदीसाठी वैष्णवी शशांक हगवणे हिचा छळ करून तिला मारहाण करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर वैष्णवीच्या ९ महिन्यांच्या मुलाचा शोध घेऊन त्याला वैष्णवीचे आई-वडील, कस्पटे कुटुंबियाकडे सोपवण्यात आले. दरम्यान, … Read more