आवृत्ती पुणे

‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह मागविण्याचे आवाहन

कालिदास महोत्सवात दोन नवोदित कवींना होणार गौरव : १० जून २०२५ ही शेवटची तारीख महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : येथील कवी कालिदास मंडळाच्या वतीने आयोजित होणाऱ्या कालिदास महोत्सवाच्या निमित्ताने नवोदित कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहाला ‘मेघदूत’ पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठवावेत, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी केले आहे. गेल्या ३२ वर्षांपासून कवी कालिदास … Read more

सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचा समाजाभिमुख उपक्रम

पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर व ‘मिशन विकसित गाव’ यशस्वीपणे राबवले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या ‘100 दिवसीय सुशासन मिशन’ अंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने दिनांक 13 मे 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर आणि … Read more

लोखंडी रॉडच्या मारहाणीने सुरक्षा रक्षक कोमात

कर्वे रस्त्यावरील घटना : हाऊस किपिंग कंत्राटदाराला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हाऊस किपिंगच्या कंत्राटावरून झालेल्या वादातून कंपनीच्या आवारात येऊन पहाटेच्या सुमारास सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा घाव इतका जोरदार होता की सुरक्षा रक्षक कोमात गेला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी अलंकार पोलिसांनी … Read more

कोंढवा-कात्रज रस्त्यावर मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई

७५०० चौ.फुट जागा मोकळी : १६ शेड हटवले, ७ ट्रक साहित्य जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कात्रज-कोंढवा रस्त्यावर अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास, वाहतूक कोंडी आणि वारंवार होणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मोठी कारवाई केली. कात्रज-कोंढवा रस्त्यावर नागरिकांच्या तक्रारी व वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे महापालिकेचे आयुक्त तसेच उपआयुक्त (अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम … Read more

नियम मोडणारी वाहने जप्त करा

नियमभंग करणाऱ्या डंपर : खासगी बसवर कठोर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील अवजड वाहने आणि खासगी बसचालकांकडून वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. अशा प्रकरणांमध्ये आता थेट वाहन जप्तीची कारवाई करा, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी दिले. वाहतुकीवरील यंत्रणेबाबत पोलिसांची कारवाई अपुरी पडत असल्याची नाराजी … Read more

देवस्थान जमिनींच्या व्यवहारांना ब्रेक : महसूलमंत्री बावनकुळे यांचा मोठा निर्णय

न्यायालयीन आदेश अथवा अधिकृत मंजुरीशिवाय कोणतेही व्यवहार नोंदवले जाणार नाहीत : नोंदणी विभागाला स्पष्ट निर्देश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्यातील देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर सरकारनं मोठा ब्रेक लावला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी विभागाला स्पष्ट निर्देश दिले असून, शासन धोरण ठरवले जाईपर्यंत कोणतेही व्यवहार नोंदणीस घेऊ नयेत, असे सांगितले आहे. पुणे – … Read more

गँगस्टर गजा मारणेचा सांगलीतील राईट हँड जेरबंद

सांगलीतील कारागृहात १५ ते २० जणांना घेऊन घेतली भेट : गजा मारणे याच्या नावाने दिल्या घोषणा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येरवडा कारागृहातून गँगस्टर गजा मारणे याला सांगली कारागृहात नेण्यात आले. मारणे समर्थक १५ ते २० जणांना घेऊन सांगली कारागृहात गजा मारणे याची भेट घेऊन त्याच्या नावाने घोषणा देणाऱ्या राईट हँडला गुन्हे शाखेच्या पथकाने सांगलीहून … Read more

सह्याद्री रुग्णालयात नागरी संरक्षण दलाची अग्निशमन प्रात्यक्षिके

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नागरी संरक्षण दल, गृह विभाग (विशेष) पुणे शहर यांच्या वतीने सह्याद्री हॉस्पिटल, शास्त्रीनगर, येरवडा येथे अग्निशमन प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना मॉकड्रीलच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. या प्रात्यक्षिकात नागरी संरक्षण दलाचे ११ स्वयंसेवक, ३० होमगार्ड जवान, तसेच पुणे महानगरपालिकेच्या येरवडा येथील अग्निशमन … Read more

लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह तिघे जाळ्यात

हिंजवडी, बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जामिनाच्या अर्जावर पोलिसांचे म्हणणे सादर करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह, अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी खासगी व्यक्तीच्या मदतीने लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हिंजवडी पोलीस ठाणे व बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. मारामारीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत … Read more