आवृत्ती , पुणे

केशवनगरमधील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई

बुलढाणा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत करणे असे सहा गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. प्रतिक योगेश चोरडे (वय २१, रा. ओम साई अपार्टमेंट, केशवनगर, मुंढवा) असे या गुन्हेगाराचे … Read more

सतीश वाघ यांच्या खुनापूर्वी पत्नीने केला होता जादूटोणा

गुन्हे शाखेकडून लष्कर न्यायालयात हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सतीश वाघ यांच्या खुनाचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर असून, त्याने पत्नी मोहिनी वाघसोबत कट रचून त्यांचा खून केला. त्याआधी जादूटोण्याचा प्रयोग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेने सतीश वाघ खूनप्रकरणी हजार पानांचे दोषारोपपत्र लष्कर न्यायालयात दाखल केले असून, त्यातून अनेक … Read more

प्रेमसंबंधातून तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

सुखसागरनगरमधील खुनाचा प्रयत्न प्रकरणी चौघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंधातून तरुणाचे अपहरण करून त्याला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. याबाबत ऋषिकेश दीपक खोपडे (वय २६, रा. सुखसागरनगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

जगातील सर्वात मोठ्या संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचे लोकार्पण उत्साहात

देहू येथे ऐतिहासिक सोहळा, भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क देहू : संत तुकाराम महाराज बीजच्या निमित्ताने जगातील सर्वात मोठ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा लोकार्पण सोहळा जगद्गुरु संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर, श्रीक्षेत्र देहू येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट – श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे, वर्ल्ड … Read more

‘‘आम्ही लोहियानगरचे डॉन’’ म्हणत किराणा दुकानदाराकडून उकळली खंडणी

बुचड्या ससाणे : दांड्या आडागळेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोयत्याचा धाक दाखवून ‘‘आम्ही लोहियानगरचे डॉन’’ असे म्हणून किराणा दुकानाला धमकावून खंडणी उकळणाऱ्या दोघा गुंडांवर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत नदीम मेहमुद खान (वय २४, रा. लोहियानगर, गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अभिषेक ऊर्फ बुचड्या … Read more

ऑनलाईन भाड्याने कार बुक करणार्‍या डॉक्टराला सायबर चोरट्यांचा गंडा

कोंढव्यातील प्रकार, फसवणुकीच्या पैशांमधुन खरेदी केला आय फोन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हैदराबादला जाणार्‍या पुण्यातील एका डॉक्टरला भाड्याने कार हवी होती. त्यासाठी त्याने इंटरनेटद्वारे कार बुक करण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा सायबर चोरट्यांनी चुकीची लिंक पाठवून त्याद्वारे डॉक्टरांना ७९ हजार रुपयांना गंडा घातला. या पैशातून सायबर चोरट्यांनी बंगलुरु मधील दुकानातून आय फोन खरेदी केला आहे. … Read more

१५ कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली घातला गंडा

हैदराबादच्या कंपनीची फसवणूक : पुण्यात व्यावसायिकावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: हैदराबाद येथील एका बांधकाम व्यावसायिक कंपनीला १५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून प्रोसेसिंगच्या नावाखाली ८ लाख ४८ हजार रुपये घेत कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश बाबू गुरुनाथराव अश्रीथ (वय ६५, रा. हैदराबाद) … Read more

मसाज घेताना महिलेचे व्हिडिओ काढून मागितली खंडणी

धनकवडीतील आयुर्वेदिक उपचार केंद्रातील घटना : तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धनकवडी येथील आयुर्वेदिक उपचार केंद्रात मसाज घेऊन तेथील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी गोळा करणाऱ्या तिघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे़ तु टॉप काढून मसाज कर, नाही तर तुझे आयुर्वेदिक … Read more

शिवराज्य सेनेचे सर्जिकल स्ट्राईक आंदोलन

शिवसृष्टीत खऱ्या इतिहासाचा समावेश करण्याची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी नगरपरिषद तर्फे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग शिल्परूपात साकारण्यात आले आहेत. तथापि, अफझल खान वध आणि लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा ऐतिहासिक प्रसंग शिवसृष्टीतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेतील हे दोन प्रसंग अतिशय … Read more

बेवारस महिलेच्या खुनाचा बार्शी शहर पोलिसांनी केला छडा : आरोपी जेरबंद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी अलिपूर रोड येथील ज्वारीच्या शेतामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत बिकट होती व तो कुजलेल्या स्थितीत असल्याने ओळख पटवणे कठीण होते. बार्शी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र … Read more