आवृत्ती , पुणे

रिंग रोडसाठी ठेकेदार कंपन्यांची ‘रिंग’

रिंग रोडचा खर्च किमान २५ टक्क्यांनी वाढणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून शहराबाहेरून रिंग रोडची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, या निविदांमध्ये ठेकेदार कंपन्यांनी संगनमताने ३५ टक्के जादा दराने निविदा भरल्याचे समोर आले आहे. महामंडळाने या निविदांची त्रयस्थ … Read more

श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महिलांचा उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी येथे दिनांक १६ जानेवारी २०२५, गुरुवार रोजी संध्याकाळी ५:०० ते ८:०० या वेळेत हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वाचनालयाने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महिला वाचक सभासदांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमात महिलांना वाण म्हणून … Read more

सहा बांगलादेशी नागरिकांना बार्शीत अटक

मदत करण्याऱ्यांसह ९ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : शहरातील पंकजनगर भागात विना व्हिजा आणि परवानगीशिवाय भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. नजमा यासीन शेख ऊर्फ बीठी बेगम (वय ३३, रा. पेरोली थाना कालिया), रेहना बेगम समद शिकंदर ऊर्फ साथी (वय ३३, रा. परहाजिगिरम थाना तेरेखोदा), शिखा … Read more

इन्फोसिसला ६,८०६ तर रिलायन्सला १८,५४० कोटींचा नफा

तिसऱ्या तिमाहीत कंपन्यांच्या कामगिरीत उल्लेखनीय वाढ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: डिसेंबर अखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत अनेक कंपन्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जसजसे कंपन्यांचे आर्थिक अहवाल जाहीर होत आहेत, तसतसे शेअर बाजारात तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेतील चलनवाढ कमी झाल्यामुळे आणि इस्त्राईल-हमास शस्त्रसंधीच्या चर्चेमुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे, ज्याचा परिणाम भारतीय … Read more

चेष्टामस्करीतून केला गोळीबार

आंबेगाव बुद्रुकमधील घटनेत मित्र जखमी : निलेश जाधवला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोकळ्या मैदानात मोबाईलवर गेम खेळत असताना चेष्टामस्करीतून राग आल्याने एका तरुणाने गोळीबार करून मित्राला जखमी केले. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्याला अटक केली आहे. या घटनेत करण भारत गजरमल (वय १९, रा. गणेश सुपर शॉपीजवळ, दभाडी, आंबेगाव) हा जखमी झाला असून, त्याच्या फिर्यादीवरून … Read more

भाडेकरुंची माहिती पोलीस स्टेशनमध्ये देणे अनिवार्य

सोसायटीला देखील माहिती देणे आवश्यक माहिती न दिल्यास : घरमालकांना होऊ शकते कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरु ठेवताना भाडेकरुंची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये सादर करणे बंधनकारक असल्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिला आहे. त्या सोबतच रजिस्टर सोसायटी असलेल्या ठिकाणी देखील सोसायटी कडे … Read more

घरफोडी करणारी टोळी जेरबंद

८० लाखांचा मुद्देमाल जप्त: स्वारगेट पोलीस ठाण्याची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या अट्टल टोळीला जेरबंद केले असून, त्यांच्याकडून तब्बल ८० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये ८६० ग्रॅम सोन्याचे दागिने, १५० हिरे, ३.५ किलो चांदी, दोन पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे, एक दुचाकी, तसेच घरफोडीसाठी वापरलेले साहित्य समाविष्ट … Read more

इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेच्या नावाखाली तरुणीला १० लाखांचा गंडा

सहकारनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध केला गुन्हा दाखल महाराष्ट्र नुज नेटवर्क पुणे : वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या पुण्यातील एका तरुणीची मिस इंटर कॉन्टिनेंटल स्पर्धेसाठी निवड झाल्याचे सांगून तिला १० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मलिक इसानी (रा. गुजरात), गोविंद कुमार अग्रवाल (रा. हरियाणा), गौरव जेटली … Read more

रात्री आईस्क्रीम खायला जाणे व्यापाऱ्याला महागात पडले

रात्री आईस्क्रीम खायला जाणे व्यापाऱ्याला महागात पडले महाराष्ट्र नुज नेटवर्क पुणे : जेवण झाल्यावर रात्री उशिरा आईस्क्रीम खाण्यासाठी जाणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. शिवीगाळ करणार्‍यांना जाब विचारल्याने दोघांनी त्यांच्या डोक्यात वीट मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फरासखाना पोलिसांनी दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत किशोर चंद्रकांत काळेबेरे (वय … Read more

पुणे शहर पोलीस दलातील २३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

वाहतूक, गुन्हे आणि विशेष शाखांतील अधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे शहर पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव २३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश काढून याबाबत माहिती दिली. या बदल्यांमध्ये वाहतूक, गुन्हे आणि विशेष शाखांमधील निरीक्षकांना पोलीस ठाण्यांमध्ये तर पोलीस ठाण्यांतील निरीक्षकांना विविध शाखांमध्ये बदली करण्यात आली … Read more