आवृत्ती पुणे

मतदार यादीत नावे असल्याची खात्री करा

सोलापूर जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रकाशित करण्यात आली असून, एकूण मतदार संख्या ३७,६३,७८९ इतकी आहे. या अंतिम मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करावी. ज्या नागरिकांची नावे अजूनही मतदार यादीत नाहीत, त्यांनी निरंतर प्रक्रिया अंतर्गत … Read more

परशुराम विकास आर्थिक महामंडळ स्थापन निर्णयाचे भूममध्ये स्वागत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत परशुराम विकास आर्थिक महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीला मान्यता देऊन ब्राह्मण समाजाला गौरवीत करण्यात आले, त्याबद्दल भूम तालुक्यातील सर्व ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करून महाराष्ट्र शासनाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या निमित्ताने 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वा. समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने सरकार अभिनंदन … Read more

डॉ.शुभम पोखर्णा यांचे एम.डी.परीक्षेत यश

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : येथील प्रसिद्ध व्यापारी विवेक धरमचंद पोखर्णा यांचे लहान बंधू डॉ.शुभम पोखर्णा यांनी एमडी मेडिसिन ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी ही परीक्षा शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव येथून उत्तीर्ण केली. त्यांना डॉ. ना .सु. गंगासागरे व डॉ. र.सा. धिमधिमे यांचे मार्गदर्शन लाभले.

निळ्या पुररेषेतील २७ अनधिकृत बांधकामावर कारवाई

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तब्बल २७ अनधिकृत व्यावसायिक बांधकामांवर कारवाई केली आहे. यापुढे संपूर्ण अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ६ अनधिकृत व्यावसायिक बांधकामांवर कारवाई करण्यात येऊन अंदाजे ५,५०० चौ.फुट क्षेत्र पाडण्यात आले. या कारवाईमध्ये २० एमएसएफ जवान सहभागी होते. … Read more

नागरी सुविधा केंद्रातून ३६ हजार ५३८ दाखले वितरीत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून १ एप्रिल २०२४ ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ३६,५३८ दाखले वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली. महापालिकेच्या वतीने नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने आदी सेवा प्रदान केल्या जात आहेत. नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सेवेचा अर्ज … Read more

कोंढव्यातील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा, ५ जणांवर गुन्हा दाखल

कोंढवा पोलिसांची कामगिरी, ३६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कोंढव्यात बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट व इतर साहित्य असा ३६ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला आहे. कोंढव्यातील “मॅश” हॉटेलमध्ये खुलेआम हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळून आले आहे. … Read more

बँके लॉकरमधील दागिने व रोकडची चोरी

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बँकेच्या लॉकरमधील दागिने व रोकड चोरी झाल्याचा प्रकार लष्कर भागात उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपानबाग येथील फिर्यादीने काही महिन्यांपूर्वी आरोरा टॉवर्स, कॅम्प, पुणे येथील बँकेच्या लॉकरमध्ये दागिने व रोकड ठेवली होती. दोन महिन्यांपूर्वी त्याने बँकेमधील लॉकरमध्ये दागिने व रोकड सुस्थितीत असल्याचे पहिले होते. … Read more

पार्क केलेल्या कारमधून २० हजारांची चोरी

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुकुंदनगरमधील बँकेसमोर पार्क केलेल्या कारमधून २० हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कात्रज येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० ते संध्याकाळी ४:१५ या वेळेत विद्या सहकारी … Read more

प्रीपेड टास्कच्या बहाण्याने २२ लाखांची फसवणूक

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रीपेड टास्कच्या बहाण्याने २२ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार पेरणे फाटा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी तरुणाने ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी 2024 दरम्यान फिर्यादी महिलेशी मोबाईलवर … Read more

पोलीस बोलत असल्याचे भासवून २७ लाखाची फसवणूक

पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपण सायबर क्राईम शाखेतून बोलत असल्याचे भासवून २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पानमळा, सिंहगड रोड परिसरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीशी ७ जुलै रोजी मोबाईलवर संपर्क साधला. सायबर क्राईम शाखा, मुंबई येथून ऑफिसर बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या आधार कार्डचा … Read more