आवृत्ती पुणे

सचिन खिलारे यांचा अर्हम फाऊंडेशनच्या वतीने विशेष सत्कार

विविध प्रकारातील खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पॅरिस येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक २०२४ मध्ये गोळाफेक या क्रीडा प्रकारात एफ ४६ या दिव्यांग श्रेणीत रजत पदक मिळवलेल्या सचिन खिलारे यांचा अर्हम फाऊंडेशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. अर्हम फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दिव्यांग राष्ट्रीय पुरस्कार २०२४ सोहळा गुरुवारी (दि. १९ … Read more

आदिवासी समाजाने ग्राम अभियानाचा लाभ घ्यावा : डॉ सुहास दिवसे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि हवेली तालुक्यांतील आदिवासी समाजातील नागरिकांनी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाचा लाभ घ्यावा; आदिवासी सामाजिक संस्था, संघटना आणि आदिवासी स्वयंसेवकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या … Read more

निवडणुकांत अधिकाऱ्यांनी चोखपणे कर्तव्य बजावावे : डॉ. सुहास दिवसे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले असून, त्याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी सर्वांनी दक्ष राहून चोखपणे कर्तव्य बजावावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी … Read more

अन्न व औषध प्रशासनामार्फत धडक मोहीम

पुण्यात १४ लाख ३५ हजार ९५८ किंमतीचा साठा जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गणेशोत्सव काळात अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयामार्फत पुणे विभागामध्ये अन्न आस्थापनांच्या १०१ तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमध्ये दूध, खवा, पनीर, स्वीट मावा, तूप, बटर आणि नमकीन इत्यादी अन्नपदार्थांचे एकूण ११७ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. यामधून एकूण ९ लाख १९ हजार … Read more

महिला सशक्तीकरणासाठी कस्तुरबा महिला ग्रुपचे योगदान महत्त्वाचे

माधुरी मिसाळ : वर्धमान सांस्कृतिक केंद्रात एक्झिबिशनचे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर, 1949 साली शांताबाई रायसोनी, सुलभा चोरडिया, कुंदनबाई बाफना यांनी महिला सशक्तीकरणासाठी कस्तुरबा महिला ग्रुपची स्थापना केली. हा ग्रुप आजही महिला सशक्तीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले. प्रमिलाबाई सांकला अध्यक्ष असलेल्या कस्तुरबा … Read more

घोरपडीत बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड चोरीस

वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घोरपडी परिसरातील एका बंगल्याच्या आवारात असलेले चंदनाचे झाड चोरीला गेल्याची फिर्याद वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी राहत असलेल्या घोरपडी बाजार येथील बंगल्याच्या आवारात असलेली ४ हजार रुपये … Read more

बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड तोडून चोरी

पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पर्वती परिसरातील बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड तोडून चोरी केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. ही घटना १८ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास मित्रमंडळ परिसरात घडली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी राहत असलेल्या बंगल्याच्या आवारातील ५० हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड कापून चोरी केली आहे. … Read more

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात २ ऑक्टोबर पर्यंत मनाई आदेश लागू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून दि. 18 सप्टेंबर 2024 सकाळी 08 वा पासुन ते 02 ऑक्टोबर 2024 रात्री 08 वा. पर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) व 37 (3) (अ ते फ) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात … Read more

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील वृद्धाचा मृत्यू

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तुळापूर ते फुलगाव रस्त्यावर भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. या अपघातात लक्ष्मण मुंजाजी काळे (वय ७२ वर्षे, रा. सैनीकी शाळेसमोर, फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) हे ठार झाले. पोलिसांनी टेम्पो चालक मराबाबा काळे … Read more

लायन्स क्लब बार्शीच्या वतीने शिक्षकरत्न पुरस्काराचे थाटात वितरण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : लायन्स क्लब बार्शीच्या वतीने यावर्षीचा शिक्षक रत्न पुरस्कार शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. पंडित लावंड , शिवव्याख्याते प्रा. विशाल गरड, प्रा. बालाजी राऊत, मधुकर जाधव, सुधीर खाडे, अनिकेत कारंडे, सुरेशआबा राऊत, आनंद धुमाळ यांना प्रदान करण्यात आला. बार्शीचे माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी व लायन्स इंटरनॅशनल चे लिओ प्रांतीय सभापती ॲड विकास जाधव … Read more