आवृत्ती , पुणे

कात्रज – कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील कात्रज-कोंढवा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलाला सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे नाव देण्यास गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान यांनी केलेल्या विनंतीनुसार, पुणे महानगरपालिकेने हा प्रस्ताव दिला होता. या … Read more

बोगस डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खोटे प्रमाणपत्र दाखवून दवाखाना चालवत उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरला वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा इसम वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मुळव्याध उपचार केंद्र, श्रीकृष्ण पॅलेस, सय्यदनगर, वारजे माळवाडी … Read more

शहरातील सर्व कामगारांची मोफत नोंदणी व नूतनीकरण अभियान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी भूम शहरातील सर्व कामगारांची मोफत नोंदणी व नूतनीकरण अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत कामगारांना मिळणाऱ्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. धाराशिवचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संयोगिताताई गाढवे यांच्या वतीने हे अभियान पार पडले. … Read more

हरिनामाच्या गजरात माऊलींचा पालखी सोहळा पद्मावती मातेच्या दर्शनाला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आळंदी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पर्व काळात तिर्थक्षेत्र आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सातव्या माळेला पद्मावती मातेच्या दर्शनासाठी हरिनामाच्या गजरात आगमन झाले. दुपारी बारा वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुका पालखीतून पद्मावती मातेच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाली. दुपारी एक वाजता पद्मावती मंदीरात आगमन झाल्यानंतर आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्या हस्ते आई … Read more

बीबीदारफळचे शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ प्रथम

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते गणेश मंडळांचा सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते गणेश मंडळांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ, बीबीदारफळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सन २०२४ मध्ये साजरा करण्यात आलेल्या श्री गणेश उत्सवाच्या दरम्यान सामाजिक सलोखा टिकावा यासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत … Read more

गहाळ झालेले १३ मोबाईल तक्रारदारांना परत

बार्शी तालुका पोलिसांची मोठी कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गहाळ झालेले १३ मोबाईल शोधून तक्रारदारांना पोलिसांनी परत केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२४ मध्ये हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून या गहाळ मोबाईलचा शोध घेण्यात आला. गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण १३ … Read more

घरफोडी करणाऱ्या चोराच्या आवळल्या मुसक्या

विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी करणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल, कार, असा एकूण ३,८५,९५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडून हडपसर, मुंढवा, चंदननगर, भोसरी पोलीस ठाण्यातील एकूण ४ गुन्हे उघड झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात घरफोडीचे गुन्हे गेल्या काही दिवसांत … Read more

जुन्या वादातून तरुणावर वार

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न कोंढवा परिसरात झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरवनाथ मंदिराशेजारी कोंढवा बु. येथील एका तरुणावर ७ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता तीन जणांनी हल्ला केला. चांदतारा चौक ते साई सर्व्हिस, कोंढवा परिसरात तिघांनी फिर्यादीचा पाठलाग करून … Read more

कचरा डेपोतील बायोमायनिंग प्रकरणाची होणार चौकशी

पुणे महापालिका आयुक्तांनी दिला आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उरुळी देवाची – फुरसुंगी कचरा डेपोतील जैविक उत्खननाच्या (बायोमायनिंग) निविदा प्रकरणाची महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी चौकशी करावी, आणि या निविदेतील आर्थिक बाबींसंदर्भात मुख्य लेखा परीक्षकांनी अहवाल सादर करावा, असा आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे बायोमायनिंगची निविदा काढण्यात … Read more

केअर टेकर महिलेने सोन्याचे दागिने चोरले

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वृद्ध आईची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या केअर टेकर महिलेने सोन्याचे दागिने चोरल्याची घटना औंध परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ते २० सप्टेंबर या दरम्यान ही घटना घडली आहे. प्लॅट नंबर ०३, मारोतीराव गायकवाड नगर, औंध येथील एका महिलेने या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली आहे. … Read more