आवृत्ती , पुणे

मित्राच्या हातावर फोडली दारुची बाटली

उपवर वधुचा केला विनयभंग : दत्तनगरमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विवाह ठरल्याने त्याने मित्राला पार्टीला बोलावले. दारुच्या नशेत त्याने मित्राची उपवर वधुचा हात धरला. त्याचा मित्राने जाब विचारल्यावर त्याने मित्राच्या हातावर दारुची बाटली फोडली. तर तरुणीने विनयभंगाची फिर्याद दिली असून दोघांवर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित महेंद्र पाटील … Read more

रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या दुर्गम अशा रायरेश्वर मतदान केंद्रावर पायथ्यापासून पायी चालत उभी चढण असलेल्या लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने दमछाक होत हे पथक पोहोचले. मात्र लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपल्याला एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळाल्याच्या उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. भोर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था … Read more

महावितरणाच्या प्रशिक्षणार्थीला लाच घेताना पकडले

वीज बिलावरील नावात बदल करण्यासाठी मागितली लाच : धनकवडी कार्यालयातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नवीन खरेदी केलेल्या फ्लॅटच्या पूर्वीच्या मालकाचे नाव बदलून नवीन नाव लावण्यासाठी ८०० रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणाच्या प्रशिक्षणार्थीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. याबाबत ४४ वर्षाच्या तक्रारदाराने तक्रार केली होती. तक्रारदार यांनी त्यांचे आईच्या नावावर एक फ्लॅट खरेदी … Read more

सूर्यदत्त विधी महाविद्यालयामध्ये मतदान जागृती

आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे सहकार्य : विद्यार्थ्यांकडून मतदान करण्याची शपथ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा आणि लोकशाही अधिक सक्षम व्हावी, यासाठी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन संचालित सूर्यदत्त विधी महाविद्यालय पुणे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये मतदान … Read more

जैन कल्याणक सर्कीटसाठी ललित गांधी यांना योगी आदित्यनाथ यांचे निमंत्रण

महाराष्ट्र जैन वार्ता कोल्हापूर : उत्तरप्रदेशमध्ये प्रस्तावित केलेल्या जैन कल्याणक सर्कीट प्रकल्पांवर चर्चेसाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र सरकारच्या जैन आर्थिक विकास महामंडळ चे अध्यक्ष ललित गांधी यांना लखनौ येथे बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. आयोध्या ही प्रथम जैन तीर्थंकर ॠषभदेव भगवान यांची जन्मभुमि असुन बनारस ही तेवीसावे तीर्थंकर पार्श्‍वनाथ भगवंतांची जन्मभुमि आहे. जैन तीर्थंकरांचे … Read more

प्रकाश चव्हाण खुन प्रकरणी सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा

१० वर्षानंतर लागला निकाल : तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरले महत्वाचे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : टोळी युद्धातून कुख्यात गुन्हेगार प्रकाश चव्हाण याचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा निकाल दिला. तब्बल दहा वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला … Read more

शरद पवार गटाच्या नेत्यावर हल्ला

विश्रांतवाडीमधील चंद्रकांत टिंगरे जखमी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यावर दगडफेक करुन त्यांना जबर जखमी करण्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत चंद्रकांत टिंगरे हे जबर जखमी झाले असून त्यांच्यावर विमल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. रेखा टिंगरे व चंद्रकांत टिंगरे यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र … Read more

मोटारसायकलीचा माग काढत घरफोड्याला अटक

फरासखाना पोलिसांनी साडेचार लाखांचा ऐवज केला जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घरफोडीच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या मोटारसायकलीचा माग काढून फरासखाना पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील पिता पुत्रांपैकी एकाला पकडले. त्याच्याकडून फरासखाना पोलिसांनी ४ लाख ५७ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. फैय्याज राज मोहम्मद शेख (रा. सत्यानंद नगर, मिठानगर, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

जांभुळवाडीत जुगार अड्ड्यावर छापा

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई, १७ जणांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विधानसभा निवडणुकीमुळे शहरातील अवैध धंद्यांवर सातत्याने पोलिसांचे छापे पडत आहेत. त्यामुळे शहराच्या बाहेर जाऊन जुगाराचे व्यसन चालू ठेवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. याच पार्श्वभूमीवर जांभुळवाडीतील माऊली बिल्डिंगमध्ये भर दिवसा तीन पत्ती जुगार खेळला जात होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी येथे छापा घालून १७ जणांना अटक … Read more

सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लिल फोटो अपलोड

कोथरुडमधील घटना, मित्राविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मैत्री तोडल्याच्या रागातून मित्राने मैत्रिणीच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट उघडले. त्यानंतर मैत्रिणीचे अश्लिल फोटो अपलोड करुन तिला कॉलगर्ल संबोधून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २१ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन कोथरुड पोलिसांनी २४ वर्षाच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल … Read more