आवृत्ती पुणे

शिक्षकांच्या जेवणाचे सब कॉन्टँक्ट देण्याच्या नावाखाली फसवणूक

चित्रपट निर्मात्याने १० जणांना घातला १८ लाखांना गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चित्रपटासाठी कलाकारांची निवड करण्याच्या नावाखाली लोकांना एकत्र करुन त्यांना ६५० शिक्षकांना जेवणाचे डब्बे पुरविण्याचे सब कॉन्ट्रँक्ट देण्याचे आमिष दाखवून त्यांना एका निर्मात्याने १८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत बिबवेवाडी येथील एका ५४ वर्षांच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

डेअरी प्रॉडक्टच्या डिलरशीपच्या नावाखाली फसवणूक

ज्येष्ठ नागरिकाला ३८ लाखांचा गंडा : कर्वेनगरमधील भामट्यावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गोंदवले महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला गोतुल्य डेअरी फार्मच्या प्रॉडक्टची डिलरशीप मिळवून देण्याचे आमिष दाखवून ३८ लाख ९७ हजार रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत फुरसुंगी येथील ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली … Read more

यश शहा यांनी घेतली राज्यपाल महोदयांची सदिच्छा भेट

महाराष्ट्र जैन वार्ता अहिल्यानगर : इंजिनीयर यश शहा यांनी राज्यपाल माननीय सी.पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना शहा म्हणाले की ही भेट एक अविस्मरणीय अनुभव होता. शहा यांनी एक अविस्मरणीय सकारात्मक भेट झाल्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त केला.

अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या काळात ५०० कोटींचा घोटाळा

माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप, कारागृहात मीठापासून कांद्यांपर्यंत अव्वाच्या सव्वा दराने खरेदी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील कारागृहामध्ये रेशन खरेदी व विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्ये सेंट्रलाईज पद्धतीचा अवलंब करुन अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करुन ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा घोटाळा झाला आहे. २०२३ ते २०२५ – २६ या वर्षांमध्ये अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता … Read more

वारसदार नोंदीसाठी मागितली लाच

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील घटना, महिलेविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वारसदार नोंदीसाठी महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात तक्रारदार गेला असताना महिलेने २ हजार रुपयांची लाच मागितली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासणीत ही महिला महापालिकेच्या नोंदीनुसार बिगारी सेवक म्हणून नियुक्तीला असली तरी त्या लिपिकाचे काम करीत असल्याचे दिसून आले. छाया यशवंत जातेंगावकर … Read more

महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

बार्शी सत्र न्यायालयाचा कठोर निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : माढा तालुक्यातील मौजे अकोले (बु.) येथे घडलेल्या महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी बार्शी येथील सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आगतराव काळे यांचा मुलगा अपघातात मरण पावल्यानंतर त्याच्या पत्नी कोमल ला तिच्या आई लक्ष्मी पवार हिला भेटू दिले जात नव्हते. 30 जानेवारी … Read more

पद्मावतीत दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध

एमपीडीए कायद्यान्वये पोलीस आयुक्तांची कारवाई : नागपूर कारागृहात रवानगी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पद्मावती येथील तळजाई वसाहतीत दहशत माजवणाऱ्या गुंडावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. साहिल ऊर्फ भावड्या संतोष कुचेकर (वय २१, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. पुणे … Read more

फसवणुकीच्या आरोपाखालील दोन आरोपी फरार

न्यायालयाने जाहीरनामा जारी केला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने अविनाश अर्जुन राठोड व विशाखा अविनाश राठोड या दोन आरोपींविरुद्ध हजर राहण्यासाठी जाहीरनामा काढला आहे. आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांमुळे दोघांवर गुन्हा दाखल असून, न्यायालयाने त्यांना ७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या … Read more

दोघांकडून ११ लाख ४० हजारांचे मॅफेड्रॉन जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी; नाना पेठेत कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी थांबलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले असून, त्यांच्याकडून ११ लाख ४० हजार रुपयांचे ५७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केले आहे. अदीब बशीर शेख (वय २९, रा. पेन्शनवाला मस्जिद, नाना पेठ) आणि यासीर हशीर सय्यद (वय ३०, रा. … Read more

पत्रकार भवन चौक दरोडा प्रकरण : ८ तासांत गुन्ह्याचा छडा, आरोपी गजाआड

सदर बझार पोलिसांची जलद कारवाई : १००% मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : पत्रकार भवन चौक येथे टेम्पो अडवून मारहाण करत रोख रक्कम व कागदपत्रांची जबरी चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अवघ्या आठ तासांत अटक करण्यात सदर बझार पोलिसांनी यश मिळवले आहे. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना न्यायालयीन … Read more