आवृत्ती , पुणे

मालमत्तेसाठी काकाचा खुन करणाऱ्या पुतण्यांना अटक

घटनेनंतर चार तासांत आरोपी जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मालमत्तेच्या कारणावरून रस्त्यात काकाचा निर्घुण खुन करणाऱ्या पुतण्यांसह तिघांना पोलिसांनी चार तासांत जेरबंद केले. अटक केलेल्या आरोपींची नावे शुभम महेंद्र तुपे (वय २८, रा. निम्हण, विठ्ठल मंदिराजवळ, पाषाण, रोहन सूर्यवंशी (वय २०, रा. पाषाणगाव), ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, रा. विठ्ठल मंदिराजवळ, पाषाणगाव) अशी आहेत. … Read more

अपघाताचा बहाणा करून कारचालकाला लुटणाऱ्या दोघांना अटक

नुकसानभरपाईसाठी धमकी देत सोनसाखळी लुटली : स्वारगेट पोलिसांनी कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सॅलसबरी पार्क येथे अपघाताचा बहाणा करून कारचालकाला धमकी देत गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावणाऱ्या दोघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रोहित कांबळे (वय २१, रा. औद्योगिक वसाहत, व्हेईकल डेपो) आणि सागर जळकुटे (वय २४, रा. औद्योगिक वसाहत, … Read more

बनावट प्रतिज्ञापत्र तयार करून घेतले २८ हजार लिटर डिझेल

व्यावसायिकाची २६.९८ लाखांची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उसने पैसे परत करून विश्वास संपादन केला आणि त्यानंतर बनावट प्रतिज्ञापत्राच्या आधारे तब्बल २८ हजार लिटर डिझेल घेऊन २६ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आनंद लाहोटी (वय ४१, रा. श्रीराम चौक, वानवडी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद … Read more

४ तासांत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

पुणे गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखा, युनिट-०४ पुणे शहर यांनी अवघ्या ०४ तासांत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. दिनांक ०८ फेब्रुवारी रोजी सकाळी ०६:०० ते ०६:३० च्या दरम्यान महेश तुपे (वय ५६, रा. पाषाण, पुणे) हे दूध आणण्यासाठी गेले असता, कोकाटे आळी येथील गणपती मंदिराजवळ त्यांच्यावर … Read more

योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण परिश्रम हाच उज्वल यशाचा राजमार्ग : सर्जेराव राऊत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी: शिक्षणामुळे स्वतःमधील सर्वोत्तम क्षमतांचे सादरीकरण करता येते. विद्यार्थ्यांमध्ये अनेक कौशल्ये आणि क्षमता असतात. त्यांना योग्य दिशा देऊन आत्मविश्वास वाढवण्याचे काम चाटे शिक्षण समूह करत आहे. त्यामुळे हजारो यशस्वी विद्यार्थी आणि समाधानी पालकांचा विश्वास चाटे पॅटर्नवर वाढत आहे. “यश पर्व” या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण सभागृहात बोलताना चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर विभागाचे शैक्षणिक … Read more

‘अमूल’च्या नावाने २० लाखांची फसवणूक

गुगलवरील बनावट वेबसाईटवर विश्वास ठेवल्याने नुकसान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘अमूल’चे आयस्क्रीम पार्लर आणि रिटेल एजन्सी मिळवण्यासाठी गुगलवर शोध घेतलेल्या एका तरुणाची सायबर चोरट्यांनी २० लाख ४२ हजार रुपयांना फसवणूक केली. बनावट वेबसाईटवर माहिती भरल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले. औंध येथील २७ वर्षीय तरुणाने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण … Read more

रेशनकार्डसाठी ई-केवायसी बंधनकारक

लाभार्थ्यांनी मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम: सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांनी शासकीय अनुदानित अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. जे शिधापत्रिका धारक आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे … Read more

मिळकत करात यंदाही वाढ नाही

पुणे महापालिकेकडून पुणेकरांना दिलासा, सलग ९ वर्षांत वाढ नाही महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेच्या २०२५-२६ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मान्यता दिली. या अर्थसंकल्पात मिळकत करात कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने स्वीकारला आहे. सलग नवव्या वर्षी मिळकत करात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. जुने दर जैसे थे असणार आहेत. अर्थसंकल्पात … Read more

स्व. सौ. कावेरी चंद्रकांत गाढवे यांच्या स्मरणार्थ उपक्रम

भूम येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : अरुण गाढवे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ व्याख्यानमालेचे आयोजन केले असून यंदाचे सातवे वर्ष आहे. यंदाही कै. सौ. कावेरी चंद्रकांत गाढवे यांच्या स्मरणार्थ “स्मरण आक्काचं” व्याख्यानमाला ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता नगर परिषदेसमोरील प्रांगणात … Read more

पूर्ववैमनस्यातून कागदीपुरा येथे पाच वाहनांची तोडफोड

फरासखाना पोलिसांनी सहा जणांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी येथे वाहनांची तोडफोड झाल्यानंतर येरवडा आणि फरासखाना येथे गुरुवारी पहाटे अशाच प्रकारच्या घटना घडल्या. चार दिवसांपूर्वी एका गुन्हेगाराला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी टोळक्याने त्याच्या गाडीसह एक रिक्षा आणि चार दुचाकींची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, एका … Read more