आवृत्ती , पुणे

मेट्रोमनीवरील ओळखीतून फसवणूक करणाऱ्यास इंदौरहून अटक

दिल्ली, फरीदाबाद, भोपाळ, इंदौर येथे गुन्हे दाखल : काळेपडळ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मेट्रोमनी साईटवरून महिलांशी ओळख करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करत, विश्वास संपादन करून वेगवेगळी कारणे सांगून लाखो रुपये हडप करणाऱ्यास काळेपडळ पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदौर येथून अटक केली. अमन प्रेमलाल वर्मा (वय ३८, रा. बिश्ना, जि. … Read more

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविणारा जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. राजू महादेव डेंगळे (वय २२, रा. प्रतिकनगर, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ३० जानेवारी रोजी पहाटे सुमारे पावणेसहा वाजता संबंधित महिला मॉर्निंग वॉकसाठी … Read more

दूषित पाणी हेच जीबीएसचे प्रमुख कारण

एनआयव्हीचा अहवाल : शुद्ध पाणीपुरवठ्याची गरज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) होण्याचे प्रमुख कारण दूषित पाणी असल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) केलेल्या तपासणीतून समोर आले आहे. खडकवासला धरणालगत असलेल्या गावांना शुद्धीकरण न केलेले पाणी पुरवले जात असल्याने या गावांमध्ये प्रामुख्याने जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. … Read more

बांधकामाविषयी गैरसमज पसरवून मागितली ५० लाखांची खंडणी

खडकवासला अभियंत्यांचा बनावट आदेश : सराईत गुन्हेगार सचिन जांभुळकरवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बांधकामासंदर्भात फ्लेक्स उभारून नागरिकांनी सदनिका खरेदी करू नये, यासाठी गैरसमज पसरविण्यात आला. पर्यावरण वाचवण्यासाठी वनीकरण करण्यासाठी परवानगी मिळाल्याबाबत पाटबंधारे विभागाचा बनावट आदेश तयार करण्यात आला. तसेच बांधकाम पूर्णत्वास न्यायचे असेल, तर ५० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला … Read more

पिस्टल बाळगणारा तरुण जेरबंद

सहकारनगर पोलिसांची मोठी कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे ; शायनिंग मारण्यासाठी कमरेला पिस्टल लावून फिरणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक झालेल्या तरुणाचे नाव ऋतिक संजय ननावरे (वय २४, रा. विजयश्री अपार्टमेंट, बालाजीनगर) असे आहे. सोमवारी सहकारनगर पोलिसांचे तपास पथक पेट्रोलिंग करत … Read more

मंदिरासाठी ग्रेनाइट दगड विकत घेण्यासाठी दिलेल्या १८ लाखांचा अपहार

देणगी देण्याचा बहाणा करून फसवणूक : दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या नवीन मंदिरासाठी ग्रेनाइट दगड उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या १८ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चेन्नई येथील दोन व्यक्तींवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टला संस्थापक प्रभाकर … Read more

प्रेमसंबंधातून मुलीकडच्यांनी मुलाच्या वडिलांचे केले अपहरण

हडपसर पोलिसांनी तिघांना पकडून केली सुटका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तरुण तरुणीच्या प्रेमसंबंधांना तरुणीच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. या कारणामुळे तरुणाने प्रेयसीला पळवून नेल्याने चिडलेल्या तिच्या नातेवाईकांनी तरुणाच्या वडिलांचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली आणि अपहरण झालेल्या वडिलांची सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी … Read more

गुगलवर झिप्टो अ‍ॅपचा नंबर शोधणे पडले महागात

मोबाईलचे पहिले पाच क्रमांक टाकल्यावर खाते रिकामे : सायबर चोरट्यांचा नवा फंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुगलवरून झिप्टो अ‍ॅपचा कस्टमर केअर नंबर शोधणे एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १ लाख ८८ हजार ४७० रुपयांना महागात पडले. मोबाईलचे पहिले पाच क्रमांक टाकल्यानंतर सायबर चोरट्यांनी खाते रिकामे केले. या प्रकरणी कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार … Read more

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएचा पुढाकार

सात दिवसांत ४१६ अतिक्रमणे निष्कासित महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाकडून जोरदार कारवाई सुरू आहे. गेल्या सात दिवसांत ४१६ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना निर्देश दिले होते. त्यानुसार, … Read more

अकाउंटंटने बांधकाम व्यावसायिकाला घातला १४ लाखांचा गंडा

खोट्या सह्या करून स्वतःच्या खात्यात घेतले पैसे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात अकाउंट्स ऑफिसर म्हणून काम करत असताना धनादेशावर खोट्या सह्या करून एका महिला अधिकाऱ्याने तब्बल १४ लाख ३१ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सौजन्य सूर्यकांत निकम (वय ३३, रा. नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more