आवृत्ती , पुणे

फुरसुंगी तलाठ्यासाठी लाच घेणारा खासगी व्यक्ती जाळ्यात

फेरफार व सातबारा नोंद करण्यासाठी मागितली लाच, एसीबीची कारवाई पुणे : फेरफार व सातबारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी तलाठीसाठी १० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी ५ हजार रुपये लाच घेताना खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ठकसेन ऊर्फ तुषार गलांडे (वय ४२, रा. नारायणनगर, फुरसुंगी गाव, ता. हवेली) असे या खासगी व्यक्तीचे नाव … Read more

नामांकित शेअर गुंतवणूकदार कंपनीच्या नावाने बनावट अ‍ॅप

सायबर चोरट्यांकडून शेअर बाजारातील नफा-तोट्याचे प्रलोभन देऊन फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंबईतील एका नामांकित शेअर गुंतवणूक कंपनीच्या नावाने तयार केलेल्या बनावट अ‍ॅपच्या माध्यमातून कोथरुड येथील एका व्यवस्थापकाची २९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाली. सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे संपर्क साधून या व्यक्तीला गुंतवणुकीचे आमिष दाखवले आणि मोठ्या नफ्याचे प्रलोभन देत मोठी रक्कम उकळली. … Read more

तरुणीला घरी नेऊन केला लैंगिक अत्याचार

व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, कोंढव्यातील प्रकार, क्लासमेटला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: महाविद्यालयातील एका तरुणीला घरी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या १९ वर्षीय तरुण क्लासमेटला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाने पीडितेचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केले आणि दोन महिन्यांहून अधिक काळ तिच्यावर अत्याचार करत राहिला. नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान हा … Read more

कारागृहातील मैत्रीतून पुण्यात लावला घरफोडींचा सपाटा

टोळीने लुटले ८० लाखांचे दागिने, स्वारगेट पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोक्काच्या गुन्ह्यात दोन गुन्हेगारांची कारागृहात ओळख झाली. त्यांची मैत्री बळावल्यावर, सुटकेनंतर त्यांनी घरफोड्यांची मालिकाच सुरू केली. घरफोडीतून मिळालेल्या दागिन्यांचा व्यवहार करून मौजमजा करण्यात गुंतलेले हे गुन्हेगार शेवटी पोलिसांच्या सापळ्यात अडकले. १९ डिसेंबर रोजी सॅलसबरी पार्क परिसरातील घरफोडीच्या तपासादरम्यान तब्बल १६०० ते १७०० … Read more

महिला अकाऊंटंटकडून १७ लाखांचा अपहार

शुल्क अपहार लपवण्यासाठी हिशोबाची रजिस्टर चोरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणी काळभोर येथील मोडक इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकाऊंटंट म्हणून काम करत असलेल्या महिलेने शाळेच्या शैक्षणिक शुल्क, प्री-प्रायमरी शुल्क आणि युनिफॉर्म शुल्काचा अपहार करत तब्बल १६ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपहार लपवण्यासाठी हिशोबाची ८ रजिस्टर आणि पावत्यांची पुस्तके चोरून नेली … Read more

पोलीस ठाण्यात महिला अंमलदाराला चावा

चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणीचा गोंधळ, कोंढवा पोलीस ठाण्यात घडला प्रकार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात महिला पोलीस अंमलदारांच्या हाताला चावा घेतला, तर दुसऱ्या महिला अंमलदारांच्या पोटात लाथ मारली. तरुणीच्या वडिलांनी पोलिसांना ‘‘तुमची नोकरी घालवतो’’ अशी धमकी दिली. याप्रकरणी संबंधित महिला अंमलदारांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, फाल्गुनी कुमारन … Read more

घरफोडी करणाऱ्या अट्टल सराईत आरोपीकडून दोन गुन्ह्यांची उकल

भारती विद्यापीठ पोलीसांची दमदार कामगीरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: घरफोडीप्रकरणी कौशल्यपूर्ण तपास करत भारती विद्यापीठ पोलीसांनी अट्टल सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दि. ०५/१२/२०२४ रोजी फिर्यादी यांच्या राहत्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून दोन अनोळखी चोरट्यांनी हॉलच्या पोटमाळ्यावरील लोखंडी पेटी फोडून त्यातील १,००,०००/- रुपये लंपास केले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून … Read more

जबरी चोरीप्रकरणी फरार आरोपीला जेरबंद

युनिट ६ गुन्हे शाखा, पुणेची धडाकेबाज कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: गंभीर दुखापत करून जबरी चोरी करणाऱ्या आणि दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने अटक केली आहे. दि. १४/०१/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक वाहिद सकटे यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना माहिती मिळाली की, विमाननगर … Read more

नारायण पेठेत भरदुपारी घरफोडी; ६ लाख २९ हजारांचा ऐवज लंपास

मोदी गणपती मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरात चोरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ज्येष्ठ नागरिक दर्शनासाठी मोदी गणपती मंदिरात गेले असताना घरफोडी करत चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेला ६ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. हा धक्कादायक प्रकार नारायण पेठेतील आयतोळे बिल्डिंगमध्ये सोमवारी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या दरम्यान घडला. याप्रकरणी … Read more

भरधाव वेगातील कार उलटून तरुणीचा मृत्यू

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील भीषण अपघात; सात जण जखमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव वेगाने जाणारी कार उलटून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला, तर चालकासह सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी … Read more