आवृत्ती , पुणे

बार्शीच्या व्यापाऱ्यास बनावट सोने देऊन १० लाखांची फसवणूक

अनामिक महिला आणि पुरुषावर फसवणुकीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : शहरातील एका व्यापाऱ्यास बनावट सोने देऊन १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अनामिक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नील हिरालाल जैन (वय ३८) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीचे बार्शीतील तेजस हार्डवेअर आणि … Read more

वाहन चोरीच्या मोडसवरून रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांनी तीन वाहनचोरीचे गुन्हे आणले उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरीची पद्धत (मोडस ऑपरेंडी) ओळखून बिबवेवाडी पोलिसांनी सराईत वाहन चोरट्याला जेरबंद केले. यश ज्ञानेश्वर खलसे (वय १९, रा. आगम मंदिराजवळ, कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून यामाहा एफझेड, होंडा शाईन आणि अ‍ॅक्टीव्हा या तीन दुचाकींची, अंदाजे दीड लाख रुपये किमतीची … Read more

अधिकार्‍याने कंपनीला घातला ३५ लाखांचा गंडा

कल्याणीनगरमधील जॉय अँड क्रू व्हेकेशन्स एलएलपी कंपनीतील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कल्याणीनगर येथील जॉय अँड क्रू व्हेकेशन्स एलएलपी या कंपनीमध्ये काम करत असलेल्या अधिकाऱ्याने कंपनीच्या बँक खात्यातून तब्बल ३४ लाख ७१ हजार रुपये काढून कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कंपनीच्या वतीने आशिष मुळे (वय ४७, रा. हिंगणे) यांनी येरवडा पोलीस … Read more

खासगी कारमधून प्रवासी वाहतूक केली तर कारवाई

‘आरटीओ’कडून सहा पथके तैनात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणे बेकायदेशीर आहे, असे मोटार वाहन कायद्यानुसार नमूद आहे. मात्र, पुण्यात अशा प्रकारची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाई सुरू केली आहे. पुण्यात अनेक कारचालक खासगी वाहनांचा वापर करून प्रवाशांची वाहतूक करत आहेत. त्यामुळे तक्रारी … Read more

महिलेचे प्राण वाचविणाऱ्या दामिनी मार्शलच्या उत्कृष्ट कोऑर्डिनेशनचे कौतुक

पतीशी झालेल्या भांडणानंतर महिला आत्महत्येच्या प्रयत्नात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पतीसोबत झालेल्या भांडणामुळे नैराश्यात गेलेल्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला; परंतु दामिनी मार्शलच्या तात्काळ कोऑर्डिनेशनमुळे तिचे प्राण वाचले. ही घटना बुधवार, दुपारी १२:४० वाजता घडली. शिवाजीनगर दामिनी मार्शलना एका महिलेचा फोन आला, “मी आत्महत्या करीत आहे,” असे सांगून महिलेने फोन बंद केला. शिवाजीनगरच्या दामिनी मार्शल … Read more

ब्ला ब्ला कार ॲप आता पुणे RTO च्या रडारवर

पिकअप पॉईंट शोधून होणार कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: मुंबई-पुणे प्रवासासाठी ब्ला ब्ला ॲपचा वापर करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या ॲपच्या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात असून, हे ॲप आणि त्याचा वापर करणारे कार चालक आता पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) रडारवर आले आहेत. पुणे RTO मार्फत त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. … Read more

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक

सरकारचा मोठा निर्णय : इंग्रजी शाळांवर होणार कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डाच्या शाळांकडून मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जात होती. यासंदर्भात नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी भाषा पर्यायी केल्याचीही चर्चा होती. मात्र, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आता मराठी भाषा शिकवणं सर्व शाळांसाठी अनिवार्य केलं असल्याची … Read more

ठेकेदार विठ्ठल पोळेकर हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार जेरबंद

पावणे दोन महिने पोलिसांना गुंगारा देत होता, सातारा-पुणे रोडवर अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डोणजे येथील शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करणारा सराईत गुन्हेगार योगेश भामे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. विविध ठिकाणी पावणे दोन महिन्यांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देत असलेला भामे सातारा-पुणे रोडवर सापळा लावून जेरबंद करण्यात … Read more

मोक्का प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात एक वर्षाहून अधिक काळ होता फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून एक वर्षाहून अधिक काळ फरार असलेल्या आरोपीला अखेर गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने पकडले आहे. मोन्या ऊर्फ प्रज्योत बाळकृष्ण उमाळे (वय २३, … Read more

हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या युगुलांना लुटणाऱ्यांना अटक

चार गुन्हे उघडकीस; साडेतीन लाखांचे दागिने हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या वर्षभरात हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या युगुलांना शस्त्राचा धाक दाखवून आणि प्रसंगी मारहाण करून लुटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात चार गुन्हे उघडकीस आले असून, साडेतीन लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल यांनी … Read more