आवृत्ती , पुणे

पत्नी माहेरी आल्याने जावयाने सासुच्या घराला लावली आग

कोथरुडमधील सुतारदरा येथील घटनेत संसारोपयोगी साहित्य जळून खाक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दोघा पतीपत्नीत भांडणे झाल्याने सासुने सुनेला माहेरी पाठविले. पत्नी माहेरी आल्याचा राग आल्याने जावयाने पाच मिनिटामध्ये घरी नाही आलीस तर तुझ्या आईचे घर जाळून टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने खरोखरच आपल्या सासरच्या घराला आग लावून दिली. त्यात घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य … Read more

बनावट कपडे विक्री करणार्‍या दुकानातून ३५ लाखांचा माल जप्त

कोरेगाव पार्कमध्ये दोन दुकानांवर कारवाई : तिघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ब्रॉन्डेड कंपनींचे बनावट कपडे विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी छापा घालून ३५ लाख ३१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन दुकानातील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश विष्णु कांबळे (वय ४२, रा. जनवाडी) यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद … Read more

वेश्या व्यवसाय करणार्‍या स्पामालकाला अटक

धानोरीतील गुडविल स्क्वेअर मॉलमधील स्पामधून दोन महिलांची सुटका पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्‍या अरमोनिया फॅमिली स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून दोन पिडित महिलांची सुटका केली. तेथील स्पा मॅनेजर व मालकाला अटक केली आहे. सुरज भरत शाहू (रा. वाशी, ठाणे, सध्या रा. पुणे) असे स्पा मॅनेजर व मालकाचे नाव आहे. याबाबत अनैतिक मानवी … Read more

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर अत्याचार

कात्रजमधील संतापजनक घटना : सैन्य दलातील निवृत्त व्यक्तीने चार वर्षे केले अत्याचार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीवर पोलीस भरतीमध्ये मदत करण्याचे आमिष दाखवत, चार वर्षांपासून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कात्रजमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी राजू परांदे (वय ४८, … Read more

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक

निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नागरिकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ठेवी घेऊन मुदत संपल्यानंतर त्या परत न करता नागरिकांची १ कोटी ७९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक केली आहे. याबाबत प्रतिभा विलास पानसे (वय ७८, रा. शोभानगर … Read more

पुमा कंपनीचा लोगो वापरुन बनावट मालाची विक्री

आंबेगाव येथील दुकानातून ८ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुमा कंपनीचा लोगो वापरुन बनावट बॅग, टि-शर्ट, स्पोट्स शुज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्रॉव्हझर, बॉक्सर पॅन्टची विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा घालून ८ लाख रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे. स्टाइलॉक्स फॅशन हब (रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव बुद्रुक, कात्रज) या दुकानमालकावर आंबेगाव पोलीस ठाण्यात … Read more

बाणेरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

मून थाई स्पामधून तीन महिलांची सुटका महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणार्‍या मून थाई स्पावर भरोसा सेलच्या पथकाने छापा टाकून मॅनेजरला अटक केली आहे. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी बाणेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. स्पा मॅनेजर सताऊद्दीन मोहम्मद दिलवार हुसेन (वय २२, … Read more

प्रियकराच्या मानसिक त्रासामुळे अल्पवयीन मुलीची आत्महत्या

येरवड्यातील घटना : प्रियकराला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणेः भुलथापा देऊन प्रेमात पाडल्यानंतर प्रियकराने मानसिक त्रास दिल्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरी साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवड्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी केविन चंदेवळ (वय १८, रा. येरवडा) याला … Read more

बंगलोरहून थेट पुण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेवर कारवाई

कामाच्या शोधात पुण्यात दाखल; बेकायदेशीर प्रवेशामुळे गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गलोरहून रेल्वेने थेट पुण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुसलामिया अब्दुल अजिज प्यादा (वय २७, रा. पश्चिम कोलागासिया, थाना आमतुली, जि. बोरगुना, बुलिशाखाली, बांगलादेश) असे तिचे नाव आहे. याबाबत … Read more

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : विधानसभा निवडणूक 2024 शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडल्याबद्दल बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी बार्शी तालुका पोलीस ठाण्याने तालुक्यातील संवेदनशील गावांमध्ये शांतता आणि सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले. सोलापूर ग्रामीण पोलीस … Read more