आवृत्ती , पुणे

नानापेठेत दहा लाखांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त

समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : अमली पदार्थ विरोधी पथक २ ची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अमली पदार्थ विरोधी पोलिसांच्या पथक २ ने समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये नानापेठेत कारवाई करीत कोंढव्यातील दोघाकडून कर्नाटकातून बेकायदा विक्रीसाठी आणलेला 10 लाख 84 हजार 716 रू कि.चा. प्रतिबंधित पान मसाला जप्त केला आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली … Read more

सराईत चोरट्याकडून पिस्तोल, जिवंत काडतूस जप्त

लोणीकंद पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलिसांनी पुणे-नगर रस्त्यावर कारवाई करत, जबरी चोरी करणाऱ्या दोघांकडून १ वाहन, १ देशी बनावटीचे पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. लोणीकंद पोलिसांनी मागील ३० दिवसांत ८ देशी बनावटीची पिस्तुल आणि २६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

आंबेगावात तब्बल ५६ लाखांची अफू जप्त

भारती विद्यापीठ पोलिस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलिस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने आंबेगाव परिसरात धडक कारवाई करून रस्त्यावर विक्रीसाठी आणलेली ५६,९०,०००/- रुपये किंमतीची अफू जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पोलिस पथक पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशनच्या … Read more

येवलेवाडीत काचा उतरवताना ४ कामगारांचा मृत्यू

पाच कामगार गंभीर : अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येवलेवाडीत रविवारी काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला, तर पाच कामगार गंभीर जखमी झाले. येवलेवाडी येथे दुपारी दीड वाजता एका काचेच्या कारखान्यात माल उतरवताना हा अपघात झाला. काच उतरवताना काचा असलेले बॉक्स अंगावर पडून कामगार अडकले. क्रेनच्या … Read more

शेअर्स खरेदी-विक्रीच्या बहाण्याने ६३ लाखांचा गंडा

सिंहगड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर्स खरेदी-विक्रीत मोठा नफा मिळू शकतो, असे आमिष दाखवून धायरीतील एका तरुणाची तब्बल ६३ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अनोळखी लोकांनी धायरीतील फिर्यादीला आपण एका नामांकित बँकेचे सिक्युरिटीज स्टॉक अॅनालिसिस कंपनीचे एजंट असल्याचे सांगितले. त्यांनी फिर्यादीला बँकेचे अॅप … Read more

क्रेडीट कार्ड कॅशबॅकच्या नावाखाली १७ लाखाची फसवणूक

अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : क्रेडिट कार्ड कॅशबॅकच्या नावाखाली पॅन कार्ड नंबर घेऊन एका महिलेची १७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एरंडवणे येथील तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १० एप्रिल रोजी घडला आहे. अनोळखी तरुणाने तिच्याशी संपर्क साधून, क्रेडिट कार्ड कॅशबॅकच्या … Read more

भरधाव क्रेनच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

खडी मशीन चौकाच्याजवळ अपघात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव क्रेनच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना खडी मशीन चौकाजवळ घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. खडी मशीन चौकाच्या पुढे बालाजी हॉटेलजवळ हा अपघात झाला. क्रेन चालक भगवान देवकर (वय ४१, रा. औरंगपूर, बीड) याला पोलिसांनी अटक केली … Read more

बारामतीच्या मुलींवर हडपसरमध्ये ११ जणांकडून अत्याचार

बारामती पोलिसांत दोन तक्रारींवरून गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर हडपसर परिसरातील मित्राच्या खोलीत चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार १४ सप्टेंबर रोजी उघड झाला होता. याप्रकरणी बारामती पोलिसांनी चौघांना अटक केली होती. आता याप्रकरणी पोलिस तपासात या दोन अल्पवयीन मुलींवर यापूर्वी आणखी सात जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले … Read more

सराईत चोरट्यांकडून २० दुचाकी जप्त

कोंढवा पोलिसांची कामगिरी : तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर आणि ग्रामीण भागातील डिलेव्हरी बॉय आणि इतर नागरिकांच्या दुचाकी चोरणाऱ्या अट्टल सराईत तीन चोरट्यांकडून एकूण ७,३०,०००/- रुपये किमतीच्या २० दुचाकी जप्त करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरी प्रकरणी घडलेल्या गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या उद्देशाने पेट्रोलिंग करताना, सीसीटीव्ही … Read more

वाडियातील सामुहिक बलात्कार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

आमदार रवींद्र धंगेकर यांचे पोलिस आयुक्तांना पत्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्याच्या कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू परिसरातील वाडिया महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना दडपण्याचा प्रयत्न प्राचार्य व संस्थाचालक करीत असल्याचा आरोप पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला आहे. काही दिवसापुर्वी वाडिया महाविद्यालयातील अकरावी व बारावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर … Read more