आवृत्ती , पुणे

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना शस्त्रासह अटक

उत्तमनगर पोलिसांची कारवाई, अल्पवयीन मुलगाही ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना शस्त्रासह अटक करण्यात उत्तमनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्या कडून धारदार शस्त्रेही जप्त केली आहेत. एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले असून तीन जण पळून गेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत जमले असल्याची माहिती पोलिसांना … Read more

कोयता बाळगणारा तडिपार सराईत गुन्हेगार अडकला जाळयात

बिबवेवाडी पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बेकायदेशीररीत्या कोयता बाळगणारा आणि परिसरात दहशत निर्माण करणारा रेकॉर्डवरील तडीपार सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ सप्टेंबर रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले आणि पोलीस अंमलदार शिवाजी येवले व सुमित तापकीर यांना रात्रगस्तीदरम्यान माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील … Read more

मॉर्निग वॉक करताना मंगळसूत्र हिसकावले

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टिंगरेनगर येथे एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक दरम्यान दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंगरेनगर मधील एक तरुणी रविवारी (दि. २२ सप्टेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास सनशाईन हॉटेलच्या समोरील रस्त्यावर शारदा हॉटेलजवळून … Read more

पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक

स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ५ वर्षांपासून १८ गुन्ह्यांतील फरार आरोपीस अटक केली असून आवताडे शुगर फॅक्टरी, मंगळवेढा येथील चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री आवताडे शुगर फॅक्टरी, बालाजी नगर, … Read more

पेट्रोल, डिझेल चोरी प्रकरणी मडीखांबे टोळीवर मकोका कारवाई

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: लोणीकाळभोर येथील टँकरमधील अवैध डिझेल आणि पेट्रोल चोरी प्रकरणातील सूत्रधार प्रविण सिद्राम मडीखांबे (टोळी प्रमुख) आणि त्याच्या ११ साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध पेट्रोल आणि डिझेल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान कुंजीरवाडी थेऊर फाटा (ता. हवेली, जि. … Read more

कात्रज स्मशानभूमीजवळ अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल जप्त

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज स्मशानभूमीजवळ अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ सप्टेंबर रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस अंमलदार चेतन गोरे, हनुमंत मासाळ, शैलेंद्र साठे यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एकजण कात्रज स्मशानभूमीजवळ पिस्तूलसारखे हत्यार कमरेला लावून … Read more

निक्या कांबळे आणि तिघांवर मकोका अंतर्गत कारवाई

येरवडा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एन. के. गँगचा म्होरका निखील उर्फ निक्या मधुकर कांबळे (टोळी प्रमुख) आणि त्याचे इतर ३ साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे येथे फिर्यादी यांचे पोटाला पिस्तूल लावून धमकी देऊन गळ्यातील ९,०००/- रुपये … Read more

खून करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

वारजे पोलीस आणि गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कर्वेनगर येथे चोरीच्या बहाण्याने खून करणाऱ्या आरोपीला १० तासांच्या आत वारजे पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबरच्या मध्यरात्री वारजे पोलीस ठाणे हद्दीतील कर्वेनगर परिसरात चोरी करून खून झाल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रकरणी वारजे पोलीस … Read more

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

हडपसर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर पोलिस स्टेशन आणि पुणे शहर हद्दीत मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या टोळी प्रमुखाला हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. दहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) अश्विनी राख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी … Read more

बालेवाडीत गॅरेजवर दरोडा, ६९ हजार लुटले

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गॅरेजवर दरोडा टाकून चोरट्यांनी ६९ हजार रुपये लुटल्याची घटना बालेवाडीत घडली आहे. या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली असून, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे ७:३० च्या सुमारास घडली. रविराज … Read more