आवृत्ती पुणे

गँगस्टर बंडु आंदेकर याला खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी

भवानी पेठेतील अतिक्रमण करून बांधलेल्या इमारतीत भाडेकरू ठेवून घेत होता भाडे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गँगस्टर व आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडु आंदेकर याला भवानी पेठेतील जमिनीवर अतिक्रमण करून त्यावर बेकायदा बांधलेल्या इमारतीत भाडेकरू ठेवून त्यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली … Read more

दोघा वाहनचोरांना पकडून ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस

वाघोली ते शेवगाव-नेवासा रोडपर्यंत १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे काढला माग महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाघोली येथील रॉयल इनफिल्ड बुलेट चोरीच्या दुचाकीचा तपास करताना पोलिसांनी वाघोली ते शेवगाव-नेवासा रोडपर्यंतच्या तब्बल १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मागोवा घेत दोघा सराईत वाहनचोरांना जेरबंद केले आहे. वाघोली पोलिसांनी ३ वाहने जप्त केली आहेत. रामेश्वर अंकुश धनगर (वय २८, रा. गणेशनगर, पैठण, … Read more

दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या २०१ वाहनचालकांवर कारवाई

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नववर्षाचे स्वागत करताना ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणावर मद्यपान केले जाते. त्यानंतर दारूच्या नशेत वाहन चालवल्याने अपघात घडतात. अशा वाहनचालकांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक शाखेने तीन दिवस नाकाबंदी करून तपासणी करत २०१ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली आहे. वाहतूक शाखेने १९ ते २१ डिसेंबर या तीन दिवसांत शहरातील विविध भागांमध्ये ३० ठिकाणी … Read more

ज्येष्ठ नागरिकाला लुटणारा चोरटा जेरबंद

रामटेकडी परिसरातील निर्जन रस्त्यावर चौघांनी मारहाण करून केली होती लूट : वानवडी पोलिसांची यशस्वी कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रामटेकडी परिसरात निर्जन रस्त्यावरून जाणाऱ्या एका वयोवृद्ध नागरिकाला अडवून चौघांनी मारहाण करत लुटल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणातील एका चोरट्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. उमर नूर खान (वय १८, रा. नवाधिश पार्क, कोंढवा) … Read more

अपघात झाल्याचे कारण सांगून नुकसानभरपाईच्या नावाखाली कारचालकाला लुटले

सिंहगड रस्त्यावरील घटना : गळ्यातील ३ लाखांची सोनसाखळी हिसकावली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अपघात झाल्याची बतावणी करून नुकसानभरपाईच्या नावाखाली कारचालकाला लुटण्यात आल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी परिसरात घडली. दुसऱ्या कारमधील चोरट्यांनी धमकावून तक्रारदार कारचालकाच्या गळ्यातील ३ लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका कारचालकाने नांदेड … Read more

पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या गुंडावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

पोलिसांच्या प्रतिउत्तरात गुंड जखमी : वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी होता वाँटेड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चंदननगरमधील बिडी कामगार वसाहतीतील वाहनांच्या काचा फोडून नुकसान करणाऱ्या सराईत गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. प्रतिउत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा गुंड जखमी झाला. पोलिसांनी या गुंडावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ओंकार दिलीप भंडारी (वय २६, … Read more

टिपू पठाण टोळीवरील मोक्का कारवाईतील दोन फरार गुंड जेरबंद

महिलेची जागा बळकाविल्या प्रकरणात खंडणीचा गुन्हा : युनिट ५ च्या पथकाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सय्यदनगर येथील महिलेची जागा बळकावून ती परत हवी असल्यास २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टिपू पठाण टोळीतील १३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. या टोळीतील दोन गुन्हेगार गेल्या दोन महिन्यांपासून फरार होते. … Read more

बीडमधील आंतरराज्य टोळीकडून मंगळसूत्र चोरीचे ६ गुन्हे उघडकीस

कोरेगाव भीमा जयस्तंभाला अभिवादनासाठी आलेल्या महिलांचे दागिने लंपास : २० लाखांचा ऐवज जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोरेगाव भीमा येथील जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी राज्यभरातून लाखो भाविक येतात. या गर्दीचा गैरफायदा घेत महिलांची मंगळसूत्रे चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट–६ च्या पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत सहा गुन्हे उघडकीस आणून … Read more

सायबर चोरट्यांकडून २ कोटी ४५ लाखांची फसवणूक

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यात एकाच दिवसात ११ गुन्हे दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर बाजारातील गुंतवणुकीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांकडून फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुणे शहर पोलीस दलात एकाच दिवसात वेगवेगळ्या ११ गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्यामध्ये एकूण २ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले … Read more