आवृत्ती पुणे

मुंबई सायबर क्राईम पोलिसांच्या नावाने महिलेला गंडा

पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगून केली ७ लाखांची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंबई सायबर क्राईम येथून बोलत असल्याचे सांगून “तुमचे ब्लू डार्ट पार्सल आले आहे, त्यात ड्रग्ज सापडले आहेत” असे सांगून अटक होण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ५८ वर्षांच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

फसवणुकीच्या ४ कोटींच्या गुन्ह्यात मागितली २ कोटींची लाच

पहिला हप्ता स्वीकारताना पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेतील पीएसआयला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर विकल्याचे भासवून तब्बल ४ कोटी रुपयांची फसवणूक केलेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना मदत करण्यासाठी तब्बल २ कोटी रुपयांची लाच मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या २ कोटी रुपयांपैकी पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पिंपरी चिंचवड … Read more

वृद्ध महिला घरात मृतावस्थेत आढळली

मुलीला चोरीचा संशय : धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीतील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीतील घरात ७५ वर्षीय महिला मृतावस्थेत आढळून आल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसून, डॉक्टरांनी व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवला आहे. मृत महिलेचे नाव कुसुम पन्हाळे (वय ७५, रा. शंकर महाराज वसाहत, … Read more

आरटीओ चलनाची एपीके फाईल आलीय, ओपन करु नका

आर टी ओ चलनाची एपीके फाईल पाठवून व्यावसायिकाला अडीच लाखांचा गंडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “आरटीओ चलनाची एपीके फाईल” असा मेसेज आला तर सावध राहा! ही फसवणुकीची नवीन पद्धत असून, अशा फाईल्स ओपन केल्यास काही सेकंदांत तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. कात्रजमधील एका व्यावसायिकाला अशाच प्रकारे अडीच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. … Read more

एकतेसाठी धावणार बार्शी ‘रन फॉर युनिटी’ महोत्सव

पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वात उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : भारताचे लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बार्शी शहर पोलीस स्टेशनतर्फे ‘रन फॉर युनिटी’ या भव्य एकता दौड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी … Read more

गॅंगस्टर नीलेश घायवळच्या साथीदारावर फसवणुकीचा गुन्हा

मित्राची कागदपत्रे वापरून मिळविले सीमकार्ड : त्यावरून केले आर्थिक व्यवहार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेतीसाठी कर्ज मिळवून देतो आणि नीलेश घायवळकडून नोकरी लावून देतो, असे सांगून मित्राची कागदपत्रे घेऊन त्यांचा गैरवापर करणाऱ्या नीलेश घायवळच्या साथीदारावर वारजे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अमोल दत्ता लाखे (रा. लाखणगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव … Read more

दूबार नाव तपासा, नागरिकांना आवाहन

बार्शी नगरपरिषद मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी दिलेली माहिती महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : आगामी बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने तयार करण्यात येत असलेल्या मतदार यादीत राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त दोन प्रभागांमध्ये नावे असलेल्या मतदारांची संभाव्य यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी नागरिकांच्या पाहणीसाठी बार्शी नगरपरिषद कार्यालयातील नोटीस बोर्डवर तसेच अधिकृत संकेतस्थळावर https://mahaulb.in/MahaULB/index उपलब्ध … Read more

तृतीयपंथीयासह महिलेकडून मेफेड्रॉन पकडले

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मांजरी परिसरात कारवाई : ३ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्य पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने मांजरी परिसरात मेफेड्रॉन (एम.डी.)ची विक्री करताना तिघांना पकडले. त्यांच्याकडून ३ लाख ४१ हजार ९५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. मेघा दीपक जगताप (वय २७, रा. … Read more

अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

भाड्याच्या जागेत थाटले होते बनावट कार्यालय : ९ जणांना गंडा घालून आरोपी फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका इसमाने नऊ जणांची तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे स्टेशन परिसरातील परमार बिल्डिंगमध्ये ‘अ‍ॅडमिशन अ‍ॅडव्हायझर’ नावाने भाड्याच्या जागेत कार्यालय सुरू करून आरोपीने हा गैरप्रकार … Read more