आवृत्ती , पुणे

प्रा. डॉ. डी. व्ही. शिंदे यांची शंकरराव पाटील महाविद्यालय, भुमच्या प्राचार्यपदी नियुक्ती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : येथील शंकरराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. डॉ. डी. व्ही. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्त त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डी. डी. बोराडे, तसेच काटे, अतुल सुरवसे, संतोष शिंदे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी प्राचार्य डॉ. शिंदे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

पुणे बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. हेमंत झंजाड विजयी

उपाध्यक्षपदी अ‍ॅड. समीर भुंडे, अ‍ॅड. सुरेखा भोसले : सचिवपदी अ‍ॅड. पृथ्वीराज थोरात, अ‍ॅड. भाग्यश्री गुजर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वकिलांची प्रमुख संघटना असलेल्या पुणे बार असोशिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अ‍ॅड. हेमंत झंजाड यांनी अध्यक्षपद पटकावले. उपाध्यक्षपदी अ‍ॅड. समीर भुंडे आणि अ‍ॅड. सुरेखा भोसले, तर सचिवपदी अ‍ॅड. पृथ्वीराज थोरात आणि अ‍ॅड. भाग्यश्री गुजर विजयी झाले. खजिनदारपदी … Read more

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे ७५% काम पूर्ण

लवकरच मीटरद्वारे पाणीपट्टी आकारणी सुरू : महापालिकेच्या हालचालींना वेग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेच्या चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे ७५% काम पूर्ण झाले असून, ज्या भागांमध्ये हे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी मीटरद्वारे पाणीपट्टी आकारण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने सादर केला आहे. लवकरच या प्रस्तावावर महापालिकेच्या पातळीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. शहरातील सर्व … Read more

भूमीहिनांकडून लाच घेताना दोन महिला संगणक ऑपरेटर अटकेत

दाखला देण्यासाठी ४०० रुपयांची लाच : हवेली तहसील कार्यालयात सापळाकारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हवेली अप्पर तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात दाखले देण्यासाठी लाच घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भूमिहीन असल्याचा दाखला देण्यासाठी ४०० रुपयांची लाच घेताना दोन महिला संगणक ऑपरेटरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अटक करण्यात आलेल्या महिला संगणक ऑपरेटर म्हणजे वंदना … Read more

चिंतामणी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

२०१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : गणेश जयंती निमित्त चिंतामणी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण २०१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. या शिबिरात श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीचे तज्ज्ञ उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. चिंतामणी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि … Read more

वाघोली में जैन स्थानक भवन का उद्घाटन सोमवार को

प. पू. युवाचार्य महेंद्रऋषीजी म. सा. का 44वां दीक्षा दिवस समारोह महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : नवकार प्रतिष्ठान और वाघोली श्री जैन श्रावक संघ के सहयोग से निर्मित जैन स्थानक भवन का उद्घाटन एवं प. पू. युवाचार्य महेंद्रऋषीजी म. सा. का 44वां दीक्षा दिवस समारोह सोमवार, 3 फरवरी 2025 को वाघोली में आयोजित किया है। … Read more

लोहगाव, आनंदनगर, विमाननगर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

२५ लाख ५१ हजारांचे मॅफेड्रॉन व गांजा जप्त; तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोहगाव-वाघोली रोडवरील संतनगर, बिबवेवाडी येथील आनंदनगर आणि विमाननगर येथे गेल्या दोन दिवसांत अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत २५ लाख ५१ हजार रुपयांचे मॅफेड्रॉन (एम.डी.) आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ … Read more

सुलाखे हायस्कूल बार्शी येथे क्रीडा सप्ताहांतर्गत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : सुलाखे हायस्कूल बार्शी येथे क्रीडा सप्ताहाच्या निमित्ताने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन प्रशालेच्या वतीने करण्यात आले. ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांच्या हस्ते प्रशालेच्या गरुड ध्वजाचे ध्वजारोहण व क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सुलाखे … Read more

गजा मारणेच्या नावाने १३ इंस्टाग्राम अकाऊंट अ‍ॅक्टीव्ह

गुन्हेगारी रील्स बनवून सोशल मीडियावर प्रसारित करणारे चौघे जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: गुन्हेगारीचे उदात्तीकरण करून समाजामध्ये भीती व दहशत पसरवणारे व्हिडिओ, रील्स सोशल मीडियावर टाकणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. गजानन मारणे याच्या नावाने तब्बल १३ इंस्टाग्राम अकाऊंट अ‍ॅक्टीव्ह असल्याचे उघड झाले आहे. अक्षय निवृत्ती शिंदे (वय २०, रा. निमगाव खालु, ता. श्रीगोंदा, जि. … Read more

अनैतिक संबंधांमुळे तरुणाचा खून

कोथरुडमधील घटना, चार अल्पवयीन मुले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: अनैतिक संबंधांमुळे एका तरुणावर अल्पवयीन मुलांनी पालघनने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. कोथरुड पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. राहुल दशरथ जाधव (वय ३०, रा. उंबरे, ता. भोर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ केतन … Read more