आवृत्ती , पुणे

झाडांना राखी बांधून ‘प्राईड स्कूल’ ने दिला पर्यावरणाचा संदेश

पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : येथील प्राइड इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यानी झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. राखी पौर्णिमेनिमित्त प्राइड इंग्लिश स्कूलच्या बाल विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन व पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी वृक्षांना राखी बांधली. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने होणाऱ्या पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी वृक्षांचे महत्त्व पटवून देण्यासाठी या शाळेतील बाल विद्यार्थ्यांनी वृक्षांना … Read more

आधार प्रमाणीकरण न केल्याने अनेकांना बसला फटका

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘राज्यातील ३३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना ‘आधार’च्या प्रमाणीकरणा अभावी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे योजनेंतर्गत मिळणाऱ्या ५० हजार रुपयांचा लाभ त्यांना मिळाला नाही. हा लाभ मिळविण्यासाठी येत्या ७ सप्टेंबर पर्यंत बँक खात्याशी आधार क्रमांक जोडावा (लिंक) लागणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले … Read more

जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे भावाची इच्छा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ पुणे : जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे भावाची इच्छा महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनीच्या फुललेला श्री शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा. अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चा पुणे येथे … Read more

मंत्रोच्चारांचे सामर्थ्य मोठे : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रगल्भ विचारांचे मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ध्वनिमुद्रित मंत्रोच्चारांचा आधार घेऊन आधी तन्मयता प्राप्त करावी. जेव्हा हे मंत्रोच्चार तुमचे होऊन जातील तेव्हा तुमच्या आवाजात मंत्रोच्चाराचे वलय घरात जरुर निर्माण होऊ द्या. त्यातून परिवारात सुख शांती निर्माण होण्यास मदत होईल. मंत्रांचा प्रभाव आणि शक्ती खूप मोठी असते, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य … Read more

रक्षाकलशात सुखशांतीचे सामर्थ्य : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनातून मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अंधकार आपोआप होत जातो. परंतु प्रकाश होण्यासाठी दिवा लावावा लागतो. अंधकार दूर करण्यासाठी काही वेगळे करावे लागत नाही. जीवनाची विषमता, विशाद, विकृती आपोआप जीवनात येतात. त्याला दूर करण्यासाठी मंत्रशक्ती आहे. त्यासाठी पवित्र मातीने भरलेला रक्षकलश आपल्या जवळ असणे गरजेचे आहे. तो आपल्या घरी सुखशांती नक्की … Read more

स्वारगेट-कात्रज मार्गावरून भुयारी मेट्रो, कात्रजहून हिंजवडी पर्यंत कधी?

केंद्राची मंजुरी : २ हजार ९५४ कोटीं रुपयांचा खर्च महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट ला मेट्रोने जायचे कात्रज करांचे स्वप्न आता पाच वर्षात प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण  स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्रसरकारकडे मान्यतेसाठी प्रलंबित होता.५.४६ किलोमीटरचे हे अंतर असून,त्यासाठी … Read more

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग वाहतुकीत आज बदल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ चे उ‌द्घाटन शनिवारी (दि. १७) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-बंगळुरू महामार्गावर (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) शनिवारी (दि. १७) सकाळी ६ ते रात्री ८ या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेश बंद असेल, कात्रज चौकापासून पुढे नवले बीज … Read more

शेठ बेचरदास जैन ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्टच्या वतीने शुक्रवार पेठेतील जयराज भवन या संस्थेच्या वास्तुमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष भरतभाई केशवलाल शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी लुई – ब्रेल अंध, अपंग कल्याण संस्थेच्या कलाकारांनी देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम सादर केला. या संस्थेस स्वातंत्र्यदिनानिमित्त ट्रस्टच्या वतीने रु.३१००० ची देणगी महाराष्ट्र राज्याच्या … Read more

स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनच्या एमडी आणि सीईओ पदी अतुल सक्सेना

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCHIL) या IFCI लिमिटेडच्या सहयोगी कंपनीने अतुल सक्सेना यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. अतुल सक्सेना यांच्या कडे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानातील सल्लामसलतीसह कॉर्पोरेट फायनान्स आणि भांडवली बाजारपेठेचा २५ हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण कौशल्यांसह क्रेडिट … Read more