आवृत्ती , पुणे

G Tribe Experience च्या वतीने महिलांचा दयारा बुग्यल शिखर विजय

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : G Tribe Experience या कंपनीच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील डॉ. अंकिता लोढा आणि 16 महिलांनी 26 जानेवारी 2025 रोजी उत्तराखंडातील दयारा बुग्याल (12,000 फूट) या उंच शिखरावर विजय मिळवला. भारतीय राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा करत त्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली. हा विशेष ट्रेक G Tribe Experience च्या पिंपरी-चिंचवड येथील … Read more

‘त्या’ अ‍ॅपवर ओळख वाढवून लुटणारी टोळी जेरबंद

लुटमारीचा नवा प्रकार उघड : नांदेड सिटी पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : डीएसके रोड ते रायकर मळा दरम्यान गाड्या अडवून लुटणाऱ्या टोळीचा नवा प्रकार समोर आला आहे. “माझ्या घरी मेडिकल इमर्जन्सी आहे,” असे सांगून गाड्यांवर बसणाऱ्या तरुणांना निर्जन स्थळी नेऊन लुटणारी ही टोळी कार्यरत होती. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका संदेशाच्या आधारे नांदेड सिटी … Read more

श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ध्वजारोहण व राष्ट्रगीताच्या साक्षीने राष्ट्रीय उत्सवाचे औचित्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी “प्रजासत्ताक दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ध्वजारोहणाचा कार्यक्रम व राष्ट्रगीताचे सादरीकरण जैनाश्रमच्या श्राविका शोभाबेन संचेती, मितेश संचेती व खुशबू … Read more

दारूसाठीच्या पैशांवरून सख्या भावावर कुर्‍हाडीने वार

आईला मारहाणीपासून सोडवण्यासाठी धावला भाऊ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावर नकार दिल्याने मुलाने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रसंगी आईला वाचवण्यासाठी धावून आलेल्या सख्या भावावर कुर्‍हाडीने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत जखमी दिगंबर अरुण जाधव (वय ३५, रा. रामोशीवाडी, गोखलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी … Read more

नितीन ओस्तवाल यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा उपक्रम

वानवडी येथे अपंग मुलांना मदतीचा हात महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : नितीन हरकचंदजी ओस्तवाल यांनी आपला ६० वा वाढदिवस समाजसेवेसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरवत साजरा केला. या विशेष प्रसंगी त्यांनी अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र, वानवडी येथे १२ संच एल्बो क्लच (चालण्यासाठी सहाय्य करणाऱ्या काठ्या) अपंग मुलांना प्रदान करून अनोखा उपक्रम राबवला. लाभार्थी … Read more

महाराष्ट्र विद्यालय बार्शीला राज्यस्तरीय कृतिशील शाळा पुरस्कार

महात्मा फुले-सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षक आणि शाळांचा सन्मान करण्यासाठी महात्मा फुले-सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार, २३ जानेवारी २०२५ रोजी पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात संपन्न झाला. या समारंभात महाराष्ट्र विद्यालय बार्शी या शाळेला राज्यस्तरीय … Read more

बार्शी पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी: बनावट सोने विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

१० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजस्थानमधील टोळीला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने बनावट सोने विकणाऱ्या राजस्थानस्थित परराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीने १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून दोन किलो बनावट सोने जप्त करण्यात आले आहे. फिर्यादी स्वप्निल हिरालाल जैन (वय ३८, रा. … Read more

दोन वर्षांत २० लाख ६३ हजार पुणेकरांचा वाहतूक नियमभंग

१६७ कोटींचा दंड : १०४ कोटींची थकबाकी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात चौथ्या क्रमांकावर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. शहरातील रस्त्यांवरील अडथळे दूर करून वाहतुकीचा वेग वाढविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. मात्र, दरवर्षी तब्बल १० लाख पुणेकर वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दंड आकारण्यात येतो. दरवर्षी … Read more