आवृत्ती पुणे

मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीग सीजन 4 चे उद्घाटन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय महिला क्रिकेटपटू दिशा कासट आणि पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीग (MFCL) सीजन 4 चे दिमाखदार उद्घाटन झाले. यावेळी मंचावर पुणे मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, दुगड ग्रुपचे रुपेश दुगड, गणेश दाळ आणि बेसन मिलचे सतीश शहा, दी पुणे मर्चंट्स चेंबरचे … Read more

जैन कल्याणम का 9 वा स्थापना दिवस उत्साह में सम्पन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समुदाय में विवाह योग्य लडका और लड़की के विवाह की व्यवस्था करने का काम करने वाली जैन कल्याणम संस्था का 9वा स्थापना दिवस उत्साह के साथ मनाया गया। यदि पारिवारिक व्यवस्था को जीवित रखना है तो विवाह संस्था को सही होना होगा। सही वर-वधू का मिलन कराने का काम … Read more

रॅली काढून दहशत माजविणाऱ्या गुंडांची काढली धिंड

युनिट चार व येरवडा पोलिसांची कारवाई : नागरीकांकडुन कौतुक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा तुरुंगातून सुटका झालेल्या मोक्यातील गुंड प्रफुल्ल ऊर्फ गुड्ड्या कसबे याने समर्थकांसह लक्ष्मीनगर भागात रॅली काढून दहशत निर्माण केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत ९ जणांना अटक केली आणि त्यांच्या दहशतीला सडेतोड उत्तर दिले. अटक केलेल्यांची आरोपींची नावे तुषार सुरेश … Read more

धनाप्पा शेटे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : उपळाई बु येथील सुपुत्र आणि बार्शी शहरातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी धनाप्पा शेटे यांची नुकतीच बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे बार्शी तालुक्यात आणि त्यांच्या गावात आनंदाची लाट उसळली असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. धनाप्पा शेटे हे शांत, शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष … Read more

बार्शीच्या व्यापाऱ्यास बनावट सोने देऊन १० लाखांची फसवणूक

अनामिक महिला आणि पुरुषावर फसवणुकीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : शहरातील एका व्यापाऱ्यास बनावट सोने देऊन १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अनामिक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नील हिरालाल जैन (वय ३८) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीचे बार्शीतील तेजस हार्डवेअर आणि … Read more

शालेय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्र विद्यालय, बार्शीचे घवघवीत यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : लोकमंगल कॉलेज, वडाळा येथे दिनांक ७ व ८ जानेवारी २०२५ रोजी ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात जिल्ह्यातून एकूण ४८ प्रयोगांचे सादरीकरण झाले. महाराष्ट्र विद्यालय, बार्शीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. दिव्यांग गटातून चि. आरुष राहुल शहाणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, … Read more

‘एचएमपीव्ही’ विषाणूबाबत घाबरून जाऊ नका, सतर्क राहा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘एचएमपीव्ही’ विषाणू नवीन नसून तो २००१ पासून ज्ञात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. ८) ‘एचएमपीव्ही’ विषाणूविषयी आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी … Read more

ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन

शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासह कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा मानस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करणे, उत्पन्नवाढीला चालना देणे, आणि उत्पादनाला संरक्षित भाव मिळवून देण्यासाठी कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व विभागांचे समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आगामी काळात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा निर्धार कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त … Read more

बदलत्या जीवनशैलीत तृणधान्याचे आहारात महत्त्वाचे स्थान

पणनमंत्री ना. जयकुमार रावल: मार्केटिंगकडे लक्ष देण्याची गरज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बदलत्या जीवनशैलीत तृणधान्ये ही आहाराचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे ग्राहकांचा त्याकडे वाढता कल दिसून येतो. त्यामुळे उत्पादनवाढीसोबतच नाविन्यपूर्ण विक्री आणि मार्केटिंग तंत्रांचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पणनमंत्री ना. जयकुमार रावल यांनी केले. गणेश कला क्रीडा मंडळ … Read more

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायाची मागणी

धाराशिव येथे आक्रोश मोर्चा: भूममधूनही मोठ्या संख्येने सहभागाचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी तातडीने मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी भूम येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला विविध राजकीय पक्षांचे नेते, सरपंच परिषद सदस्य, आणि … Read more