आवृत्ती पुणे

१५० कोटींची फसवणूक करणाऱ्याला अटक

साई इंडस मार्केटिंगचा संचालक भालचंद्र अष्टेकर पाच महिने होता फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आणि नंतर फरार झालेल्या साई इंडस मार्केटिंग व श्री मल्टी सर्व्हिसेस कंपनीच्या संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक झालेल्या व्यक्तीचे नाव भालचंद्र महादेव अष्टेकर … Read more

राजस्थानमध्ये पतीचा खून करून पळालेली पत्नी आणि तिचा मित्र पुण्यात गजाआड

बंडगार्डन पोलिसांनी केली आरोपींची धरपकड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राजस्थानमध्ये पतीचा खून करून त्याची पत्नी आणि तिचा मित्र पुण्यात पळून आले होते. याची माहिती मिळाल्यावर बंडगार्डन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुखीदेवी कमलेश मेवाड (वय ३०, रा. पावटा का चौक, सोजत सिटी, जि. पाली, ता. सोजत, राजस्थान) आणि आशोक काळुराम … Read more

गजा मारणेला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

मोका लावल्याने कोथरुडचा गुन्हा क्राईम ब्रँचकडे हस्तांतरित महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गजा मारणे आणि रुपेश मारणे या दोघांनी आपल्या साथीदारांना ‘‘मस्ती आली आहे, साल्याला मारा,’’ असे म्हणून चिथावणी दिली असल्याचा दावा पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात केला. आयटी इंजिनियरला मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर मोक्का … Read more

ऑनलाईन प्रणालीद्वारे चालणार विकास परवानगी विभागाचे कामकाज

पारदर्शक आणि गतिमान सेवांसाठी पीएमआरडीएचा निर्णय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने विहित कालमर्यादेत देण्याच्या उद्देशाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्या अंतर्गत पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) लागू असलेल्या तसेच २०१८ च्या प्राधिकरण नियमावलीखाली येणाऱ्या उर्वरित क्षेत्रांमध्ये विकास परवानगी, … Read more

२८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कात्रज चौकातील जागेचे भूसंपादन

मुख्य चौक व कोंढवा रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रज मुख्य चौकामध्ये वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या ६० मीटर डी.पी. रस्त्याच्या बाधित मिळकतीचे भूसंपादन कायद्याने ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात आली. तब्बल २८ वर्षांपासून प्रलंबित असलेली जागा ताब्यात आल्याने कात्रज मुख्य चौक व कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. … Read more

दोन तासांत १५१८ वाहनांवर कारवाई

नाकाबंदीत २ तासांत पुणेकरांकडून १३ लाख ६५ हजार १०० रुपये दंड वसूल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुणे शहर जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. वाहतूक कोंडीबाबत पुणेकर कायम चर्चा करत असतात. परंतु, वाहतूक नियम तोडण्याच्या बाबतीतही पुणेकर आघाडीवर आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यामुळेच अनेक ठिकाणी वाहतूक मंदावते. पुणे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी दोन तास … Read more

कॅम्प ज्वेलर्स ग्रुपची क्रिकेट स्पर्धा

व्यापाऱ्यांमध्ये एकता निर्माण करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : व्यापाऱ्यांमध्ये एकता निर्माण व्हावी आणि नेटवर्किंग मजबूत व्हावे, यासाठी कॅम्प ज्वेलर्स ग्रुपने पहिल्यांदाच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. पुष्पा स्पोर्ट्स ग्राऊंड येथे झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणपती आरती आणि दीपप्रज्वलनाने झाली. … Read more

गजा मारणे टोळीवर मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमितेश कुमार : गजा मारणे टोळीच्या मालमत्तेची चौकशी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरूडमध्ये आयटी इंजिनिअर तरुणाला झालेली मारहाण ही साधी घटना नसून, त्याकडे संघटित गुन्हेगारीचे कृत्य म्हणून पोलीस पाहत आहेत. गजा मारणेच्या टोळीतील २७ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. गजा मारणेसह सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, ही टोळी उद्ध्वस्त करणार … Read more

राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या पुनर्गठनाची मागणी

राज्यातील तृतीयपंथी समुदायाने सामाजिक न्याय मंत्र्यांकडे निवेदन सादर केले महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : राज्यातील तृतीयपंथी समुदायाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेले राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळ पुन्हा सक्रिय करण्यात यावे, अशी मागणी राज्यातील तृतीयपंथी समुदायाने केली आहे. या संदर्भात पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट … Read more

आंतरराष्ट्रीय संधीचा त्याग करून बार्शीच्या क्रिकेट भविष्यासाठी झटणारे आनंद शेलार

इधांत जैनला मिळाले वेस्टइंडिज मास्टर्स संघाबरोबर सराव करण्याची संधी महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शीला तगडी क्रिकेटपटू निर्मिती करणारा हब बनवण्याच्या दृष्टीने आनंद शेलार सातत्याने प्रयत्नशील आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देऊन ते भविष्यात भारतीय क्रिकेटसाठी खेळू शकतील, यासाठी त्यांनी स्वतःच्या मोठ्या संधींचा त्याग केला आहे. त्यांच्या अशाच कार्यामुळे बार्शीचे … Read more