आवृत्ती पुणे

२ लाखांची लाच घेताना मंडल अधिकारी रंगेहाथ अडला

फेरफार रद्द करण्यासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यासह खासगी व्यक्तीही अटकेत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नवीन फेरफार नोंद रद्द करण्यासाठी आणि वादग्रस्त क्षेत्र तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या नावावर करण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात २ लाखांची लाच स्वीकारताना शिवणे सर्कलचे मंडल अधिकारी मारुती चोरमले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी त्यांच्या कार्यालयातील खासगी व्यक्ती जयेश बारमुख … Read more

बांधकाम व्यावसायिकाला २ कोटींचा गंडा

फक्त २ तासात २% कमिशन मिळणार या आमिषाला बळी : खडक पोलिसांनी दोघांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “फक्त २ तासांत २ कोटींच्या व्यवहारावर २ टक्के कमिशन मिळेल” – या आमिषाला बळी पडलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल २ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी ९ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, यातील … Read more

तरुणाचा खून करून पळून जाणाऱ्याला केले जेरबंद

पानटपरीवर झाला होता वाद : कानाखाली मारल्याच्या रागातून केला खून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पानटपरीवर एकमेकांकडे पाहण्यावरून झालेल्या वादातून, कानाखाली मारल्याच्या रागातून तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर पळून जाणाऱ्या हल्लेखोराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. धैर्यशील ऊर्फ सचिन बळीराम मोरे (वय २३, रा. सुवर्णयुग नगर, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्याचे … Read more

वीजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

औंधमधील ब्रेमेन चौकातील घटना : पडीक जागेत जाताना विद्युत रोहित्राला झाला स्पर्श महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री औंधमधील ब्रेमेन चौकात घडली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले तरुण ब्रेमेन चौकातील एका पडीक जागेत दारू पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी जवळ असलेल्या विद्युत रोहित्राला झालेल्या … Read more

मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार करून केला खून

दारू पिऊन देत होता त्रास : बिबवेवाडीतील अपर सुपर गणेशनगरमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लहान भाऊ काही कामधंदा न करता सतत दारू पिऊन सर्वांना त्रास देत असल्याच्या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रवीण ऊर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (वय २३, रा. अपर सुपर गणेशनगर, … Read more

दिल्लीतील व्यापाऱ्याला रिक्षाचालकाने लुबाडले

भीमाशंकरला नेऊन चाकूच्या धाकाने खिशातील रोकड जबरदस्तीने घेतली काढून महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दिल्ली येथील एका व्यापाऱ्याला भीमाशंकर दर्शनाला घेऊन जाऊन, परत येताना जंगलातील रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून, गुगल पे द्वारे तसेच खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सुरेशचंद्र चौहान (वय ६९, रा. बदरपूर, दक्षिण दिल्ली) यांनी बंडगार्डन पोलिस … Read more

शाश्वत विकासासाठी आपत्ती रोधक बांधकामे गरजेची – अजित पवार

स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनचे उद्घाटन पुण्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन या नव्याने स्थापन झालेल्या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरणपूरक व आपत्ती रोधक बांधकामे, शाश्वत विकास आणि स्ट्रक्चरल इंजिनिअर्सच्या भूमिकेबाबत स्पष्टपणे मत मांडले. भारत देश वेगाने प्रगतीपथावर असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, यामध्ये मोठ्या प्रकल्पांचे मोलाचे योगदान … Read more

गुडलक कॅफेच्या ‘बन मस्का’त काचांचे तुकडे

ग्राहकाचा धक्कादायक आरोप : व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, एफडीएकडे तक्रार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाण म्हणून ओळखले जाणारे गुडलक कॅफे सध्या एका गंभीर आरोपामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. एका ग्राहकाने येथे दिलेल्या ‘बन मस्का’मध्ये काचांचे तुकडे आढळल्याचा धक्कादायक दावा करत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या घटनेमुळे पुणेकरांमध्ये संतापाची … Read more

धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून मामाचा खून

सासवड रस्त्यावरील घटना : फुरसुंगी पोलिसांनी केली सहा जणांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याने मामाला दांडक्याने बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरळी देवाची परिसरात घडली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. टोळक्याच्या मारहाणीत दोघेजण जखमी झाले आहेत. रामलोचन हुसेनी कोरी (वय ४६, रा. … Read more

गुरुपौर्णिमेनिमित्त भूममध्ये गुरुजनांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील ज्येष्ठांचा सत्कार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : गुरुपौर्णिमेनिमित्त साहील बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गुरुवारी (दि. १० जुलै) शहरातील विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ गुरुजनांचा आणि मान्यवरांचा सन्मान सोहळा पार पडला. हा कार्यक्रम साहील कॉम्प्लेक्स येथे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, शेती, व्यवसाय, पत्रकारिता … Read more