आवृत्ती पुणे

लातूर–अहिल्यानगर–कल्याण राष्ट्रीय महामार्गा च्या मार्गासाठी कळंब येथे निर्णायक बैठक

शिराढोण–कळंब–जामखेड मार्गावरून महामार्ग जावा, यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांची एकजूट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : लातूर–अहिल्यानगर–कल्याण हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असून, या महामार्गाचा मार्ग ठरवताना जनहिताचा विचार होणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हा महामार्ग शिराढोण–कळंब–पारा–ईट–खर्डा–जामखेड–अहिल्यानगर–कल्याण या मार्गावरूनच जावा, या प्रमुख मागणीसाठी कळंब येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली … Read more

‘पुढे साहेब आहेत, गळ्यातील सोन्याच्या वस्तू काढून ठेवा’

मोफत वस्तूचे आमिष दाखवून ७२ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेची दोघांनी केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुढे साहेब लोक आहेत, तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याच्या वस्तू काढून बॅगमध्ये ठेवा, अशी बतावणी करत दोघांनी ७२ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेला मोफत वस्तूचे आमिष दाखवत १ लाख २० हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झाले. याबाबत एका ७२ वर्षांच्या महिलेने चंदननगर … Read more

‘लाच लुचपत’ ने पोलीस हवालदारासह खासगी व्यक्तीला केली अटक

जामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी साक्षीदाराकडून मागितली होती लाच : जेजुरीत कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सावकारीच्या कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर न राहिल्याने पती-पत्नीच्या नावाने जामीनपात्र वॉरंट निघाले होते. हे वॉरंट बजावण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले होते. वॉरंट दाखवून ते रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक … Read more

मुंढव्यातील सोसायटीमध्ये दिसला बिबट्या

नागरिकांमध्ये घबराट : वन विभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील उपनगरांमधील अनेक ठिकाणी बिबटे आढळून येत असल्याचे सांगितले जात आहे. विमानतळावरील बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले असतानाच, गुरुवारी पहाटे मुंढव्यातील केशवनगर भागातील एका सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या आढळून आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मुंढव्यातील केशवनगर … Read more

पिंपरीच्या फ्लॅटमध्ये केली जात होती हायड्रोपोनिक गांजाची शेती

पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई व गोवा येथे छापेमारी करून पावणे चार कोटींचा अंमली पदार्थ जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खडकी येथे गांजाची विक्री करताना पकडलेल्या आरोपीकडून गांजाचा मूळ स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत असताना, पोलिसांना आपल्याजवळच म्हणजे पिंपरी येथे भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये चक्क हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची शेती केली जात असल्याचे आढळून आले. पुणे पोलिसांनी पुणे, पिंपरी-चिंचवड, … Read more

वाटणी करण्यासाठी लॉकरमधून आणलेले ५८ लाखांचे दागिने चोरीला

अमेरिकेतून मुले आल्याने करणार होते वाटणी : देखभाल करणाऱ्या ४ महिलांवर संशय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अमेरिकेत मुलांकडे दोन वर्षे राहिल्यानंतर मुलासह पुण्यात आलेल्या वयोवृद्ध आईची आपले सोनेनाणे तिघा मुलांमध्ये वाटणी करण्याची इच्छा होती. त्यामुळे मुलाने बँकेच्या लॉकरमधून ५८ लाखांहून अधिक किमतीचे सोने व हिरेजडित दागिने काढून घरातील कपाटात ठेवले होते. ते दागिने चोरीला … Read more

गँगस्टर बंडु आंदेकरच्या घरातून २ पिस्तुले, ३७ लाखांचा ऐवज जप्त

पिस्तुल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हे दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणात गँगस्टर बंडु आंदेकर याच्यासह त्याच्या कुटुंबीयांना मोक्काअंतर्गत अटक करण्यात आली आहे. तरीही त्याच्या टोळीच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. सोमवारी रात्री पोलिसांनी बंडु आंदेकर याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात २ पिस्तुले, १ एअरगन, १७ लाख रुपयांची रोकड, १८ लाख रुपयांच्या चांदीच्या वस्तू … Read more

नव्या २ परिमंडळांच्या निर्मितीमुळे पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या

सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलीस दलात २ नवीन परिमंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. जुन्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून नवीन परिमंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसेच काही पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य राखीव पोलीस दल, गट ७ दौंडचे … Read more

येरवडा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ला

दोघांनी डोक्यात दगडी फरशी घालून केला खुनाचा प्रयत्न, गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीवर दोघा सहआरोपींनी दगडी फरशीने हल्ला करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात आरोपी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशाल नागनाथ कांबळे (वय २८, … Read more

नवनाथ यादव यांची महाराष्ट्र पोलीस मित्र समितीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील आष्टा येथील नवनाथ यादव यांची महाराष्ट्र राज्य रक्षक संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र पोलीस मित्र समितीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य रक्षक संघाच्या माध्यमातून कार्यरत असलेली महाराष्ट्र पोलीस मित्र समिती ही गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभर … Read more