आवृत्ती , पुणे

रेकॉर्डवरील गुन्हेगार श्र्वेतांग निकाळजेकडून दोन पिस्टल जप्त

मित्राचे अपहरण करून ‘कोणत्या पिस्टलातून गोळी घालू’ अशी दिली होती धमकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मित्राचे लग्न असताना त्याचे घरातून अपहरण करून मोबाईल टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यावेत, यासाठी त्याला दोन पिस्टल काढून डोक्याला लावून ‘तुला कोणत्या पिस्टलमधून गोळी घालू’ अशी धमकी देणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्र्वेतांग निकाळजे याला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडून दोन पिस्टल … Read more

दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चतु:श्रृंगी, हिंजवडी, वाकड परिसरात जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. औदुंबर ऊर्फ मोन्या रवींद्र नाकते (वय 29, रा. गोपाळ कृष्ण विकास … Read more

तडीपार, मोक्का कारवाईतील फरार सराईत गुन्हेगार जेरबंद

गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाची कारवाई : पूर्ववैमनस्यातून हॉटेल कामगाराच्या डोक्यात बाटली मारून केला होता हल्ला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तडीपार असताना कात्रज येथील तणिष्क रेस्टो बारमधील हॉटेल कामगाराच्या डोक्यात दारूची बाटली फेकून जखमी करणाऱ्या आणि त्यानंतर फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे. रामदास बबन कचरे … Read more

पुणे पोलिसांची मध्यप्रदेशातील बेकायदा शस्त्रकारखान्यांवर धाड

२१ पिस्तुलांसह मोठा दारुगोळा जप्त : ५० भट्ट्या नष्ट, ड्रोनचा वापर महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली १०५ जणांच्या पथकाने मध्यप्रदेशातील उमरटी गावातील बेकायदा शस्त्र कारखान्यांवर पहाटे छापा टाकून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. या संयुक्त कारवाईत ३६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून … Read more

ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉडमध्ये निगडीतील आरोपी जेरबंद

सायबर चोरट्यांना देत होता बँक खाते वापरण्यासाठी : सायबर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणुकीत सायबर चोरट्यांना पैसे स्वीकारण्यासाठी बँक खाते उपलब्ध करून देणाऱ्या निगडी प्राधिकरणातील एका व्यक्तीस सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव अरविंद बाबुलालजी लोढा (वय ५५, रा. टेल्को हौसिंग सोसायटी, सेक्टर २४, निगडी प्राधिकरण; … Read more

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणारी कात्रजची कन्या मनस्वी ठोंबरे

सहा वर्षांच्या वयात ५३ तास स्केटिंगची अविश्वसनीय कामगिरी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कात्रज गावातील रहिवासी मनस्वी उमेश ठोंबरे हिने दिनांक २४ ते २७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान कर्नाटकातील बेळगाव येथे शिवगंगा स्केटिंग रिंगवर आयोजित स्केटिंग स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मनस्वीने वयाच्या केवळ सहाव्या वर्षी तब्बल ५३ तास अखंड स्केटिंग … Read more

बंडू आंदेकरच्या तीनही गुंड मुलांची पोलिसांनी काढली धिंड

घरझडतीच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्तात नाना पेठ, गणेश पेठेत पायी काढली वरात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बंडू आंदेकर टोळीतील त्याच्या तीन गुंड मुलांची पोलिसांनी त्यांच्या घराच्या परिसरात धिंड काढली. आंदेकर टोळीचा दरारा कमी करण्यासाठी, घरझडतीच्या निमित्ताने पोलिसांनी या गुंडांना परिसरातून फिरविले. कृष्णराज ऊर्फ कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांची पोलीस कोठडी मिळाली आहे. … Read more

१७१ नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत

परिमंडळ ५ मधील ९ पोलीस ठाण्यांच्या परिसरातून झाले होते गहाळ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : परिमंडळ ५ मधील ९ पोलीस ठाण्यांच्या परिसरातून हरविलेले १७१ मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. हडपसर येथील मांजरी रोडवरील नेताजी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. परिमंडळ ५ … Read more

रेल्वे प्रवाशांना लुटण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

मालधक्का रोडवर बंडगार्डन पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना धमकावून लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीतील चौघांना बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले. त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे. जानमोहम्मद नसरुद्दीन शेख (वय ३२, रा. पीर वस्ती, वडकी, सासवड रस्ता), सतीश ज्ञानेश्वर शिरोळे (वय ३५), खुट्टाराज अंजीलप्पा विभुती (वय … Read more

नायलॉन मांजा विक्री करणारे दोन तरुण जाळ्यात

मुंढवा पोलिसांनी हडपसर रेल्वे स्टेशन परिसरातून केला १ लाखांचा नायलॉन मांजा जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर रेल्वे स्टेशन परिसरात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोघा तरुणांना पकडून मुंढवा पोलिसांनी १ लाख ८ हजार ८०० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. आयुष राहुल शिंदे (वय २०, रा. शिंदे निवास, ससाणेनगर, हडपसर) आणि यशराज विजय दिवेकर … Read more