आवृत्ती पुणे

ज्येष्ठ नागरिक महिलेला फसवून चोरट्यांनी नेली सोन्याची पोत

शनिवारवाड्याजवळील प्रेमळ विठ्ठल मंदिर परिसरात भरदिवसा फसवणुकीची घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दर्शनासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेला ‘जेवण व पैसे वाटप होत आहे’ असे सांगून गळ्यातील सोन्याची पोत काढायला लावून चोरट्यांनी तिची पर्स लांबवली. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता शनिवारवाड्याजवळील प्रेमळ विठ्ठल मंदिरासमोरील फुटपाथवर घडली. गणेश पेठेतील दुधभट्टीसमोर राहणाऱ्या ७० वर्षीय … Read more

टिपू पठाण टोळीतील फरारी गुन्हेगाराला हैद्राबादमधून जेरबंद

महिलेची जागा बळकाविण्याचा प्रयत्न : गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा येथील महिलेची जागा बळकावणाऱ्या सराईत गुन्हेगार टिपू पठाण याच्या टोळीतील फरारी गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने तेलंगणातील हैद्राबाद येथून जेरबंद केले आहे. तो गेल्या ३ महिन्यांपासून फरार होता. फैयाज गफार बागवान (वय २८, रा. खाजा मंजिल … Read more

मार्केटयार्ड परिसरातून दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद

स्वारगेट पोलिसांची कामगिरी : दोन दुचाकी जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मित्र मंडळ परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. मार्केटयार्ड भागातून त्याने आणखी एक दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. राज परमेश्वर कदम (वय २६, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. स्वारगेट … Read more

नगररचना सहायकावर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल

पेट्रोलपंपासाठी जागेचा बिगर शेतीचा दाखला देण्यासाठी मागितली ४ लाखांची लाच महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पेट्रोलपंपाची डीलरशिप मिळाल्याने त्याच्या जागेसाठी बिगर शेती परवाना व बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागून साडेतीन लाखांची लाच स्वीकारण्यास मान्यता दिलेल्या दौंड नगरपरिषदेच्या नगररचना सहायकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. विजयकुमार मधुकर हावशेट्टे (वय ३१) … Read more

वाहतूक पोलीस नसले तरी नियम मोडला तर होऊ शकतो दंड

साध्या वेशातील पुणेकरांनी पाठविलेल्या फोटोवरुन ३ हजारांवर दंडाची कारवाई : १६ लाख ५० हजारांचा दंड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अनेकदा वाहतूक पोलीस नसल्याचे पाहून अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात. पण, आता वाहतूक पोलीस दिसला नाही तरी जागरुक पुणेकरांच्या माध्यमातून हा साध्या वेशातील पोलीस रस्त्यावर असणार आहे. तेव्हा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर … Read more

धनकवडीत तिघा गुंडांचा धुडगुस

मध्यरात्री १५ रिक्षा, ३ कार, २ शाळेच्या बस आणि एका टेम्पोची तोडफोड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीवरून आलेल्या तिघा गुंडांनी धनकवडीत मध्यरात्री पुन्हा एकदा धुडगुस घालत वाहनांची तोडफोड केली. गुंडांनी १५ ऑटो रिक्शा, ३ कार, २ स्कूल बस, आणि एक टेम्पो तोडले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा नागरिकांना मारहाण करून जखमी केले आहे. त्यांच्यावर सध्या … Read more

८ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करून सुमारे १४,९३,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपीकडून ०८ घरफोड्यांचे गुन्हे उघड करण्यात आले असून, त्याच्याकडून ९६ ग्रॅम सोने, ३५० ग्रॅम चांदीचे दागिने आणि ११ मोबाईल जप्त करण्यात आले … Read more

विजय बोराडे चेअरमन, श्रीराम खंडागळे उपचेअरमन

श्री शिवाजी खरेदी विक्री संघ, भूममध्ये दोघांची बिनविरोध निवड महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : श्री शिवाजी खरेदी विक्री संघ, तालुका भुमच्या चेअरमनपदी पाथरुड येथील विजय काका बोराडे यांची तर उपचेअरमनपदी रामेश्वर येथील श्रीराम खंडागळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सदर संघाची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध पार पडली असून, संघाचे वर्चस्व पुन्हा एकदा मा. राहुल मोटे … Read more

दत्तक भावाची मालमत्ता मोठ्या भावाने केली हडप

बनावट कागदपत्राद्वारे परस्पर वारसदार बदलून फ्लॅट, मुदत ठेवी, सोन्याचे दागिने घेऊन केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ३ भाऊ व ४ बहिणी असलेल्या कुटुंबातील मधल्या भावाला दत्तक दिले होते. त्याला वारसा हक्काने राजस्थानातील मोठी मालमत्ता मिळाली. आजारपणाच्या औषधोपचारासाठी त्याने राजस्थानातील मालमत्ता विकून पुण्यात फ्लॅट घेतला. त्याच्या निधनानंतर मोठ्या भावाने बनावट कागदपत्राद्वारे परस्पर वारसदार बदलून … Read more

ऑनलाईन पुजेच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी पाच लाखांंना घातला गंडा

सायबर चोरट्यांचा नवा फंडा, सेवानिवृत्त कर्नलची केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ऑनलाईन पूजेच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याची तब्बल ५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अरुण वेदप्रकाश सुद (वय ५६, रा. सोपानबाग, घोरपडी) यांनी याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, १७ जून ते ९ … Read more