आवृत्ती , पुणे

आरोही चव्हाणने नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये पटकावला प्रथम क्रमांक

प्रोऍक्विव्ह अबॅकस स्पर्धेत हाडोंग्रीच्या विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : कोल्हापूर येथे पार पडलेल्या अत्यंत भव्य प्रोऍक्विव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन २०२५ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाडोंग्री येथील विद्यार्थिनी आरोही गजानन चव्हाण हिने लहान गटातील सायकल विनर अबॅकस प्रकारात राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आरोहीला सायकल, प्रमाणपत्र व … Read more

गंगाधाम उड्डाणपुलाच्या दिशाबदलावर नागरिकांचा आक्रमक विरोध

स्थानिक व्यापारी व नागरिक घेणार पालकमंत्र्याची भेट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाच्या दिशाबदलाच्या निर्णयावर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मार्केटयार्ड ते आईमाता मंदिर हा अत्यंत वाहतुकीच्या ताणाखालील मार्ग असून, या रस्त्यावर उड्डाणपुलाची नितांत गरज आहे. मात्र, प्रशासनाने अनपेक्षितपणे हा पूल बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर वळवल्याने नागरिक संतप्त झाले … Read more

मोबाईलमुळे सुताराचा खून उघडकीस

भारती विद्यापीठ पोलिसांनी पश्चिम बंगालमधून आरोपीला ताब्यात घेतले, ३६ तासांत गुन्हा उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आंबेगाव पठार येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एका व्यक्तीच्या डोक्यात पहारीने वार करून खून झाल्याचे उघडकीस आले. मात्र, मृत व्यक्ती आणि आरोपी यांची ओळख पटू शकत नव्हती. अशा परिस्थितीत घटनास्थळी सापडलेल्या एका मोबाईलमुळे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. त्यावरून … Read more

बिस्लेरी कंपनीला ५० लाखांचा गंडा

सिनिअर अकाउंटंट आणि सेल्स एक्झिक्युटिव्हचे संगनमत : रोख रक्कम स्वीकारून बनावट नोंदीद्वारे फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ग्राहकांकडून आलेल्या पैशांची नोंद करताना काही चूक झाल्यास ती दुरुस्त करण्याचे अधिकार कंपनीने सिनिअर अकाउंटंटला दिले होते. या अधिकारांचा गैरवापर करून त्याने सेल्स एक्झिक्युटिव्हच्या मदतीने फसवणूक केली. ग्राहकांकडून रोख रक्कम स्वीकारून ती बँकेत जमा केल्याची बनावट नोंद … Read more

सुखी जीवन की कुंजी संपत्ति या शक्ति नहीं, बल्कि सद्गुण हैं – पं. राजरक्षितविजयजी

श्री नमिनाथ स्वामी जिनालय, कर्जत में जैन संघ द्वारा भव्य स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता कर्जत : श्री नमिनाथ स्वामी जिनालय, कर्जत जैन संघ में पंन्यास राजरक्षितविजयजी और पंन्यास नयरक्षितविजयजी का आगमन हुआ। इस अवसर पर रेलवे स्टेशन से जिनालय तक भव्य स्वागत यात्रा निकाली गई, जिसमें सकल जैन समाज ने भाग लिया। बहनों ने मंगल … Read more

घरांच्या विक्रीत देशात पुण्याचा चौथा क्रमांक

परवडणाऱ्या घरांपेक्षा लक्झरी घरांची विक्री अधिक ; देशात वर्षभरात ३ लाख घरांची विक्री महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर वेगाने महानगर होत आहे. मेट्रोसह विविध सोयी-सुविधा वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचे प्रत्यंतर शहरात राहण्यासाठी घरांची खरेदी करणाऱ्या लोकांवरून येते. २०२४ मध्ये देशभरातील सात महत्त्वाच्या शहरांत ३ लाख २ हजार ८६७ घरांची विक्रमी विक्री … Read more

सायबर पोलिसांनी हरवलेले ४५६ मोबाईल केले परत

हरविलेल्या २३०० मोबाईलमधून ट्रेस झाले, सहा पथके होती कार्यरत, एका महिन्याची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरात हरवलेले, चोरीला गेलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल परत मिळवण्यासाठी सायबर पोलिसांनी विशेष मोहिम राबवून ४५६ मोबाईल नागरिकांना परत केले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील हिरकणी हॉलमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते हा वितरण सोहळा पार पडला. गेल्या … Read more

पुण्यात हे काय चाललंय! धमकावून लुटमारीच्या घटनांत वाढ

तीन घटनांत १.६२ लाखांचा ऐवज लंपास : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरात धमकावून लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल १ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटना वारजे, शिवाजीनगर आणि हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडल्या. शिवाजीनगर भागातील नाना-नानी पार्कजवळ एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील … Read more

चापट मारल्याच्या रागातून कंटेनर अंगावर घालून हत्या

वाघोलीत धक्कादायक घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे एका वेअरहाऊससमोर धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमध्ये बिल देण्यावरून झालेल्या वादात एका व्यक्तीने चापट मारल्याचा राग मनात धरून कंटेनर अंगावर घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी रामचंद्र शिवराम पोले (वय ४४) या कंटेनर चालकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून … Read more