आवृत्ती , पुणे

दारू पिताना झालेल्या वादातून तरुणाचा खून

सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून खून : कोंढव्यातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दारू पिताना झालेल्या वादातून दोघांनी तरुणाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून त्याचा खून केला. ही घटना कोंढव्यातील भैरवनाथ मंदिरासमोरील दशक्रिया विधीधाम येथे सोमवारी दुपारी घडली. काही तासांतच कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बारिश ऊर्फ बार्‍या संजय खुडे (वय २१, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, … Read more

भोरमधील चार घरे फोडून २६ लाखांचा ऐवज लंपास,

सीसीटीव्हीवरून लागला हाताला : आंतरराज्य सराईत घरफोड्या जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क भोर : भोर शहरातील मध्यवर्ती श्रीपतीनगर येथे एका रात्रीत चार घरांमधून ९ लाख रुपये , १८ तोळे सोने, २ किलो ७०० ग्रॅम चांदी असा २६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून आंतरराज्य घरफोड्या सराईत गुन्हेगाराला … Read more

‘त्या’ अ‍ॅपवर ओळख वाढवून लुटणारी टोळी जेरबंद

लुटमारीचा नवा प्रकार उघड : नांदेड सिटी पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : डीएसके रोड ते रायकर मळा दरम्यान गाड्या अडवून लुटणाऱ्या टोळीचा नवा प्रकार समोर आला आहे. “माझ्या घरी मेडिकल इमर्जन्सी आहे,” असे सांगून गाड्यांवर बसणाऱ्या तरुणांना निर्जन स्थळी नेऊन लुटणारी ही टोळी कार्यरत होती. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका संदेशाच्या आधारे नांदेड सिटी … Read more

श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ध्वजारोहण व राष्ट्रगीताच्या साक्षीने राष्ट्रीय उत्सवाचे औचित्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी “प्रजासत्ताक दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ध्वजारोहणाचा कार्यक्रम व राष्ट्रगीताचे सादरीकरण जैनाश्रमच्या श्राविका शोभाबेन संचेती, मितेश संचेती व खुशबू … Read more

दारूसाठीच्या पैशांवरून सख्या भावावर कुर्‍हाडीने वार

आईला मारहाणीपासून सोडवण्यासाठी धावला भाऊ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावर नकार दिल्याने मुलाने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रसंगी आईला वाचवण्यासाठी धावून आलेल्या सख्या भावावर कुर्‍हाडीने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत जखमी दिगंबर अरुण जाधव (वय ३५, रा. रामोशीवाडी, गोखलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी … Read more

महाराष्ट्र विद्यालय बार्शीला राज्यस्तरीय कृतिशील शाळा पुरस्कार

महात्मा फुले-सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षक आणि शाळांचा सन्मान करण्यासाठी महात्मा फुले-सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार, २३ जानेवारी २०२५ रोजी पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात संपन्न झाला. या समारंभात महाराष्ट्र विद्यालय बार्शी या शाळेला राज्यस्तरीय … Read more

बार्शी पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी: बनावट सोने विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

१० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजस्थानमधील टोळीला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने बनावट सोने विकणाऱ्या राजस्थानस्थित परराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीने १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून दोन किलो बनावट सोने जप्त करण्यात आले आहे. फिर्यादी स्वप्निल हिरालाल जैन (वय ३८, रा. … Read more

दोन वर्षांत २० लाख ६३ हजार पुणेकरांचा वाहतूक नियमभंग

१६७ कोटींचा दंड : १०४ कोटींची थकबाकी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात चौथ्या क्रमांकावर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. शहरातील रस्त्यांवरील अडथळे दूर करून वाहतुकीचा वेग वाढविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. मात्र, दरवर्षी तब्बल १० लाख पुणेकर वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दंड आकारण्यात येतो. दरवर्षी … Read more

डॉक्टर तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टरला अटक

नवी मुंबईतून आवळल्या मुसक्या, अविवाहित असल्याचे भासवून केली १० लाखांची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पहिले लग्न झालेले असूनही जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे खोटे भासवून डॉक्टर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात १० लाख रुपये घेतल्यानंतर आपले लग्न झाले असल्याचे आणि पत्नी गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. या मानसिक … Read more