आवृत्ती , पुणे

30 वर्षांनी भेटले मित्र-मैत्रिणी गुरुजनांसह: 1994 च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : येथील के.एल.ई. सोसायटी बेळगाव संचलित सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये 1994 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. सोलापूर, पुणे, धाराशिव, लातूर, हैदराबाद, अहमदनगर, बार्शी शहर आणि तालुक्यातून माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेत एकत्र आले. यावेळी शाळेतील माजी मुख्याध्यापक आणि शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे प्रवेशद्वार व कार्यक्रम हॉल रांगोळी … Read more

भ्रष्टाचार निर्मूलन समिती आयोजित शिबीरात पोलिसांना स्वसंमोहनाचे धडे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : दैनंदिन कर्तव्ये पार पाडताना पोलिसांना मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागतो. या मानसिक ताणाचा प्रभाव कमी करण्यासाठी मन एकाग्र करून स्वयंसूचना कशा घ्याव्यात आणि ताणतणाव कमी करण्याची पद्धत शिकवण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीने सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय अंबादास थोरात (कोरे) यांच्या संकल्पनेतून स्वसंमोहन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले. हे प्रशिक्षण सोलापूर येथील संमोहनतज्ञ … Read more

येरवड्यात तरुणीवर कोयत्याने वार करुन खुन

येरवड्यातील डब्ल्यु एन एस आय टी कंपनीतील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा परिसरातील रामवाडी येथील एका कंपनीच्या पार्किंगमध्ये पैशांच्या वादातून तरुणीवर कोयत्याने वार करुन तिचा निर्घुण खुन करण्यात आला आहे. शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. येरवडा पोलिसांनी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३०, रा. खैरेवाडी, … Read more

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

सुमारे ४ हजार २८५ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि परिसरासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विमानतळ प्रकल्पाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून आता या कामाला गती मिळणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यातील विमानतळांच्या प्रगतीचा … Read more

दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगाराकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज येथील राजेंद्र ज्वेलर्स या सराफी दुकानावर दरोडा टाकण्यासाठी जमलेल्या टोळक्यावर पोलिसांनी छापा घालून तीन जणांना अटक केली होती. मात्र, यावेळी तीन आरोपी पळून गेले होते. तब्बल दीड महिन्यानंतर सापडलेल्या आरोपीकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. यश दीपक घोडके (वय १८, रा. … Read more

केअरटेकर महिलेने २५ तोळे सोन्याचे दागिने लांबविले

वृद्ध आईची ‘केअर’ घेण्यासाठी होती कामाला : बिबवेवाडी पोलिसांनी केले जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वृद्ध महिलेची काळजी घेण्यासाठी ठेवलेल्या केअरटेकर महिलेनेच २५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे गायत्री सुनिल हातेकर (वय २४, रा. गणपती मंदिराजवळ, चव्हाणनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव … Read more

रागाने पाहिल्याच्या कारणावरून इंजिनिअर तरुणाचा हात तोडला

बिबवेवाडीतील घटना : VIT कॉलेज परिसरात दहशत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : केवळ “रागाने पाहतो” या कारणावरून एका अल्पवयीन मुलासह दोघांनी कोयत्याने वार करून एका इंजिनिअर तरुणाच्या उजव्या हातावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा हाताचा पंजा तोडला गेला, ही खळबळजनक घटना बिबवेवाडीमध्ये घडली. पीयूष पाचकुडवे (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. यापूर्वी, मार्च २०२३ … Read more

पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर ब्लेडने हल्ला

खिशातील रोकड जबरदस्तीने नेली चोरुन : पुणे स्टेशन येथील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे :अनोळखी व्यक्तीला पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने तरुणावर ब्लेडने वार करुन जखमी करुन खिशातील रोकड जबरदस्तीने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वडीथा गोविंदा नाईक (वय २८, रा. आण्णाभाऊ साठे वस्ती, अप्पर डेपोच्या मागे, बिबवेवाडी) यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद … Read more

दिवसा घरफोडी करणा-याला टोळीला बेड्या ठोकून चोरीस गेले मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चंदननगर पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे आणि चोरीस गेलेले मुद्देमाल जप्त केले आहेत. याबाबत फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, त्यात त्यांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराची कोडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि ५,४७,००० रुपयांचे सोने चोरून नेले. यावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास … Read more

खंडणी मागणारा परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात

गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखा युनिट-१ ने खंडणी मागणाऱ्याला अटक केली आहे. सुरज बागमार यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून ६० ते ७० लाख रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more