आवृत्ती पुणे

गॅंगस्टर निलेश घायवळवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

शेतकऱ्याच्या स्कॉर्पिओचा नंबर स्वतःच्या दुचाकीला वापरला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : परदेशात पळून गेलेल्या गॅंगस्टर निलेश घायवळ याचा आणखी एक उद्योग समोर आला आहे. त्याने इंदापूरमधील शेतकऱ्याच्या स्कॉर्पिओचा नंबर स्वतःच्या दुचाकीला वापरल्याचे आढळून आले आहे. कोथरुड पोलिसांनी निलेश घायवळ याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सागर भाऊसाहेब बंडगर (वय ३७, रा. भिगवण, ता. इंदापूर) … Read more

बाजार समितीतील वाद थेट पोलिसांत

स्वारगेट पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी : सचिव कार्यालयात गुंडागर्दीचा प्रकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे बाजार समितीमध्ये झालेल्या गोंधळानंतर सभापती, सचिव आणि काही सदस्यांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. शिवीगाळ, धक्काबुक्की, जिवे मारण्याच्या धमक्या आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न अशा गंभीर प्रकारामुळे वातावरण तापले आहे. पत्रकार सुहास बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी … Read more

बार्शीत ३.३५ लाखांच्या चोरीचा तीन तासांत पर्दाफाश

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी मुद्देमालासह रिंग रोडवर पकडला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलिसांनी आपल्या तत्परतेने आणि तांत्रिक कौशल्याने पुन्हा एकदा गुन्हेगारांना धडा शिकवला आहे. अवघ्या तीन तासांत ३ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणातील आरोपीला चोरीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास व सुरक्षिततेची भावना दृढ झाली … Read more

आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला ५ लाखांचा गंडा

पार्टटाईम जॉबच्या नावाखाली सायबर चोरट्यांची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला पार्टटाईम जॉबच्या नावाखाली टेलिग्रामवरील टास्क पूर्ण करण्यास लावून तब्बल ५ लाख २८ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हा प्रकार १६ ते १९ सप्टेंबर २०२५ दरम्यान … Read more

खराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

चंदननगर पोलिसांची कारवाई : महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खराडी येथील अशोकनगर परिसरातील सन शाईन स्पा या मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर चंदननगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप चव्हाण, रोहित शिंदे, गोपाळ आणि स्वाती ऊर्फ श्वेता विजय शिंदे अशी आरोपींची नावे … Read more

महसूल कर्मचाऱ्यांची पूरग्रस्तांना मदत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माणकेश्वर : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील ग्राम महसूल अधिकारी तसेच धाराशिव जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी संघाचे अध्यक्ष श्री. विशाल खळदकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांची भेट घेतली. मराठवाड्यातील अतिवृष्टी व महापूरामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या अतोनात नुकसानीबाबत संवेदनशीलता दाखवत आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, धाराशिव जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी … Read more

तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गुन्हेगार जेरबंद

खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला वानवडी पोलिसांची वैजापूर येथून अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षातील टेपचा आवाज कमी न केल्याच्या वादातून हडपसरमधील शिंदेवस्ती येथे रिक्षाचालकावर हत्याराने प्राणघातक हल्ला करणारा आणि गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेला गुन्हेगार ऋषिकेश बागुल याला वानवडी पोलिसांनी वैजापूर येथून अटक केली आहे. ऋषिकेश सुनील बागुल (वय २७, रा. एसआरए बिल्डिंग, शिंदेवस्ती, हडपसर) … Read more

मेफेड्रोन विक्री करणारा नायजेरियन नागरिक गजाआड

साडेबारा लाखांचे मेफेड्रोन जप्त : अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मेफेड्रोन विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून १२ लाख ४४ हजार रुपयांचे ६२ ग्रॅम मेफेड्रोन, २ मोबाईल, दुचाकी असा एकूण १२ लाख ९४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. व्हेलेंटाइन उर्फ … Read more

सात्विक आहार व परमेश्वर सेवा जीवन समृद्ध करतात : ह. भ. प. शिवलिला पाटील

समर्थनगर नवरात्र महोत्सवात युवती कीर्तनकारांचा प्रेरणादायी संदेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : समर्थनगर येथे नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात युवती कीर्तनकार ह. भ. प. शिवलिला पाटील (बार्शी) यांनी उपस्थित भाविकांना सात्विक आहार, चांगले विचार आणि परमेश्वर सेवा यांचे महत्त्व पटवून दिले. व्यसनांपासून दूर राहून भक्तीमार्गाचा स्वीकार केल्यास जीवन सार्थकी लागते, असा संदेश त्यांनी दिला. दि. … Read more

शंकरराव पाटील महाविद्यालयात आजीवन शिक्षण व विस्तार केंद्राचे उद्घाटन

व्यक्तिमत्व विकास व विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित आजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्या विस्तार केंद्राचे उद्घाटन दि. २४ सप्टेंबर रोजी संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास व विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी … Read more