आवृत्ती , पुणे

कोंढवा पोलीस ठरले ‘देवदूत’

पती पत्नीच्या भांडणात पतीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कोंढवा पोलीस ठाण्यातील अंमलदार निकम आणि राक्षे यांनी दरवाजा तोडून पतीला खाली घेऊन त्यांना सीपीआर देऊन त्यांचे प्राण वाचविले. महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

प्रतिस्पर्धी उमेदवाराला समर्थन दिल्याने महिलेसह चौघांना मारहाण

प्रभाग क्रमांक ९ मधील बाबुराव चांदेरे यांना दिला होता पाठिंबा : बाणेरमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रतिस्पर्धी उमेदवाराला समर्थन दिल्याने महिलेसह तिच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आले. टोळक्याने महिलेसह चौघांना बेदम मारहाण केल्याची घटना बाणेर परिसरात मतदान सुरू असताना घडली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत कल्याणी रामदास धनकुडे (वय ३८, … Read more

औषध वितरकाला साडेतीन कोटींचा गंडा

दोघा भामट्यांवर चौथा गुन्हा दाखल : आतापर्यंत १८ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सदाशिव पेठेतील एका औषध वितरकाची तब्बल ३ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघा भामट्यांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, आतापर्यंत त्यांनी १८ कोटी रुपयांहून … Read more

सूर्यदत्तमध्ये विवेकानंद–जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

डॉ. दत्ता कोहिंकर यांना ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार २०२६’ प्रदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे : विचार, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा जागर करत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात शिक्षण, समाजसेवा व राष्ट्रउभारणीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. दत्ता कोहिंकर यांना मानाचा ‘स्वामी … Read more

मोहोळ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

गोवंशीची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई : ७ आरोपी अटकेत महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर ग्रामीण : मोहोळ पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गोवंशीची अवैध तस्करी व वाहतूक करणाऱ्या संघटित टोळीवर कठोर कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीवर मोठा आघात बसला आहे. मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत गोवंशाची अवैध … Read more

भोसरीतील तरुणाचा ताम्हिणी घाटात मित्रांनी खून

महाबळेश्वरला फिरायला घेऊन जाण्याचा बहाणा : बाणेर पोलिसांनी दोघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भोसरीतील इंद्राणी नगरमध्ये राहणाऱ्या मित्राला कारमधून महाबळेश्वरला फिरायला जाऊ असे सांगून वाटेत ताम्हिणी घाटात गळा आवळून आणि कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह घाटात टाकून पुण्यात येऊन त्याची कार विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक … Read more

पुणे : प्रभाग क्रमांक २१, मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क येथील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ यशवंत भिमाले, प्रसन्नजीत भरत वैरागे, सिद्धी अविनाश शिळीमकर, मनिषा प्रविण चोरबेले यांनी जीतोचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी चेतन भंडारी, इंद्रकुमार छाजेड, … Read more

पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना रद्द

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा आदेश, घरातील दरोड्याबाबत अजूनही पोलीस अंधारात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वादग्रस्त आयएएस पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना गेल्या आठवड्यात रद्द केला आहे. त्यांच्या बाणेर रोडवरील बंगल्यात नोकराने गुंगीचे औषध देऊन दरोडा टाकण्याची … Read more

मार्केटयार्ड येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ व्यापारी मेळावा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० व २१ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी मार्केटयार्ड परिसरातील तालेरा गार्डन येथे भव्य व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक २१ मधून भाजपचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ भिमाले, मनीषा चोरबेले, प्रसन्न वैरागे, सिद्धी शिळीमकर तसेच प्रभाग क्रमांक २० मधून भाजपचे अधिकृत उमेदवार … Read more

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ४५ लाखांची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची ४६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४२ वर्षांच्या तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुण मांजरी खुर्द परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी सप्टेंबर … Read more