आवृत्ती , पुणे

गजा मारणे टोळीच्या गुंडावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

आयटी इंजिनिअर तरुणाला केली होती मारहाण; कोथरुडमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे: आयटी इंजिनिअरला भरचौकात मारहाण करणाऱ्या गजा मारणे टोळीच्या गुंडांवर कोथरूड पोलिसांनी सुरुवातीला किरकोळ मारहाणीचे कलम लावले होते. मात्र, वरिष्ठ स्तरावरून आदेश मिळाल्यानंतर या गुंडांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. वानखेडे … Read more

व्याजाने घेतलेले पैसे मुदतीत परत न दिल्याने सावकाराने जबरदस्तीने नेल्या दोन गाड्या

कॅम्पातील घटनेत सावकारावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आईच्या औषधोपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याने फिर्यादीने २ लाख २१ हजार रुपये व्याजाने घेतले होते. मात्र, ही रक्कम मुदतीत परत करू न शकल्याने सावकाराने जबरदस्तीने त्यांच्या दोन गाड्या उचलून नेल्या. पैशांवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लष्कर पोलिसांनी सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सनी ऊर्फ दशरथ श्याम … Read more

कर्णकर्कश आवाजाच्या सायलेन्सर लावलेल्या बुलेटवर कारवाई

२२ बुलेटचे सायलेन्सर काढले : २५ हजार दंड वसूल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरात कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून लोकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी मोहिम हाती घेतली. या कारवाईत २२ बुलेट ताब्यात घेण्यात आल्या असून, त्यांचे सायलेन्सर काढून टाकण्यात आले. तसेच, वाहनचालकांकडून २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस … Read more

सिंहगड वाहतूक शाखेला बारा बॅरिगेट्सची मदत

भरत भुरट यांच्या सामाजिक उपक्रमातून सहकार्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते भरत भुरट यांनी सिंहगड वाहतूक शाखेला स्वखर्चाने बारा बॅरिगेट्स प्रदान करून एक सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाअंतर्गत आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते सिंहगड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक … Read more

देवेश जोशी दोन वर्षांपासून देशभर घालतोय धुमाकूळ

वीज, गॅस नंतर आता पाणी कनेक्शन कट करण्याचा मेसेज पाठवून सायबर फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “तुमचे बिल भरलेले नसल्याने आज रात्रीपासून तुमचे वीज कनेक्शन कट होणार आहे,” असा मेसेज “देवेश जोशी अधिकारी” या नावाने नागरिकांना पाठवला जात आहे. या मेसेजमध्ये एक मोबाईल नंबर दिला जातो. घाबरून नागरिक त्या क्रमांकावर संपर्क साधतात आणि आम्ही … Read more

भूम येथील महावितरण कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त महावितरण कार्यालयात आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी महावितरणचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शिवभक्त आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंती उत्सवाची सांगता जयघोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.

शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम: येथील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक धनश्री कुलकर्णी, द्वितीय क्रमांक तेजस्विनी पायाळ आणि तृतीय क्रमांक प्रथमेश जगदाळे याने पटकावला. तसेच … Read more

विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती होणे गरजेचे : पोलीस उपनिरीक्षक वर्षा साबळे

नवीन कायद्यांचा प्रसार व जनजागृती अभियान महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : नवीन कायद्यांच्या प्रसार व प्रचारासाठी भारत सरकारने सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवस नवीन कायद्यांचा प्रचार करून जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. धाराशिव जिल्ह्यात, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, पोलीस उपअधीक्षक गौरीशंकर … Read more

बार्शी येथे शिवसृष्टीत भव्यदिव्य शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती शिवसृष्टीत भव्यदिव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जीवनगाथेचे अप्रतिम दर्शन घडवणारी भव्य फुलांची आरास, नेत्रदीपक विद्युत रोषणाई आणि फुलांनी साकारलेला शिवजन्म देखावा. या अद्वितीय सजावटीने उपस्थितांचे लक्ष वेधून … Read more