आवृत्ती , पुणे

बार्शीचे ॲड. विकास जाधव यांना यशवंत गौरव पुरस्कार’ प्रदान

शिवशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक पुणे येथे सन्मान सोहळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : ग्रामचळवळ व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत ॲड. विकास जाधव यांना कोल्हापूरच्या आविष्कार फौंडेशनचा राज्यस्तरीय ‘ यशवंत गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. शिवशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक पुणे येथे हा सन्मान सोहळा पार पडला. अविष्कार फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामविकासात व ग्रामचळवळीत उत्कृष्ट … Read more

झाडांना राखी बांधून ‘प्राईड स्कूल’ ने दिला पर्यावरणाचा संदेश

पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : येथील प्राइड इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यानी झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. राखी पौर्णिमेनिमित्त प्राइड इंग्लिश स्कूलच्या बाल विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन व पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी वृक्षांना राखी बांधली. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने होणाऱ्या पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी वृक्षांचे महत्त्व पटवून देण्यासाठी या शाळेतील बाल विद्यार्थ्यांनी वृक्षांना … Read more

तक्रार मागे न घेतल्याने लाथा बुक्यांनी मारहाण

डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : पोलिसात दिलेली तक्रार मागे न घेतल्याने भालेकर वस्ती गणेश मंदिरजवळ एका तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १५ ऑगस्ट सायंकाळी ०७ च्या सुमारास घडली. फिर्यादी तरुण फोनवर बोलत … Read more

दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : बाणेर येथील कळमकर ऑफीस समोर गणपती मंदिरजवळ रस्त्यावरील दुभाजकाला धडकून एक तरुण दुचाकीस्वार ठार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री ११:३० च्या सुमारास हा अपघात झाला. मध्यरात्रीच्या सुमारास हा तरुण दुचाकीवरून भरधाव जात होता. स्पीड ब्रेकर वरून स्लीप होऊन रोडच्या दुभाजकाला धडकून गंभीर जखमी झाला होता. अभिजीत पोपट सहाणे, … Read more

आधार प्रमाणीकरण न केल्याने अनेकांना बसला फटका

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘राज्यातील ३३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना ‘आधार’च्या प्रमाणीकरणा अभावी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे योजनेंतर्गत मिळणाऱ्या ५० हजार रुपयांचा लाभ त्यांना मिळाला नाही. हा लाभ मिळविण्यासाठी येत्या ७ सप्टेंबर पर्यंत बँक खात्याशी आधार क्रमांक जोडावा (लिंक) लागणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले … Read more

पुणे विमानतळ बनले एसटी स्टँड

विमानात सीटवरून हाणामारी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोहगाव विमानतळावर ‘इंडिगो’ च्या विमानातून पुणे ते दिल्ली प्रवास सुरू होण्यापूर्वी सीटवर बसण्याच्या कारणावरून महिलेने प्रवासी दाम्पत्याशी वाद घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे विमानतळ आहे का एसटी स्टँड असा प्रश्न प्रवाशांना पडला. विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने प्रवासी दाम्पत्याशी वाद घातला.महिला कॉन्स्टेबलच्या हाताला चावा घेतला.पोलिसांकडून त्या महिलेवर … Read more

जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे भावाची इच्छा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ पुणे : जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे भावाची इच्छा महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनीच्या फुललेला श्री शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा. अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चा पुणे येथे … Read more

स्वारगेट-कात्रज मार्गावरून भुयारी मेट्रो, कात्रजहून हिंजवडी पर्यंत कधी?

केंद्राची मंजुरी : २ हजार ९५४ कोटीं रुपयांचा खर्च महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट ला मेट्रोने जायचे कात्रज करांचे स्वप्न आता पाच वर्षात प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण  स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्रसरकारकडे मान्यतेसाठी प्रलंबित होता.५.४६ किलोमीटरचे हे अंतर असून,त्यासाठी … Read more

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग वाहतुकीत आज बदल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ चे उ‌द्घाटन शनिवारी (दि. १७) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-बंगळुरू महामार्गावर (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) शनिवारी (दि. १७) सकाळी ६ ते रात्री ८ या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेश बंद असेल, कात्रज चौकापासून पुढे नवले बीज … Read more