आवृत्ती , पुणे

गुन्हेगारांना जामीन मिळवून देणार्‍या बनावट जामीनदार, वकिलांचे रॅकेट उद्धवस्त

२ वकिलांसह ११ जणांना अटक, ९५ रेशनकार्ड, ११ आधार कार्ड, कागदपत्रे जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कारागृहात असलेल्या गुन्हेगाराला जामीन मिळवून देण्यासाठी बनावट जामीनदार उभे करुन त्याला जामीन मिळवून देण्यासाठी कागदपत्रे तयार करण्यापासून कोर्टात हे सर्व खरे असल्याचे भासवून न्यायालयाची दिशाभूल करुन जामीन मिळवून देण्याचे रॅकेट पोलिसांनी उद्धवस्त केले आहे. या रॅकेटमधील २ वकिलांसह … Read more

भूमीहिनांकडून लाच घेताना दोन महिला संगणक ऑपरेटर अटकेत

दाखला देण्यासाठी ४०० रुपयांची लाच : हवेली तहसील कार्यालयात सापळाकारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हवेली अप्पर तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात दाखले देण्यासाठी लाच घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भूमिहीन असल्याचा दाखला देण्यासाठी ४०० रुपयांची लाच घेताना दोन महिला संगणक ऑपरेटरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अटक करण्यात आलेल्या महिला संगणक ऑपरेटर म्हणजे वंदना … Read more

चिंतामणी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

२०१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : गणेश जयंती निमित्त चिंतामणी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण २०१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. या शिबिरात श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीचे तज्ज्ञ उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. चिंतामणी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि … Read more

लोहगाव, आनंदनगर, विमाननगर येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

२५ लाख ५१ हजारांचे मॅफेड्रॉन व गांजा जप्त; तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोहगाव-वाघोली रोडवरील संतनगर, बिबवेवाडी येथील आनंदनगर आणि विमाननगर येथे गेल्या दोन दिवसांत अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत २५ लाख ५१ हजार रुपयांचे मॅफेड्रॉन (एम.डी.) आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ … Read more

बार्शी उपसा सिंचन आगळगाव रोड पुलाच्या कामाचे आमदार सोपल यांच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ: बार्शी उपसा सिंचन योजनेच्या उजव्या कालव्यावरील कॅनॉलवरील सात पूल आणि उर्वरित कॅनॉलच्या सुमारे आठ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आज आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार सोपल म्हणाले की, अपक्षांच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या युती सरकारच्या काळात भीमा-सीना जोड कालवा आणि त्यानंतर बार्शी उपसा सिंचन योजना … Read more

गजा मारणेच्या नावाने १३ इंस्टाग्राम अकाऊंट अ‍ॅक्टीव्ह

गुन्हेगारी रील्स बनवून सोशल मीडियावर प्रसारित करणारे चौघे जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: गुन्हेगारीचे उदात्तीकरण करून समाजामध्ये भीती व दहशत पसरवणारे व्हिडिओ, रील्स सोशल मीडियावर टाकणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. गजानन मारणे याच्या नावाने तब्बल १३ इंस्टाग्राम अकाऊंट अ‍ॅक्टीव्ह असल्याचे उघड झाले आहे. अक्षय निवृत्ती शिंदे (वय २०, रा. निमगाव खालु, ता. श्रीगोंदा, जि. … Read more

अनैतिक संबंधांमुळे तरुणाचा खून

कोथरुडमधील घटना, चार अल्पवयीन मुले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: अनैतिक संबंधांमुळे एका तरुणावर अल्पवयीन मुलांनी पालघनने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. कोथरुड पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. राहुल दशरथ जाधव (वय ३०, रा. उंबरे, ता. भोर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ केतन … Read more

पतीसह सासू-सासऱ्याला ७ वर्षे सक्तमजुरी

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १२ वर्षांनी खटल्याचा निकाल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून एका विवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली. या प्रकरणात पतीसह सासू-सासऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने दोषी ठरवत सात वर्षे सक्तमजुरी आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आय. पेरामपल्ली यांनी हा निकाल दिला. … Read more

चाकूचा धाक दाखवून ट्रॅक्टर चोरणारी टोळी जेरबंद

१० ट्रॅक्टर, १ छकडा, २ ट्रेलर जप्त, बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : पहाटेच्यावेळी ट्रॅक्टर चालकाला चाकूचा धाक दाखवून लुबाडणार्‍या चार जणांच्या टोळीला बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १० ट्रॅक्टर, १ छकडा, २ ट्रेलर व मोबाईल असा ५५ लाख ६५ हजारांचा माल जप्त केला आहे. जिग्नेश अंजाबापूर … Read more