आवृत्ती , पुणे

मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

खराडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा खराडी पोलिसांनी पर्दाफाश केला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २.२५ लाख रुपयांचे १४ मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजचा एक तरुण १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत न्यू इंग्लिश फिनिक्स … Read more

एटीएम कार्ड अदला-बदल करुन पैसे काढणारा गुन्हेगार जाळ्यात

शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एटीएम कार्ड अदलाबदल करून फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, तिथे असलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादींना एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डचा पिन क्रमांक मिळवला. नंतर हातचलाखी करून फिर्यादीकडील बँकेचे डेबिट … Read more

सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून ठार मारण्याचा प्रयत्न

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून आणि जुन्या भांडणातून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात इंदिरानगर, बिबवेवाडी येथील तरुणाने फिर्याद दिली आहे. २० ऑक्टोबरच्या रात्री साडेबाराच्या सुमारास … Read more

नव राजस्थान सोसायटीतून चंदनाची झाडे चोरीस

चतुः श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहराच्या गजबजलेल्या परिसरातील एका सोसायटीतून चंदनाची झाडे चोरीस गेली आहेत. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० आणि २१ ऑक्टोबरच्या रात्री घडली. प्लॉट क्र. १२, नव राजस्थान सोसायटी, एस. बी. रोड, पुणे आणि प्लॉट … Read more

प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकास अटक

खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण २१ ऑक्टोबर २०२४ रोजी आंबेजोगाई येथून पुण्यात आला होता. मध्यरात्री दीडच्या सुमारास ते रिक्षात बसले. प्यासा हॉटेल ते सेव्हन लव्ह चौक दरम्यान, रिक्षा चालक … Read more

येरवडा कारागृहात इस्त्री व लॉन्ड्री विभागाचे उ‌द्घाटन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा कारागृह येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीसुविधांनी सुसज्ज इस्त्री व लॉन्ड्री विभागाचे उद्घाटन सुनिल एन. ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे यांच्या हस्ते व अनिल खामकर, अधीक्षक, येरवडा खुले कारागृह, पी. पी. कदम, अति. अधीक्षक, येरवडा कारागृह यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर उपक्रम प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह … Read more

खेड शिवापूर टोलनाक्यावर जप्त केली ५ कोटींची कॅश

आयकर विभागाने घेतली रोकड ताब्यात : पुण्यातून सातारा कडे जात होती गाडी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाचे भरारी पथक विविध चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करत असताना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटींची रोकड जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही रोकड … Read more

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ४ आरोपींना अटक, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : टेंभूर्णी- पंढरपूर महामार्गावरील परीते पाटीवरील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात सोलापूर गुन्हेशाखेच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप जाधव (रा. जैनापूर, विजयपूरा) हे त्यांच्या साथीदारासह चाकण ( जि. पुणे) येथे बकरीचा व्यापार … Read more

दुचाकी चोरणाऱ्या दोन आरोपींना पकडले

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुचाकी चोरणाऱ्या आरोपींकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले आहे. आरोपींकडून ९०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये वाहनचोरीच्या गुन्ह्याचा … Read more