आवृत्ती , पुणे

बार्शीत ३.३५ लाखांच्या चोरीचा तीन तासांत पर्दाफाश

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी मुद्देमालासह रिंग रोडवर पकडला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलिसांनी आपल्या तत्परतेने आणि तांत्रिक कौशल्याने पुन्हा एकदा गुन्हेगारांना धडा शिकवला आहे. अवघ्या तीन तासांत ३ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणातील आरोपीला चोरीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास व सुरक्षिततेची भावना दृढ झाली … Read more

आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला ५ लाखांचा गंडा

पार्टटाईम जॉबच्या नावाखाली सायबर चोरट्यांची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला पार्टटाईम जॉबच्या नावाखाली टेलिग्रामवरील टास्क पूर्ण करण्यास लावून तब्बल ५ लाख २८ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हा प्रकार १६ ते १९ सप्टेंबर २०२५ दरम्यान … Read more

खराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

चंदननगर पोलिसांची कारवाई : महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खराडी येथील अशोकनगर परिसरातील सन शाईन स्पा या मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर चंदननगर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप चव्हाण, रोहित शिंदे, गोपाळ आणि स्वाती ऊर्फ श्वेता विजय शिंदे अशी आरोपींची नावे … Read more

महसूल कर्मचाऱ्यांची पूरग्रस्तांना मदत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माणकेश्वर : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील ग्राम महसूल अधिकारी तसेच धाराशिव जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी संघाचे अध्यक्ष श्री. विशाल खळदकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांची भेट घेतली. मराठवाड्यातील अतिवृष्टी व महापूरामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या अतोनात नुकसानीबाबत संवेदनशीलता दाखवत आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, धाराशिव जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी … Read more

तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गुन्हेगार जेरबंद

खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला वानवडी पोलिसांची वैजापूर येथून अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षातील टेपचा आवाज कमी न केल्याच्या वादातून हडपसरमधील शिंदेवस्ती येथे रिक्षाचालकावर हत्याराने प्राणघातक हल्ला करणारा आणि गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेला गुन्हेगार ऋषिकेश बागुल याला वानवडी पोलिसांनी वैजापूर येथून अटक केली आहे. ऋषिकेश सुनील बागुल (वय २७, रा. एसआरए बिल्डिंग, शिंदेवस्ती, हडपसर) … Read more

मेफेड्रोन विक्री करणारा नायजेरियन नागरिक गजाआड

साडेबारा लाखांचे मेफेड्रोन जप्त : अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मेफेड्रोन विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून १२ लाख ४४ हजार रुपयांचे ६२ ग्रॅम मेफेड्रोन, २ मोबाईल, दुचाकी असा एकूण १२ लाख ९४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. व्हेलेंटाइन उर्फ … Read more

व्यापाऱ्यांवर हल्ला करून लुबाडण्याचे वाढते प्रकार

मुकुंदनगरमध्ये चार दिवसांत दुसरी घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुकुंदनगर परिसरात व्यापाऱ्यांवर हल्ला करून लुबाडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. चार दिवसांत घडलेली ही दुसरी घटना असून परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. २२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास व्यापारी संकेत हेमचंद्र शिंगवी हे विद्या सहकारी बँकेजवळ दुचाकीवर थांबून मोबाईलवर बोलत असताना तिघा चोरट्यांनी त्यांना अडवले. … Read more

नवरात्रीत उपवासाचे पदार्थ घेताना घ्यावयाची काळजी : अन्न व औषध प्रशासनाचा सल्ला

महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत उपवासाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. मात्र अशा वेळी भगरसह इतर उपवासाचे पदार्थ खरेदी आणि सेवन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांनी केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, उपवासाचे पदार्थ योग्य पद्धतीने तयार करून आणि … Read more

लिओ क्लब बार्शी टाउनचा पूरग्रस्त मदत उपक्रम

पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून दिला दिलासा महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे अनेक भाग पूरग्रस्त झाले. विशेषतः कांदलगाव, देवगाव आणि इतर काही गावांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने सुमारे 40 ते 45 घरं पाण्याखाली आली होती. शेतकऱ्यांचेही भरपूर नुकसान झाले असून पिकं खराब झाली. या कठीण परिस्थितीत … Read more

पुण्यात आणखी एका कुख्यात गुंडावर बुलडोझर कारवाई

बंडु आंदेकरनंतर टिपू पठाणच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या धडाकेबाज बुलडोझर कारवाईची देशभर चर्चा झाली होती. त्याच धर्तीवर आता पुणे पोलिसांनीही गुंडांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालविण्याची मोहीम सुरू केली आहे. गुंड बंडु आंदेकरच्या अनधिकृत बांधकामांसह त्याच्या आशिर्वादाने सुरू असलेल्या टपऱ्या व स्टॉल्सवर पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेने नुकतीच … Read more