आवृत्ती , पुणे

सेवानिवृत्त लेखाधिकार्‍यास सायबर चोरट्यांचा दीड कोटींचा गंडा

शेअर मार्केटमध्ये १५ दिवसांत २ लाखांचा नफा देऊन गुंतवणूक करण्यास पाडले भाग महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कमी वेळेत अधिक नफा कसा मिळेल, हे सांगून ५ लाखांच्या गुंतवणुकीवर १५ दिवसांतच २ लाख रुपये नफा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर सेवानिवृत्त लेखाधिकार्‍यास दीड महिन्यात दीड कोटी रुपयांची गुंतवणूक करायला भाग पाडून फसवणूक … Read more

जेव्हा जखमी फिर्यादीच होतो आरोपी

रेकॉर्डवरील गुन्हेगाराला वाचविण्यासाठी केली पोलिसांची दिशाभूल : ८ महिन्यांनी अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चेष्टा-मस्करीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराने फायरिंग केले असताना आणि त्यात स्वतः जखमी झाला असताना गुन्हेगाराला वाचविण्यासाठी पोलिसांची दिशाभूल केली. पोलिसांच्या तपासात खरा प्रकार पुढे आला. तेव्हा तो फरार झाला होता. खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यात फरार झालेल्या या फिर्यादीला पकडण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना … Read more

परिरक्षण भूमापकासह सहाय्यक सर्व्हेयर लाच घेताना जाळ्यात

जमीन मोजणीचा अहवाल सादर करण्यासाठी मागितली होती लाच महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सामायिक जमिनीची मोजणी करून त्याचा अहवाल आणि वाटप तक्ता तयार करून तो प्रस्ताव दौंड तहसीलदार यांना सादर करण्यासाठी तसेच तक्रारदाराला प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दौंड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक आणि सहाय्यक सर्व्हेयर … Read more

गहाळ झालेले महागडे १२ मोबाईल हस्तगत

हरवलेले व चोरीला गेलेले ८ लाखांचे मोबाईल समर्थ पोलिसांनी परत मिळविले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरवलेले तसेच सायबर गुन्ह्यात चोरीला गेलेले मोबाईल परत मिळविण्यात समर्थ पोलिसांना यश आले आहे. तब्बल ८ लाख रुपये किंमतीचे असे १२ महागडे मोबाईल पोलिसांनी हस्तगत करून तक्रारदारांना परत केले. पुणे शहर व परिसरात गर्दीच्या ठिकाणांहून … Read more

लोणी काळभोर, कोंढवा, वानवडीतील १० गुन्हेगार तडीपार

कोंढवा, वानवडीतील दोन टोळ्यांतील ७ गुन्हेगारांचा समावेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शस्त्रांचा धाक दाखवून दहशत पसरवणे, दरोडे टाकणे, पिस्तुल बाळगणे, गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोणी काळभोर, कोंढवा आणि वानवडी परिसरातील १० गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या आदेशाने करण्यात … Read more

सिक्युरिटी गार्डचे हात बांधून ७ लाखांची रोकड चोरी

वाकडेवाडी येथील ब्राम्हा मोटर्स रॉयल एनफिल्ड शोरुममध्ये धाडसी घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाकडेवाडी येथील ब्राम्हा मोटर्स रॉयल एनफिल्ड शोरुममध्ये सिक्युरिटी गार्डला कटरचा धाक दाखवून, त्याचे दोन्ही हात नायलॉनच्या पट्टीने बांधून, तब्बल ७ लाख ११ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धाडसी घटना उघडकीस आली आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी पहाटे पावणे तीन वाजता … Read more

बनावट सोनसाखळ्या गहाण ठेवून सराफांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

बनावट पावत्या व आधार कार्ड वापरून घालत होते गंडा : युनिट ६ ची मोठी कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : होलमार्कची चिन्हे असलेली बनावट सोनसाखळी व ब्रेसलेट हे खरे असल्याचे भासवून सराफांकडे गहाण ठेवून पैसे उकळणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले आहे. राहुल संजय गोरे (वय ३०, रा. ओम अपार्टमेंट, मोहननगर, … Read more

पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार

बिबवेवाडीतील घटनेत दोघेजण गंभीर जखमी; खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाच्या डोळ्यात स्प्रे मारून त्याच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचविण्यास आलेल्या मित्रावरही मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत तरुणासह त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अभय रमेश साठे (वय २३, रा. … Read more

रेल्वे प्रवासी महिलेकडील दागिने चोरणारा चोरटा दिल्लीतून जेरबंद

पुणे व मिरज स्थानकातील चोरीचे गुन्हे उघड : पुणे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रेल्वे स्टेशनवर उतरण्याच्या वेळी मदत करण्याचा बहाणा करून महिला प्रवाशांच्या बॅगेतील दागिने चोरणाऱ्या चोरट्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. या चोरट्याने पुणे व मिरज रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांकडील ऐवज लांबवल्याचे दोन गुन्हे उघड झाले असून, त्याच्याकडून एकूण … Read more

हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल

समितीच्या सभेत सर्वानुमते निर्णय, नव्या कार्यकारिणीची घोषणा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हिंदू आध्यात्मिक सेवा समितीच्या अध्यक्षपदी कोहिनूर ग्रुपचे चेअरमन व सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत ही निवड झाली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात … Read more