आवृत्ती , पुणे

तिघा वाहनचोरांना आंबेगाव पोलिसांनी अटक

२ लाखांच्या ५ मोटारसायकली जप्त : ‘इझी मनी’ मिळवण्यासाठी केली चोरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांच्या गस्ती पथकाने अडवून चौकशी केल्यावर त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून २ लाख रुपये किमतीच्या ५ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.शेतीकाम करणाऱ्या या तरुणांनी ‘इझी मनी’ … Read more

व्यावसायिकाला ५० लाखांची खंडणी मागणारा गुन्हेगार गजाआड

मुंढवा पोलिसांनी १२ तासांत केली कारवाई : मौजेसाठी मागितली होती खंडणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यावसायिकाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. मौजमजेसाठी पैसे मिळावेत, या कारणासाठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. अनिकेत अनिल पावल (वय २४, रा. घोरपडी) असे … Read more

सण-उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरात RAF चा प्रभावी रूट मार्च

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : आगामी सण-उत्सव व निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा आणि संभाव्य सामाजिक अस्थिरता, धार्मिक व जातीय संघर्ष उद्भवल्यास तत्काळ व प्रभावी कारवाई करता यावी, यासाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (RAF) च्या बटालियनसह भव्य रूट मार्च दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेत … Read more

बोपदेव घाटात तरुणांना लुटणाऱ्या पोलिस अंमलदाराला शिक्षा

कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : पोलिस उपायुक्तांनी तीन वर्षांसाठी वेतनवाढ रोखली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्यानंतर तेथे पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले. या पोलिस मदत केंद्रातील पोलिस अंमलदाराने तेथे आलेल्या तरुणांना अटक करण्याची भीती दाखवून लुटले होते. या पोलिस अंमलदारावर पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी … Read more

कंपनीच्या रिलेशनशिप महिला मॅनेजरवर गुन्हा दाखल

कंपनी व सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांकडून वैयक्तिक खात्यात पैसे घेऊन फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटविषयक प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीतील महिला रिलेशनशिप मॅनेजरने कंपनी व सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांचे पैसे वैयक्तिक खात्यावर घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सुनीलकुमार सत्यकुमार सिंग (वय ३९, रा. मगरपट्टा सिटी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात … Read more

कामगारांच्या पगाराचे २१ लाख रुपये घेऊन पळालेला कारचालक गजाआड

तीन महिन्यांनंतर चालकाला पकडण्यात काळेपडळ पोलिसांना यश : १५ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कामगारांच्या पगाराचे २१ लाख रुपये चोरून पळून गेलेल्या कारचालकाचा शोध घेण्यासाठी मिरजपासून बीड ते मुंबई असा मागोवा घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी मुंब्रा येथे काळेपडळ पोलिसांना यश मिळाले. सलमान यासीन पठाण (वय ३२, रा. ईसा हाइट्स, ठाणे; मूळ रा. … Read more

मोबाईल घेतल्याच्या कारणावरून कामगाराचा खून

धायरीतील घटना; नांदेडसिटी पोलिसांनी दोघांना अटक, एक कामगार फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारू पिताना मोबाईल घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी आपल्या सहकारी कामगाराचा बेदम मारहाण करून खून केला. नांदेडसिटी पोलिसांनी दोघा कामगारांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. खून झालेल्या कामगाराचे नाव देवा उर्फ देवीदास व्यंकटराव पालते (वय २५, रा. … Read more

भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण

पुण्यातून पळविलेल्या २ वर्षांच्या मुलीची तुळजापूरमधून सुटका : पाच जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज येथून अपहरण झालेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीची भारती विद्यापीठ व गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून सुखरूप सुटका केली. या प्रकरणी अपहरण करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. भीक मागण्यासाठी या चिमुकलीचे अपहरण करण्यात आले, असे … Read more

ट्रेड प्राफिट फंडांतील गुंतवणुकीच्या आमिषाने ७० लाखांची फसवणूक

हातउसने, कर्ज काढून जमवलेले पैसे मनी ट्रान्सफर व्यवसायिकाने गमावले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ट्रेड प्राफिट फंडात रोख स्वरूपात गुंतवणूक केल्यास तुम्हाला ऑनलाईन आरटीजीएसद्वारे पैसे परत मिळतील, त्याबरोबरच १० टक्के कमिशन मिळेल, अशा झटपट मिळणाऱ्या मोठ्या कमिशनच्या आमिषाला बळी पडून मनी ट्रान्सफरचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने मित्र, नातेवाईक यांच्याकडून व कर्ज काढून ७० लाख रुपये जमवले. … Read more

चिनी सायबर गुन्हेगाराशी संगनमत करणाऱ्या चित्रपट निर्मात्यास अटक

फसवणुकीसाठी सायबर चोरट्यांना बँक खाते केले होते उपलब्ध : पिंपरी सायबर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भारतातील नागरिकांना शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या परदेशातील सायबर चोरट्यांशी संगनमत करून त्यांना येथील बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्यांचे प्रकार यापूर्वी समोर आले होते. आता चिनी सायबर चोरट्यांना डेक्कन जिमखाना सारख्या … Read more