आवृत्ती पुणे

हॉटेलमधील सूपमध्ये सापडले झुरळ

हॉटेल मालक, व्यवस्थापकावर कारवाई : एफडीएच्या अहवालानंतर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हॉटेलमध्ये सहकुटुंब जेवणासाठी गेलेल्या एका महिलेला दिलेल्या सूपमध्ये झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सूपची तपासणी केल्यावर ते सूप आरोग्यास अपायकारक असल्याचा अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल आल्यावर एम. जी. रोडवरील भिवंडी दरबार या हॉटेलचे मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा … Read more

दाजीने मारला मेव्हण्याच्या तिजोरीवर डल्ला

मेव्हण्याचे कुटुंबीय घरी आले असताना त्यांच्या घरी जाऊन केली घरफोडी : कोंढव्यातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मेव्हणा कामावर गेला असताना त्याचे कुटुंबीय अश्रफनगरमधील बहिणीच्या घरी गेले होते. त्याचदरम्यान चोरट्याने त्यांच्या घरात शिरून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कोरे धनादेश असा २ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घराच्या सेफ्टी डोअरचे कुलूप व मेन … Read more

बालकाकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : नॅन्सी लेक होम ते लेकटाऊन रस्त्यावर संशयित बालकास पकडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यातून गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण ५०,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस … Read more

“माऊली स्कॉड”ची यशस्वी कामगिरी – अतुल कुलकर्णी यांची अभिनव संकल्पना

१५६ संशयित ताब्यात, २१ आरोपी अटकेत : १६ गुन्हे उघड, ₹17.99 लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : आषाढी वारी २०२५ दरम्यान, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या “माऊली स्कॉड”च्या कार्यामुळे चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर टाळण्यात यश आले. या स्कॉडने आतापर्यंत १५६ संशयितांना ताब्यात घेतले असून, २१ आरोपींना अटक करत १६ गुन्हे … Read more

पत्नीच्या त्रासामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी व तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पत्नी आणि तिच्या प्रियकराने दिलेल्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाना पेठेत घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अतुल मारुती कदम (वय ३९, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ) असे … Read more

घर बळकाविण्यासाठी भावांनी दिली जीवे मारण्याची धमकी

धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या नणंदेची तक्रार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विवाहित महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल झालेल्या नणंदेने समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली असून, आपले दोन भाऊ व भावजयी यांनी वडिलोपार्जित घर बळकाविण्यासाठी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याबाबत भवानी पेठेतील ३४ वर्षांच्या नणंदेने समर्थ पोलीस ठाण्यात … Read more

पाच महिने फरार असलेले मोकातील दोन गुन्हेगार जेरबंद

खुनाचा प्रयत्न : मोकातील गुन्हेगारांना खडकी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या टोळक्यावर पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई करून ६ जणांना अटक केली होती. त्यांच्यातील दोघे सराईत गुन्हेगार फेब्रुवारीपासून पाच महिने फरार होते. पोलिसांनी … Read more

मौजमजेसाठी घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

समर्थ पोलिसांची कामगिरी : चार तासांत गुन्हा उघड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नाना पेठेतील दुकानाचे शटर वाकवून, दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमधून पैसे चोरून नेणाऱ्या चोरट्यांना समर्थ पोलिसांनी अवघ्या चार तासांत जेरबंद केले. सुजल राजन परदेशी (वय २०, रा. शिवाजी स्टेडियमसमोर, मंगळवार पेठ), सुभाष राजेश सरोज (वय २१), नितीन दिलीप सरोज (वय २२) आणि रोहित मुन्नालाल … Read more

नवविवाहित महिलेवर धर्मांतराचा दबाव

येशू ख्रिस्ताच्या नावाने पाणी पाजण्याचा प्रयत्न : नणंद आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एका १९ वर्षांच्या नवविवाहित हिंदू महिलेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. येशू ख्रिस्ताच्या नावाने पाणी पाजण्याचा प्रयत्न करून तसे न केल्यास पती व दिराविरोधात खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा … Read more

पुण्यात धर्मांतरविरोधात आक्रोश मोर्चा

ऋतुजा आत्महत्येच्या घटनेनंतर संतप्त हिंदू समाज रस्त्यावर : आमदार पडळकर यांचा सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सांगली येथील ऋतुजा राजगे या विवाहित हिंदू महिलेला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी सासरच्या मंडळींकडून जबरदस्तीचा सामना करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर, तिने सात महिन्यांच्या गर्भासह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर पुण्यात संतप्त हिंदू समाज रस्त्यावर उतरला आणि आक्रोश मोर्चाचे … Read more