आवृत्ती पुणे

औंध भागात दहशत माजवणाऱ्या ७ गुंडांना केली जेरबंद

चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी : गावठी कट्टा, ३ कोयते, कार व २ मोटारसायकली जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : औंध येथील विधाते वस्तीत १२ ते १५ आरोपींनी हातात लाकडी दांडके व हत्यारे घेऊन दहशत निर्माण केली होती. चतु:श्रृंगी पोलिसांनी मुळशी भागातून ७ गुंडांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, तीन कोयते, एक कार आणि दोन … Read more

आषाढी वारी आणि मोहरम एकाच दिवशी : बार्शी शहरात कडक बंदोबस्त

पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांचे नागरिकांना सलोख्याचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बार्शी शहरात येत्या ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी आणि मोहरम हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत. आषाढी एकादशीनिमित्त भगवंत मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. हे मंदिर बार्शीतील वारकरी परंपरेचे महत्त्वाचे केंद्र असून, आषाढी एकादशीच्या दिवशी येथे … Read more

पीएसआयच मद्यप्राशन करून करत होता ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह कारवाई

दारुच्या नशेत ठेकेदाराशी हुज्जत घालणारा पीएसआयला केले निलंबित महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मद्यप्राशन करून गाडी चालवून अपघाताला कारणीभूत होऊ नये, यासाठी पोलीस दलाकडून नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली जाते. पण, एखादा श्रेणी पोलीस उपनिरीक्षकच दारूच्या नशेत ‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’ची तपासणी करताना वाहनचालकाशी हुज्जत घालत असेल, तर? अशाच प्रकारामुळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस उपायुक्त हिम्मत … Read more

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

ज्येष्ठांबरोबर एटीएम कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करण्याच्या नावाखाली तरुणाला घातला गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली हातचलाखीने कार्ड बदलून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचवेळी एटीएम कार्ड अ‍ॅक्टिव्हेट करून देण्याच्या नावाखाली चोरट्याने एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वाघोली येथील एका ३१ वर्षीय तरुणाने विश्रामबाग पोलीस … Read more

अमृत २ पाणीपुरवठा योजनेच्या समर्थनार्थ भूममध्ये मोर्चा

संजय गाढवेंनी दिली मीटरमुक्तीची ग्वाही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या अमृत-२ पाणीपुरवठा योजनेच्या समर्थनार्थ गुरुवारी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोर्चा काढण्यात आला. यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी गाढवे यांनी मीटरमुक्तीची आणि वाढीव नळपट्टी न आकारण्याची ग्वाही उपस्थितांना दिली. योजनेची शहराला गरज असल्याने, पाणी कृती समिती आणि … Read more

जोधपूरवरून अंमली पदार्थ आणून कोंढव्यात विक्री

गॅस वितरकाकडे काम करणाऱ्या तरुणाकडून १३ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढव्यात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तरुणाला पकडून त्याच्याकडून १३ लाख ६० हजार रुपयांचे ६७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केले आहे. सुनिल बिश्नाराम चौधरी (वय २०, रा. खडी मशीन चौक, कोंढवा) असे या तरुणाचे नाव आहे. सुनिल चौधरी … Read more

वडगावच्या गजानन ज्वेलर्सवर दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

अहिल्यानगरमधून अटक : साडेतीन लाखांचा ऐवज जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून वडगाव येथील श्री गजानन ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अहिल्यानगर येथून जेरबंद केले आहे. त्यांच्यातील एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले होते. वरदन संजय खरटमल (वय २०, रा. शांताईनगर, पठार वस्ती, वडगाव), अमर हनुमंत … Read more

कारमधून येऊन घरफोडी करून जाणारे चोरटे जेरबंद

८०० सीसीटीव्हींचा मागोवा घेऊन अटक : हडपसर पोलिसांनी ३७ लाखांचा माल केला जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सहकुटुंब तुळजापूर, अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले असताना चोरट्यांनी घरफोडी करून ३८ लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी शहराच्या बाहेर लवळेपर्यंत गेले. मात्र, तरीही ते पोलिसांना चुकवू शकले नाहीत. हडपसर पोलिसांनी … Read more

कागदपत्रे काढून देण्यासाठी मागितली लाच

लाच लुचपत प्रतिबंधकची पुण्यात दोन ठिकाणी कारवाई : दोघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घर खरेदीखताची प्रत काढून देण्यासाठी तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे केलेल्या तक्रार अर्जाची फाईल शोधून देण्यासाठी लाच मागणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. मामलेदार कचेरीतील तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली १ यांच्या कार्यालयात खासगी रायटर … Read more