आवृत्ती , पुणे

पुण्याच्या रस्त्यावर आता पोलीसही नाहीत सुरक्षित

नाकाबंदीत स्पोटर्स बाईकच्या धडकेत दोघा पोलिसांसह चौघे जखमी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रस्त्यावर रात्रीच्या वेळी बॅरिकेट लावून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या तरुणाने बॅरिकेटला धडक देऊन कारची तपासणी करणाऱ्या पोलिसांना जखमी केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन पोलीस, कारचालक आणि स्पोर्ट्स बाईकवरील तरुणी असे चारजण जखमी झाले आहेत. रस्त्यावर … Read more

दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटले

लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बुलेटवरून जाणाऱ्या एका तरुणाला तिघांनी मारहाण करून लुटल्याची घटना म्हातोबाची आळंदी येथील शिव मंदिराजवळ घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी फिर्यादी तरुण (वय ३२ वर्षे, रा. म्हातोबाची आळंदी) बुलेटवरून रात्रीच्या सुमारास जात होता. म्हातोबाची आळंदी रेल्वे पुलाच्या काही अंतरावर … Read more

एमपीडीए मधील फरार सराईत गुन्हेगार जेरबंद

बिबवेवाडी पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एमपीडीएमधील चार महिन्यांपासून फरार सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार किरण राजू खवळे (रा. गणेशनगर, अप्पर बिबवेवाडी) याला तडीपार करण्यात आले होते. तरी देखील त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरू असल्यामुळे पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार … Read more

सराईत गुन्हेगाराकडून ३ पिस्टल ६ काडतूस जप्त

गुन्हे शाखा, युनिट-२ ची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सराईत गुन्हेगाराकडून ३ पिस्टल आणि ६ काडतुसे असा एकूण १,२२,४१०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात गुन्हे शाखा, युनिट-२च्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांना वेळोवेळी तपासून … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

परराज्यातील दारू, तसेच ४ वाहने जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परराज्यातील दारू तसेच ४ वाहनांसह ४० लाख ६४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क, मुंबई विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, … Read more

विनापरवाना शिवसेना उमेदवाराचा एअर बलुन लावला

फुरसुंगीच्या लॉज मालकावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लॉजच्या टेरेसवर विना परवाना शिवसेना उमेदवाराच्या नावाचा एअर बलुन लावून आचार संहिता भंग केल्याबद्दल फुरसुंगीच्या लॉज मालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शेखर अमददीप कांबळे (वय ३८, रा. गाडीतळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजिंगचे … Read more

वेश्या व्यवसायाला लावलेल्या पाच तरुणीची सुटका

फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चांगल्या पगाराची नोकरी देतो, असे सांगून पुण्यात आणून वेश्या व्यवसायात लावलेल्या पाच तरुणींची गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने सुटका केली. या पाच तरुणींमध्ये, दोघींना त्यांच्या पतींनी पुण्यात आणून वेश्या व्यवसायात लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमी सौरभ बिश्वास … Read more

वडगाव मावळनजीक साकारले भव्य जैन संस्कृती संग्रहालय

५० एकर जागा, ५०० कोटी रुपये खर्च, दहा वर्षे बांधकाम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : वडगाव मावळजवळ तब्बल पन्नास एकर जागेवर भव्य जैन संस्कृती संग्रहालय उभारण्यात आले आहे. सुमारे पन्नास एकरचा भव्य परिसर आणि तब्बल पाचशे कोटी रुपये खर्च करून ज्येष्ठ उद्योजक आणि फोर्स मोटर्सचे चेअरमन अभय फिरोदिया यांनी त्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त समाजाला जैन संस्कृतीवर … Read more

पाणी मीटर निरीक्षक व कंत्राटी कॉम्प्युटर आॅपरेटर जाळ्यात

पाणी पट्टीचे बिल कमी करण्यास लाच मागितली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड : पाणीपट्टी बिल सरासरी काढले जात असताना ते नियमितपणे, म्हणजे जितका पाणी वापर होईल तितके बिल काढण्यासाठी १ हजार ६०० रुपयांची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभागातील पाणी मीटर निरीक्षक व कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर यांना सापळा रचून पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड … Read more