आवृत्ती , पुणे

सराईत गुंडांकडून पोलीस हवालदाराला मारहाण

वाहनांवर केलेल्या दंडात्मक कारवाईच्या रागातून कानाखाली मारहाण : तिघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ट्रिपल सीट जात असताना गाडी अडवून दंडात्मक कारवाई केल्याच्या कारणावरून चौघा गुंडांनी वाहतूक पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करून कानाखाली मारहाण करत त्यांचा गणवेश फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नर्‍हे पोलिसांनी तिघा गुंडांवर कारवाई केली आहे. लकी गौरव आनंद (वय २१), … Read more

जमीन वाटप पत्राच्या निकालाची प्रत देण्यासाठी मागितली १ लाखांची लाच

जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी महिलेवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडिलोपार्जित जमिनीच्या झालेल्या वाटपपत्राच्या नोंदीबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाची केवळ प्रत देण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ ३० रुपये भरून ज्या निकालाची प्रत मिळू शकते, त्यासाठी ही महिला उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्यासाठी १ लाख रुपयांची … Read more

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जैन समाजाचे उमेदवार केंद्रस्थानी

भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून एकूण सात जैन समाजातील उमेदवार मैदानात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, यंदाच्या निवडणुकीत जैन समाजाचे उमेदवार अनेक प्रभागांतून रिंगणात उतरले आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी जैन समाजातील नेतृत्वावर विश्वास दाखवत उमेदवारी दिल्याने शहराच्या राजकारणात जैन समाज पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. पुणे शहरात सुमारे … Read more

खानापूर सराफ दुकानावर दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

ग्रामीण पोलिसांनी सिंगापूरच्या जंगलातून ४८ तासांत केली अटक, ७० लाखांचे ५६ तोळे दागिने जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खानापूर येथील सराफ दुकानात शस्त्राचा धाक दाखवून तब्बल १ कोटी रुपयांचे ८४ ग्रॅम सोन्याचे दागिने लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांना पुणे ग्रामीण पोलिसांनी सिंगापूरच्या जंगलातून जेरबंद केले. त्यांच्याकडून ७० लाख ३२ हजार रुपयांचे ५६ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत … Read more

संघटित टोळ्यांचा आर्थिक कणा मोडून काढण्याचा निर्धार

बंडू आंदेकर, नीलेश घायवळ, गज्या मारणे, टिपू पठाण यांच्या मालमत्तेवर आणली टाच महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुन्हेगारी टोळ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी या टोळ्यांना ज्या गोष्टींमधून आर्थिक पुरवठा होतो, त्यावरच घाला घालण्याची आक्रमक भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे. त्यातूनच बंडू आंदेकर, नीलेश घायवळ, गजानन मारणे, टिपू पठाण या टोळ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात येत आहेत. पोलीस … Read more

साडेपाच हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची दक्षता, गुन्हेगारीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुका शांततेत पार पाडणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत साडेपाच हजार जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणे शहरात वर्षभरात … Read more

हॉटेल रुम बुकसाठी दिलेल्या आधार कार्डचा गैरवापर

बनावट बँक खाती उघडून सायबर फसवणुकीसाठी वापर : आयटी तरुणाला फटका महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : त्रिंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी जाण्यासाठी आयटी इंजिनिअर तरुणाने हॉटेल रुम बुक करण्यासाठी आधार कार्ड दिले होते. मात्र रुम बुक न करताच त्या आधार कार्डचा वापर करून एकाच वेळी सहा बनावट बँक खाती उघडण्यात आली असून, ती सायबर फसवणुकीतील पैसे स्वीकारण्यासाठी … Read more

भूम शहरात विकासकामे सुरूच राहणार : दररोज पाणीपुरवठ्याची ग्वाही

मीटरद्वारे पाणीपुरवठा झाल्यास नगराध्यक्षपदाचा राजीनामा देईन : संयोगिता गाढवे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम शहरातील मंजूर तसेच सुरू असलेली सर्व विकासकामे पूर्ण केली जाणार असून अमृत–२ योजनेचे कामही पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार असून तो पाणीपुरवठा मीटर न लावता केला जाईल, अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी दिली. आलमप्रभू … Read more

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून

भेकराईनगरमधील घटना : पतीने स्वतः पोलिस चौकीत हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुळबाळ होत नसल्याचा ताण आणि पत्नीच्या चारित्र्याविषयी संशयातून पतीने पत्नीचा हाताने व दोरीने गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना भेकराईनगर येथे घडली. खून केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलिस चौकीत हजर झाला. फुरसुंगी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. प्रियांका … Read more

गँगस्टर बंडु आंदेकर याची भावजय, सुनेने भरला उमेदवारी अर्ज

बंडू आंदेकर याने ही भरला फॉर्म : आंदेकर कुटुंबियांना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजीस मनाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गँगस्टर बंडु आंदेकर याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी सकाळी आपले अर्ज दाखल केले. बंडु आंदेकरही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात … Read more