आवृत्ती , पुणे

घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची कामगिरी : ३ घरफोड्या उघड, १८ लाखांचा ऐवज हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार घरी परतल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने धडक कारवाई करत त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले. चौकशीत तीन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले असून, तब्बल १८ लाख २२ हजार … Read more

आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी फुंकले रणशिंग

भूम नगर परिषद निवडणुकीची धुरा संजय गाढवे यांच्या हाती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज झाली असून, या निवडणुकीची धुरा संजय गाढवे यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. शिवसेनेला भूम शहरासह ग्रामीण भागात प्रचंड जनसमर्थन मिळत असल्याने या निवडणुकीत घवघवीत यश मिळेल, असा विश्वास माजी मंत्री व आमदार प्रा. … Read more

पत्नीचा खून करून मृतदेह जाळला

‘दृश्यम’प्रमाणे केला खून : वारजे माळवाडी पोलिसांनी केली पतीला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर वारजे माळवाडी पोलिसांनी केलेल्या तपासात पतीने ‘दृश्यम ३’ फिल्मी स्टाईलने पत्नीचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह जाळून राख नदीपात्रात टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. पत्नीच्या मिसिंगबाबत वारंवार चौकशी केल्याने पोलिसांचा संशय त्याच्याकडे गेला. तपासात समजले … Read more

इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ७ विद्यार्थ्यांची फसवणूक

मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देण्याचे आमिष : ४७ लाख रुपये उकळून फरार, ५ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन जाहिरात करून आणि नामांकित विद्यापीठांबरोबर टायअप असल्याची खोटी माहिती देऊन ७ विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सात विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी तब्बल ४७ लाख रुपये उकळण्यात आले आहेत. चंदननगर पोलिसांनी ५ … Read more

दौंड नगरपरिषदेच्या लेखाधिकारी आणि क्लार्कवर लाच मागितल्याचा गुन्हा

सुरक्षा रक्षक आणि कामगार पुरविणाऱ्या एजन्सीकडे मागितली होती लाच : दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दौंड नगरपरिषदेस सुरक्षा रक्षक तसेच कुशल आणि अकुशल कामगार पुरविणाऱ्या एजन्सीकडून बिल काढल्यानंतर दरमहा लाच मागणे लेखाधिकारी व क्लार्क यांना चांगलेच महागात पडले. लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने आठ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखाधिकारी … Read more

मार्केटयार्डमधील ऋतुराज सोसायटीतील बंगला फोडला

कचरा वेचक महिलांनी पोत्यांमध्ये भरून बंगल्यातील साहित्य चोरून नेले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मार्केटयार्डमधील ऋतुराज सोसायटीमधील बंद असलेल्या बंगल्यात शिरून काही महिलांनी आतील साहित्य चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत प्राथमिक माहितीनुसार, ऋतुराज सोसायटीतील बंगला क्रमांक ३२ मध्ये विजय वैद्य राहतात. ते गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून आपल्या मुलीला भेटण्यासाठी परदेशात गेले … Read more

पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीने आणखी एका सरकारी जमिनीचा केला अपहार

बोपोडी येथील कृषी खात्याची ५ हेक्टर जमीन लाटली, तहसीलदार, दिग्विजय पाटीलसह ९ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंढवा येथील जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया होल्डिंग्ज’ कंपनीचा आणखी एक जमीन गैरव्यवहार उघडकीस आला आहे. कृषी खात्याच्या मालकीची बोपोडी येथील ५ हेक्टर ३५ आर जमीन तहसीलदाराला हाताशी … Read more

बार्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांमध्ये बदल

तैमूर मुलाणी यांची नियुक्ती, बाळासाहेब चव्हाण यांची बदली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 55 क्लास वन अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये बार्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांची बदली झालेली आहे. त्यांच्या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तैमूर मुलाणी यांची मुख्याधिकारी, बार्शी नगरपरिषद (जिल्हा सोलापूर) म्हणून … Read more

पादचार्‍यांच्या हातातून मोबाईल हिसकावणारा सराईत चोरटा जेरबंद

विनानंबर प्लेटची गाडी वापरत होता, तीन गुन्हे उघडकीस, ७० हजारांचा ऐवज जप्त : बंडगार्डन पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रेल्वे स्टेशन परिसरात पादचारयांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या सराईत चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल चोरी आणि एक मोटारसायकल चोरी असे तीन गुन्हे उघडकीस आले असून, ७० हजार रुपये किमतीचा माल जप्त … Read more

गणेशोत्सवात दागिने चोरणारा चोरटा दोन महिन्यांनी जेरबंद

७ गुन्हे उघडकीस, ७ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त : विश्रामबाग पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवाच्या गर्दीचा गैरफायदा घेत भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी दोन महिन्यांच्या तपासानंतर अखेर जेरबंद केले. त्याच्याकडून सात गुन्ह्यांतील सुमारे ७० ग्रॅम वजनाचे, ७ लाख ११ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. … Read more