आवृत्ती , पुणे

हॉटेल रुम बुकसाठी दिलेल्या आधार कार्डचा गैरवापर

बनावट बँक खाती उघडून सायबर फसवणुकीसाठी वापर : आयटी तरुणाला फटका महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : त्रिंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी जाण्यासाठी आयटी इंजिनिअर तरुणाने हॉटेल रुम बुक करण्यासाठी आधार कार्ड दिले होते. मात्र रुम बुक न करताच त्या आधार कार्डचा वापर करून एकाच वेळी सहा बनावट बँक खाती उघडण्यात आली असून, ती सायबर फसवणुकीतील पैसे स्वीकारण्यासाठी … Read more

भूम शहरात विकासकामे सुरूच राहणार : दररोज पाणीपुरवठ्याची ग्वाही

मीटरद्वारे पाणीपुरवठा झाल्यास नगराध्यक्षपदाचा राजीनामा देईन : संयोगिता गाढवे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम शहरातील मंजूर तसेच सुरू असलेली सर्व विकासकामे पूर्ण केली जाणार असून अमृत–२ योजनेचे कामही पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार असून तो पाणीपुरवठा मीटर न लावता केला जाईल, अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी दिली. आलमप्रभू … Read more

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून

भेकराईनगरमधील घटना : पतीने स्वतः पोलिस चौकीत हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुळबाळ होत नसल्याचा ताण आणि पत्नीच्या चारित्र्याविषयी संशयातून पतीने पत्नीचा हाताने व दोरीने गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना भेकराईनगर येथे घडली. खून केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलिस चौकीत हजर झाला. फुरसुंगी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. प्रियांका … Read more

गँगस्टर बंडु आंदेकर याची भावजय, सुनेने भरला उमेदवारी अर्ज

बंडू आंदेकर याने ही भरला फॉर्म : आंदेकर कुटुंबियांना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजीस मनाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गँगस्टर बंडु आंदेकर याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी सकाळी आपले अर्ज दाखल केले. बंडु आंदेकरही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात … Read more

पुणे मनपातील तीन प्रभागांत जैन मतदार ठरणार ‘किंगमेकर’

70 ते 80 हजार जैन मतदानावर भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेसची नजर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 बिबवेवाडी, 21 महर्षी नगर आणि 40 कोंढवा हे तीन प्रभाग राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. या तिन्ही प्रभागांत मिळून सुमारे 70 ते 80 हजार जैन समाजाचे मतदान असल्याने, कोणता पक्ष जैन समाजातील उमेदवाराला संधी … Read more

पिकअप चोरी करणाऱ्या चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

पर्वती पोलिसांनी पिकअपसह १४ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे – सातारा रोडवरील कृष्णा चेंबर्ससमोर लावलेले पिकअप चोरून नेणाऱ्या चोरट्याला पर्वती पोलिसांनी अटक करून पिकअपसह १४ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. शिवा मिठ्ठुलाल यादव (वय २०, रा. वरद अपार्टमेंट, जाधव वस्ती, चिखली, मूळ रा. सायन, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे … Read more

हमाल पंचायतच्या नवनिर्वाचित अध्यक्ष गोरख मेंगडे यांचा व्यापाऱ्यांकडून सन्मान

मार्केटयार्ड मधील व्यापाऱ्यांकडून शाल-हार अर्पण, व्यापारवाढीवर सखोल चर्चा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड येथील हमाल पंचायतच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गोरख मेंगडे यांचा मार्केटयार्ड मधील व्यापाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. मार्केटयार्ड येथील हमाल पंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोरख मेंगडे यांचा व्यापारी अभय बन्सीलाल संचेती यांच्या वतीने शाल व हार देऊन गौरव करण्यात आला. या सन्मान … Read more

तरुणाचा खून करून पळून गेलेले दोघे नांदेडहून जेरबंद

प्रेमसंबंधावरून लहान भावाने तरुणाच्या डोक्यात वार करून केला होता खून : आंबेगाव पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बहिणीसमवेतच्या प्रेमसंबंधाच्या रागातून तिच्या लहान भावाने मित्राच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून केला होता. त्यानंतर गावाला पळून गेलेल्या दोघांना आंबेगाव पोलिसांनी नांदेडहून जेरबंद केले आहे. संदीप रंगराव भुरके (वय २५) आणि त्याचा … Read more

घरफोड्या करणाऱ्या चौघांना पकडून दीड कोटींचा ऐवज जप्त

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी, नातेवाईकाच्या घरातच चुलत पुतण्याचे कृत्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तमनगर आणि वारजे माळवाडी येथील दोन घरफोड्या उघडकीस आणून चार जणांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून या दोन्ही घरफोड्यांमधील तब्बल दीड कोटी रुपयांचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. यामध्ये चुलत पुतण्यानेच आपल्या नातेवाईकाच्या घरात शिरून चोरी केल्याचे निष्पन्न झाले … Read more

सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीस दिल्लीहून अटक

बार्शी शहर पोलिसांची कारवाई : १.९८ लाख रुपये फिर्यादीस परत महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीसांनी चार वर्षांपूर्वी दाखल असलेल्या सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीस दिल्ली येथून अटक करून, गुन्ह्यातील संपूर्ण १ लाख ९८ हजार २०८ रुपये रक्कम फिर्यादीस परत मिळवून दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी फिर्यादी … Read more