आवृत्ती , पुणे

बाजार समितीवर राऊत गटाची 18–0 ने एकहाती सत्ता!

एकही जागा न गमावता बळीराजा आघाडीची पुनश्च सत्ता : फटाक्यांच्या रोषणाईत जल्लोष महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. यात सर्व १६ जागांवर भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास आघाडीने विजय संपादन केला. त्यांनी आमदार दिलीप सोपल व बारबोले यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन … Read more

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १७६ चालकांवर कारवाई

वाहतूक शाखेची ३ दिवस विशेष मोहीम, २० ठिकाणी नाकाबंदी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मद्यप्राशन करून भरधाव वाहन चालविल्यामुळे वाहनचालकाच्या स्वत:च्या जीवाला धोका निर्माण होतोच, त्याबरोबर इतरांचा जीव जातो किंवा त्यांना कायमचे अपंगत्व येऊ शकते. ३१ डिसेंबरदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या मोठी असते. यावर खबरदारी म्हणून वाहतूक शाखेने ३ दिवस विशेष मोहीम राबविली. त्यात … Read more

केअर टेकरने घरातील १४ लाखांचे दागिन्यांची केली चोरी

स्वत:च्या आत्महत्येचा बनाव करणार्‍या केअर टेकरच्या हडपसर पोलिसांनी आवळल्या मुसक्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अर्बन बॅलन्स, कुमार पिकासोसमोर, डीपी रोड, हडपसर येथे राहणाऱ्या ललिता नरसिंह राजपुरोहित (वय ६७) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिवेंद्र शशिकांत जाधव (वय ४२, रा. वडकी) याला अटक करण्यात आली आहे. त्याने ८६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३ किलो … Read more

“सिंदूर हे अखंड भारताची नांदी” : लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर

खडकीत “सिंधू से सिंदूर तक” राष्ट्रीय चर्चासत्राचं भव्य आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे: खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान स्वायत्त महाविद्यालयात भारतीय सशस्त्र सेना दिनानिमित्त हिंदी विभाग, राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सिंधू से सिंदूर तक” या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं भव्य आयोजन करण्यात आले. … Read more

बार्शी बाजार समिती निवडणुकीत मतदानाचा धुरळा

मतदारांचा उत्साह ओसंडून : दोन्ही गट विजयासाठी झुंजणार महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेची धुरा कोणाच्या हातात जाणार? या प्रश्नाचे उत्तर शोधणारा आजचा मतदानाचा दिवस तालुक्याच्या राजकारणाला नवा वेग देताना दिसत आहे. पहाटेपासूनच मतदारांच्या तुफान गर्दीने निवडणूक वातावरण तापले असून मतदार मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावत आहेत. रविवार, दि. ७ … Read more

भाजपचे संभाव्य उमेदवार व्यंकोजी खोपडे यांचा नागरिकांशी संवाद

समस्या ऐकून मार्गदर्शनाची हमी : प्रभाग ३८ मध्ये जनसंवादाची जोरदार सुरुवात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शनिवार, ६ डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक ३८ मध्ये भाजपचे संभाव्य उमेदवार व्यंकोजी खोपडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जनसंवाद यात्रेला उत्साही सुरुवात केली. यात्रेची सुरुवात वाघजाई नगर येथील वाघजाई मातेच्या दर्शनाने झाली. मातेच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतल्यानंतर यात्रेला विधिवत … Read more

नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजारच्या घरात केली चोरी

फुरसुंगी पोलिसांनी सव्वा सहा लाखांच्या दागिन्यासह गुन्हेगाराला केले जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजार्‍याचे घर फोडून सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्याला फुरसुंगी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून ६ लाख ४१ हजार रुपयांचे ५ तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. राहुल उत्तम पठारे (वय ३९, रा. होळकरवाडी, ता. हवेली) असे अटक केलेल्या चोरट्याचे … Read more

तब्बल ८ कोटींची मागितली लाच

३० लाख घेताना ACB ने रंगेहाथ पकडले सोसायटीचा लिक्विडेटर, तात्कालीन प्रशासक ऑडिटरला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : धनकवडी येथील एकता सोसायटीवर नेमलेल्या लिक्विडेटर आणि ऑडिटरने तब्बल ८ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या ८ कोटींपैकी ३० लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना सापळा रचून अटक केली आहे. लिक्विडेटर विनोद … Read more

ज्येष्ठ नागरिकांसाठी बार्शी पोलिसांचा पुढाकार

75 वर्षीय नागरिकाला बेवारस दुचाकी सुपूर्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात मुद्देमाल निर्गतीची प्रक्रिया सुरू आहे. त्याच अनुषंगाने कसबा पेठ, बार्शी येथील रहिवासी जगन्नाथ बापूराव सरवदे (वय 75 वर्षे) यांची मोटरसायकल क्रमांक MH 13 BE 0886 ही दुचाकी बेवारस अवस्थेत आढळून आली. … Read more

अवैध धंदेवाल्यांशी संपर्क ठेवणारे २ पोलीस हवालदार निलंबित

गुन्हे शाखेच्या युनिट-१ मधील हवालदारांवर पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मटका जुगार चालविणाऱ्यांशी संपर्क ठेवत असल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकातील दोन पोलीस हवालदारांना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. निलंबित हवालदारांची नावे शुभम जयवंत देसाई व अभिनव बापुराव लडकत अशी … Read more