आवृत्ती , पुणे

अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन बनावट कॉल सेंटरवर छापा

हिंजवडीत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कारवाई : चार जणांना अटक, २३ जणांवर गुन्हा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अमेरिकन नागरिकांना फोन करून औषध कंपन्यांविरोधात दावा दाखल केल्यास मोठी नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची वैयक्तिक माहिती मिळविण्यात येत होती. ही माहिती अमेरिकेतील एका लॉ फर्मला पुरवून डॉलरमध्ये कमिशन घेत असल्याचे उघड झाल्यानंतर हिंजवडीतील दोन बनावट कॉल … Read more

रेकॉर्डवरील आरोपीकडून गावठी पिस्तूल, २ जिवंत काडतूस जप्त

गुन्हे शाखा युनिट ३ ची खडकवासला धरण परिसरात कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रेकॉर्डवरील आरोपी गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच, गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने खडकवासला धरण परिसरात कारवाई करत एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. गणेश सतिश रणखांब (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे या आरोपीचे नाव … Read more

सराईत गुन्हेगाराकडून सव्वातीन लाखांचे अफिम जप्त

गुन्हे शाखा युनिट २ ची आंबेगावात कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आंबेगाव येथील दळवीनगर परिसरातून गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराकडून तब्बल ३ लाख ३० हजार ७२० रुपये किंमतीचे १६५ ग्रॅम अफिम जप्त केले आहे. देविलाल शंकरलाल आहिर (वय ४३, रा. ग्रीन अलिव्हीम बिल्डिंग, दळवीनगर, कात्रज) असे या आरोपीचे नाव आहे. … Read more

एक किलो सोन्याची बिस्किटे घेऊन फरार कामगार अखेर जेरबंद

१ कोटी २७ लाखांचे सर्व सोने फरासखाना पोलिसांनी केले हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : केवळ चार महिन्यांपूर्वी कामावर घेतलेल्या कामगाराने दुकानातील लॉकर उघडून त्यातील एक किलो वजनाची सोन्याची बिस्किटे चोरून फरार झाल्याची घटना घडली होती. फरासखाना पोलिसांनी साताीर्यापासून सोलापूर, विजापूर, विजयवाडापर्यंत शोध घेतल्यानंतर अखेर २९ ऑक्टोबर रोजी सांगली जिल्ह्यातील जत येथे त्याला अटक केली. … Read more

खडकीतील सराईत गुन्हेगार स्थानबद्ध

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची एमपीडीएअंतर्गत कारवाई : नागपूर कारागृहात रवानगी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खडकी येथील सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. त्याची नागपूर कारागृहात रवानगी खडकी पोलिसांनी केली आहे. मुस्तफा उर्फ मुसा शफिक कुरेशी (वय २०, रा. महादेववाडी, खडकी) असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे … Read more

खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगार जेरबंद

शिवाजीनगर पोलिसांची कारवाई : आर्म अ‍ॅक्टखालीही दाखल गुन्हा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर रेल्वे कॉटर्स येथे तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक गणेश दोरास्वामी (वय १९, रा. प्लॉट क्र. ११, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी ६ नोव्हेंबर रोजी … Read more

टोळक्याने तरुणावर कोयत्याने केला वार

पुतण्याने मारहाण केल्याचा घेतला बदला : शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सहा महिन्यांपूर्वी पुतण्याने शाळेत अन्य एका विद्यार्थ्याच्या हातावर वार केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी चौघांनी तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत अजय हनुमंता अलगुडे (वय ३२, रहिवासी प्लॉट क्र. ११, … Read more

ऑनलाइन हॉटेल आरक्षण करणे पडले महागात

महिलेची सव्वा दोन लाखांची फसवणूक : विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हॉटेलमधील खोली ऑनलाइन पद्धतीने आरक्षित करणे एका महिलेला महागात पडले. चोरट्यांनी महिलेच्या क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती घेऊन बँक खात्यातून २ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने विश्रामबाग … Read more

गँगस्टर नीलेश घायवळ टोळीवर तिसरी मोक्का कारवाई

व्यावसायिकाला धमकावून उकळली तब्बल ४४ लाख ३६ हजार रुपयांची खंडणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ टोळीवर पुणे पोलिसांनी तिसऱ्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. कर्वेनगर आणि शिवणे परिसरातील मिलेनियम नॅशनल स्कूलमधील दोन शाळांतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ आणि … Read more

रिपब्लिकन सेनेच्या भूम तालुका अध्यक्षपदी मुकुंद लगाडे यांची निवड

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : रिपब्लिकन सेनेच्या भूम तालुका अध्यक्षपदी मुकुंद लगाडे यांची निवड करण्यात आली. ही निवड रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार, जिल्हा प्रभारी कपिल सरोदे आणि जिल्हाध्यक्ष अनिल हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. या बैठकीस महिला आघाडी महाराष्ट्र सदस्या रेश्मा शेख, जिल्हाध्यक्ष मनिकरणा साखरे, धाराशिव तालुका अध्यक्ष गौतम बनसोडे, … Read more