आवृत्ती , पुणे

महिलेचे मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा जेरबंद

लॉ कॉलेज रोडवर मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे. राजू वामन खुडे (वय ४०, रा. प्रमोद महालेनगर, दीप बंगला चौक, शिवाजीनगर) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव … Read more

बनावट लेटरहेडवरून ३३ कोटींची फसवणूक

मंत्रा इनसिग्निया प्रकल्पातील प्रकार : संचालक रोहित गुप्ता, विशाल गुप्ता आणि सिद्धार्थ जैन यांच्यावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडिलांच्या कंपनीचे बनावट लेटरहेड तयार करून खोटे पत्र बनवून ३३ कोटी ५१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंत्रा इनसिग्निया या प्रकल्पाचे संचालक रोहित घनश्याम गुप्ता, विशाल नंदलाल गुप्ता आणि सिद्धार्थ … Read more

महापालिकेत गोंधळ घालणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अटक

माजी नगरसेवक आणि आयुक्त यांच्यात वाद : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिका आयुक्तांची बैठक सुरू असताना निवेदन देण्यासाठी आत शिरल्यामुळे निर्माण झालेल्या वादातून गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक आयुक्त अमोल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अ‍ॅड. किशोर … Read more

एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला शिक्षा

३ वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंड : जुगार खेळणाऱ्यांकडे मागितली होती लाच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर न्यायालयाने त्या चौघांना प्रत्येकी २०० रुपये दंड करून सोडून दिले. या गुन्ह्यात मदत केल्याच्या मोबदल्यात १ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदाराला विशेष न्यायालयाने ३ वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपयांची शिक्षा … Read more

सराफाला कोलकत्याच्या ज्वेलर्सने घातला २ कोटी ८० लाखांचा गंडा

ब्रोकर्सशी संगनमत करून हिरेजडित सोन्याचे दागिने मागवून केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ब्रोकर्सशी संगनमत करून हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांची मागणी नोंदवून, ती स्वीकारल्यानंतर हे दागिने आणखी पुढे विक्री करून त्याच्यापासून पैसे न आल्याचे सांगत पुण्यातील लक्ष्मी रोडवरील सराफाची तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत ओंकार अशोक अष्टेकर … Read more

अडीच लाखांच्या कर्जाचे तडीपार गुंडाने १६ लाख घेतले

आणखी १२ लाखांची मागणी, जीवे मारण्याची दिली धमकी : सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी वेळोवेळी घेतलेल्या अडीच लाखांच्या कर्जाच्या बदल्यात त्यांनी १६ लाख ८३ हजार रुपये परत केले. तरीही त्यांच्याकडे आणखी १२ लाखांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत हितेश रवी उत्तमचंदानी (वय ३६, रा. … Read more

कन्व्हेयन्स डीड न केल्याने गार्डियन प्रमोटर्स डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल

सोसायटीच्या अमेनिटीज न देता ३ कोटींची फसवणूक : वाघोलीतील प्रकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाघोली येथील साखरे गार्डियन ईस्ट मेडोज या सोसायटीस करारनाम्यानुसार आवश्यक सुविधा (अमेनिटीज) न देता तसेच कन्व्हेयन्स डीड न केल्याने, तसेच देखभाल खर्च न उचलल्याने जवळपास ३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी गार्डियन प्रमोटर्स आणि … Read more

धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभी करूया : अजितदादा पवार

मा. आमदार राहुल मोटे यांच्या हाती पुन्हा घड्याळ : अजित पवारांनी केले स्वागत महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला.त्यामुळे पुढील काळात परांडा मतदार संघाची राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

भुम बाजार समितीवर देशमुख-हाके यांची बिनविरोध निवड

माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : भुम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रवीण देशमुख तर उपसभापतीपदी आप्पासाहेब हाके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. या निमित्ताने … Read more

गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची २.३८ कोटींची फसवणूक

सेनापती बापट रोडवरील कार्यालयातून आर्थिक फसवणूक : आठ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इन्फीनाईट बेकॉन इंडिया व ट्रेडस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या … Read more