आवृत्ती , पुणे

तडीपार गुन्हेगाराकडून दीड लाख रुपयांचे ६ मोबाईल जप्त

साथीदाराच्या सहाय्याने स्वारगेट परिसरात केल्या होत्या चोर्‍या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तडीपार केले असतानाही वारंवार शहरात येऊन दमदाटी करणाऱ्या तसेच जबरी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी पकडले़ त्याच्याकडून दीड लाख रुपयांचे ६ मोबाईल हस्तगत केले आहेत. प्रतिक विजय माने (वय २४, रा. डेरे बंगला, मांजरी, मुळ रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे … Read more

अ‍ॅडमिशनचे पैसे परत न केल्याने मारहाण

एमबीएसाठी पैसे घेतले एकाने, मागताहेत दुसर्‍याला, मित्राला मारहाण महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एमबीए साठी कोथरुडच्या एमआयटी येथे प्रवेश मिळावा, म्हणून त्यांनी २ लाख २० हजार रुपये दिले. परंतु, प्रवेश मिळाला लोणी काळभोरमधील कॉलेजमध्ये. त्यामुळे एजंटला दिलेले पैसे परत करावेत, म्हणून चौघांनी मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. क़ाचेची बाटलीने पाठीत तसेच सिलिंग फॅनच्या पात्याने मारहाण केली. … Read more

गाड्यांच्या काचा फोडून माजविली दहशत

तरुण मिळून न आल्याने सहकारनगरमध्ये टोळक्याने घातला राडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणून त्यांना पाहिजे असलेला तरुण न मिळाल्याने टोळक्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा, कार यांच्या काचा फोडून सहकारनगरमध्ये दहशत माजविली. श्रीरंग ज्ञानोबा शेलार (वय ५०, रा. हिलटॉप सोसायटी, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन … Read more

सतीश वाघ यांचे फुरसुंगी येथून अपहरण

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे ; फुरसुंगी परिसरातील शेतकरी सतीश सातबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी फाटा, मांजरी फॉर्म) यांचे सोमवारी अपहरण करण्यात आले. ही घटना शेवाळवाडी येथील फुरसुंगी फाटा येथे सकाळी सहाच्या सुमारास घडली. घटनेला जवळपास १२ तास उलटून गेले असले, तरी अद्याप त्यांचा काहीही पत्ता लागलेला नाही किंवा अपहरणकर्त्यांनी … Read more

जैन मंदिरात चोरी करणारा जेरबंद

जैन साधकाच्या वेशात येऊन करत होता चोर्‍या, सराईत चोरट्याला मुंबईतून केले अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जैन मंदिरात जैन साधकाच्या वेशात जाऊन तेथील देवाचे दागिने चोरणार्‍या सराईत चोरट्यास जेरबंद करण्यात आले. नरेश आगरचंद जैन (रा. गिरगाव, मुंबई) असे या चोरट्याचे नाव आहे. पैशांच्या चणचणीतून देवाचे दागिने चोरल्याने त्याने सांगितले. त्याच्याकडून चोरलेले देवाचे सोन्याचे मुकुट … Read more

मुंढव्यात सराफ दुकानावर दरोडा

ज्येष्ठ सराफ व्यवसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवत चेहर्‍यावर मारला स्प्रे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुकान बंद करण्यापूर्वी दिवसभराचा हिशोब लिहित असताना दुकानात शिरलेल्या दोघा चोरट्यांनी सराफ व्यावसायिकाच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. पिस्तुलाचा धाक दाखवून अडीच लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. याबाबत वालचंद ओसवाल (वय ७७, रा. नाना पेठ) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  ही … Read more

पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांचे टायर, हेडलॅम्प चोरीस

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील घटना : वाहनांच्या काचाही फोडल्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चतु:श्रृंगी पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांत जप्त केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून, १ लाख १० हजार रुपयांचे टायर आणि हेड/टेल लॅम्प चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे मुद्देमाल कारकून, सहायक फौजदार सूर्यकांत इनामदार यांनी फिर्याद दिली आहे. हा … Read more

दिलीप ढेरे यांच्या तत्परतेने अपघातग्रस्त तरुणाचा जीव वाचला

धाडसी आणि जबाबदार कृतीचे सर्वत्र कौतुक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, स.पो.नि. दिलीप विष्णू ढेरे यांच्या तत्परतेने आणि धाडसपूर्ण कृतीने एका अपघातग्रस्त तरुणाचा जीव वाचला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि सेवाभावाचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. दिनांक ३ डिसेंबर रोजी रात्री एक वाजता … Read more

दारुच्या नशेत तरुणाला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण

कोथरुडमधील घटनेत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारु पिल्यानंतर किरकोळ कारणावरुन झालेल्या वादावादीत तिघांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्या डोक्यात सिमेंटची वीट घालून बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. कर्वेनगरमधील चांदणी बार ते कोथरुडमधील कोकण एक्सप्रेस दरम्यान घडलेल्या या घटनेत पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना … Read more