आवृत्ती , पुणे

रुट मार्च अडवून रिक्षाचालकाने पोलिसाचा शर्ट फाडला

पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परिसराची माहिती व्हावी, यासाठी पोलिसांबरोबर बंदोबस्ताला आलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकडीसह रुट मार्च केला जातो, जेणेकरून अचानक काही घटना घडल्यास त्यांना परिसराची माहिती व्हावी. सीमा सुरक्षा दलासह असा रुट मार्च जात असताना जनता वसाहतीत एका रिक्षाचालकाने पोलिसांचा हा रुट मार्च अडवला व … Read more

व्हायरल व्हिडिओमधील बंदुक टिकल्या उडविण्याची

दोघांना अटक : सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भर दिवसा दुचाकीवरुन जाताना बंदुक दाखविणाऱ्या दोघांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. तो लोकांवर ही बंदुक रोखून त्यांना घाबरवित असल्याचे दिसत होते. दिवाळीसारख्या सणामध्ये भर रस्त्यावर दहशत निर्माण कणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्या या दोघांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. चौकशी … Read more

सिंहगड पोलीस स्टेशनच्या पवन माने यांचा विक्रम

४५ मिनिटात मारल्या १९७३ बैठका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हास्तरीय स्पर्धेत सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पवन माने यांनी ४५ मिनिटांत १९७३ बैठका मारून विक्रम केला आहे. सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथील ओम साई हेल्थ क्लब येथे धनंजय पाटील युवा मंचातर्फे युवकांच्या जिल्हास्तरीय बैठक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुमारे १७० युवकांनी ४५ … Read more

नवले पुलाजवळ ट्रकची क्रेनला धडक

एकाचा मृत्यू : एक जण गंभीर जखमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील “मृत्यूचा सापळा” अशी कुप्रसिद्धी असलेल्या नवले पुलाजवळ बुधवारी दुपारी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. पुलाजवळ उभ्या असलेल्या क्रेनला ट्रकची धडक बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज कडून … Read more

चोरट्याकडून २ पिस्टल, 4 काडतुसे जप्त

विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रेकॉर्डवरील आरोपीकडुन जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्हयातील चोरीच्या मालासह ०२ पिस्टल व ०४ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात विश्रामबाग पोलीसाना यश आले आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शास्त्रीरोड येथुन फिर्यादी वृध्द महिला ह्या रस्त्याने जात असताना मोटार सायकल चालकाने गळयातील सुमारे २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी … Read more

गहाळ झालेले साडेपाच लाखांचे मोबाईल हस्तगत

डेक्कन पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डेक्कन पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने गहाळ झालेले ₹ ५,४०,००० किंमतीचे ३० मोबाईल हस्तगत केले आहेत. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलची माहिती मिळवण्यासाठी (Central Equipment Identity Register – CEIR) ही प्रणाली सुरू केली होती. केंद्र सरकारच्या CEIR प्रणालीचा वापर करून डेक्कन … Read more

घर फोडून अडीच लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील गजबजलेल्या वस्तीतील एका घरात चोरट्यांनी अडीच लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ ते २३ ऑक्टोबर दरम्यान, फ्लॅट नं. ०२, पहिला मजला, पुष्कराज बिल्डिंग, महावीर इलेक्ट्रॉनिक्सच्या शेजारी, बिबवेवाडी येथे ही चोरीची घटना घडली. फिर्यादींचे घर कुलूप लावून बंद … Read more

बाणेरमधील दुकान फोडून २२ हजारांची चोरी

चतु:शृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बाणेर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळच्या शिंदे सरकार बिल्डिंगमधील एका दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी २२ हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी एका महिलेने (वय ३६, रा. बालेवाडी फाटा, बाणेर) पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी ४ ते ५ … Read more

ऑनलाइन ट्रेडिंगच्या बहाण्याने २१ लाखांची फसवणूक

खडकी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाइन ट्रेडिंगच्या बहाण्याने २१ लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार मुळा रोड, खडकी येथे घडला आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाशी एका व्यक्तीने ४ एप्रिल ते ११ मे या कालावधीत मोबाईलवर संपर्क साधला. फिर्यादीचा विश्वास संपादन करून, … Read more